कलावंताचा स्नेह मिलन आणि सत्कार समारंभ सोहळा संपन्न
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला : (प्रतिनिधी स्थानिक ) दीवाळी निमित्त कलावंताचा स्नेहमिलन् समारंभ तथा सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे म्हणाले की “महानाट्य सह्याद्री” च्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील सर्व कलावंतांना हक्काचे व्यासपीठ संस्थापक अध्यक्ष निर्माता निर्देशक प्रा. निलेश जळमकर यांच्या “सह्याद्री फाउंडेशन” च्या माध्यमातून मिळून दिले आहे.
त्यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून लेखक एड.अनंत खेळकर, डॉ. नितीन गायकवाड, गणेश बोरकर प्रा.सतीश फडके सह्याद्रीचे संस्थापक अध्यक्ष निलेश जळमकर आधी विचारपीठावर उपस्थित होते त्यावेळी राज्य नाट्य पुरस्कार विजेते तथा विविध नाट्य स्पर्धे चे विजेते कलावंत अमोल ताले,उदय दाभाडे, काजल राऊत,महेश बागडिया,भावना भोपाळे , गीता जोशी,आरती तायडे,अक्षय पिंपरकर,प्रवीण इंगळे, कृष्णा शर्मा आदी कलावंतांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला शहरातील नवोदित कलाकारां पासून ते ज्येष्ठ कलावंत यांची उपस्थिती होती. सोहळ्याचे प्रास्ताविक दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी केले. कलावंताच्या वतीने ज्येष्ठ लेखक, नाट्यकर्मी अरविंद विश्वनाथ यांनी मनोगत व्यक्त केले. कवी निलेश कवडे व प्रशांत जामदार, नितीन वरणकार याच्या बहारदार काव्यवाचनाने कार्यक्रमाला रंगत आली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .बुरगुरे यांनी केले तर सचिन गिरी यांनी पुरस्काराचे स्वरूप व कलावंत चे परचय मांडले .तर आभार प्रदर्शन प्रफुल कानकिरड यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीसाठी विशाल कामले, महेश इंगळे, अभिषेक अंबुस्कर, अनिकेत देशमुख, नैना जाधव, गिरिराज आखरे, प्रवीण खुमकर, अभिजीत पवार, शुभम भांबेरे, पूजा थातूरकर,ॲड. सुनील डोंगरदिवे, संदीप देशमुख यांनी प्रयत्न केले.