वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
ग्राम शिर्ला (अंधारे) : सैनिकांचे गाव अशी ओळख निर्माण करणाऱ्या ग्राम शिर्ला येथे रविवार दिनांक १३/ ११/ २०२२ ला सकाळी १०.३० शहीद कैलास निमकंडे स्मारक येथे सैनिकांसोबत दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास मा. नितीनजी देशमुख (आमदार बाळापूर विधान सभा) महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अतिरिक्त मुख्य सचिव अभि. विनायकराव पांडे, विदर्भ पश्चिम विभागाचे सचिव डॉ.सुहास काटे, शहर शिवसेना (पातूर )प्रमुख अजय ढोणे, पातुर तालुका विकासमंच संयोजक ठा. शिवकुमार बायस पातूर तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष तुकारामजी निलखन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन शहिद कैलास निमकंडे स्मारक समिती आणि श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
About The Author
Post Views: 68