मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या शहीद कैलास निमकंडे यांचे शौर्य स्मरण
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
पातुर : तालुक्यातील सैनिकांचे गाव शिर्ला अशी ख्याती प्राप्त गाव शिर्ला येथे रविवार 13 नोव्हेंबरला सैनिकांसोबत दिवाळी हा कार्यक्रम हर्षोल्लासात संपन्न झाला. याप्रसंगी कैलास निमकंडे यांचे शौर्य हे महाभारतातील अभिमन्यू सारखे आहे देशासाठी प्राणाचा त्याग करणाऱ्या शहीद कैलास निमकंडे यांचे शौर्य चंद्र तारे प्रमाणे स्मरणात राहील असे विचार यावेळी व्यक्त केले आहे
येथील श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघ आणि शहीद कैलास निमकंडे स्मारक समिती यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी वीर पिता काशीराम निमकंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) अतिरिक्त मुख्य सचिव अभि .विनायकराव पांडे, विदर्भ पश्चिम विभागाचे सचिव डॉ सुहास काटे ,प्रादेशिक कृषी समिती अध्यक्ष चोथमल सारडा हे होते. अभि विनायकराव पांडे यांच्या शंखनादात प्रतिमा पूजन करण्यात आले. ‘खरा तो एकची धर्म ‘या साने गुरुजी यांची सुप्रसिद्ध गायक प्राध्यापक विलासराव यांच्या मंजुळ स्वरामध्ये गायन केलेल्या प्रार्थनेनंतर शहीद कैलास निमकंडे आणि देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्या हातून सैनिकांचा यथोचित सन्मान केल्यानंतर.
सैनिकांच्या समस्या बाबत प्रशासनाने जागृत असावे असे अंबादास टप्पे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले तर स्वतःसाठी जगलास तर मेलास देशासाठी जगला तरच जगलास असे अभि. विनायकराव पांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. ठा. शिवकुमार बायस यांनी सामाजिक संघटनांनी सैनिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
डॉ सुहास काटे यांनी सैनिकांच्या कोणत्याही समस्येबाबत आपल्या सोबत असल्याचे सांगून त्यांनी ‘दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए’या देशभक्तीपर गीताचे सुश्राव्य गायन केले. योगाचार्य भगवंतराव गावंडे यांच्या ‘सैनिकी शिर्ला’ या पोवाड्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
त्यांना प्रा विलास राऊत आणि प्रा.मंगेश राऊत यांनी संगीताची साथ दिली व प्राध्यापक विलास राऊत यांनी जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया देशभक्तीपर गीत सादर केले.
सैनिकी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमधील माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम निलखन, संतोष चह्राटे, देविदास काजगे, वसंतराव चतरकार, अर्जुन बुधनेर, वसंतराव बंड, श्रीकृष्ण ठाकरे ,अशोक डंबालकर, बाळकृष्ण बोदळे ,सुरेश जवकारे, पांडुरंग खूमकर ,रामदास लासुरकर, रवींद्र श्रीनाथ, दत्ता धनोकार ,दिनेश कठाळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. वीर माता मंदाबाई निमकंडे आणि वीर पत्नी विमलाताई काळपांडे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. प्रमुख उपस्थितांमध्ये पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देवानंद गहिले, अकोला चिन्मय मिशन अध्यक्ष आ.रा.तिडके, जिल्हा समन्वय समिती सचिव प्रमोद देशमुख, प्रा यादव वक्ते, रमेश बाहेती, ना.मा .मोहोड रामकृष्ण इंगळे, अनंतराव अमानकर , जगन्नाथ अमानकर, उपसरपंच कल्पनाताई खर्डे, चंदाताई भवाने, रेखाताई गवई, मीराताई राऊत, गुलाबराव कोकाटे, नितीन अंधारे, दामोदर अंधारे, पांडुरंग वरणकार, देविदास अंधारे, हरिभाऊ कठाळे, सुरेश वसतकार, रमेश वरणकार, मधुकर रौंदळे, दिनकर अंधारे, दादाराव अंधारे, सुरेंद्र गाडगे, मंगेश निमकंडे, उकर्डा ढाळे, सुनील निमकंडे, नारायण बळकार, पांडुरंग हिरळकार, अमोल अंधारे, रामदास सावरकर, श्रीकृष्ण रा. अंधारे ,अनंत अंधारे, गजानन अंधारे, प्रा विजय अत्तरकार आणि ग्रामस्थ महिला व पुरुषांची मोठी उपस्थिती होती प्रा. विलास राऊत यांचे सुश्राव्य पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायणराव अंधारे यांनी केले