विपर्यस्त वृत्त आणि पोस्टपासून सावध असावे !
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला : गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या अकोला जिल्हा देशमुख समाज सेवा मंडळाची नुतन कार्यकारणी घटनात्मक पद्धतीने निवडण्यात आली. आता हे अधिकृत मंडळ तथा देशमुख जागृती आणि महिला मंडळ या तिन नोंदणीकृत मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २५ डिसेंबर रोजी २०२२ रोजी राज्यस्तरीय वधु-वर परिचय व स्नेहमिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.याशिवाय कोणताही मेळावा या मंडळाचा अधाकृत नाही याची नोंद घ्यावी.याच कार्यक्रमात शुभमंलगलम् या वधु-वर परिचय पुस्तिकेचे व वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून, उल्लेखनीय कार्य करणार्या समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. समाज बांधवांनी आपल्या उपवर वधु-वरांची परिचय पत्रे (बायोटाडा) खालील ठिकाणी जमा करावेत १) छाया मेडीकल, डाबकी रोड, अकोला, २) हॉटेल सेंट्रल प्लाझा रतनलाल प्लॉट, अकोला, ३) चंडीका ऑटो सेंटर, मोठी उमरी, अकोला, ४) ज्ञानेश्वर प्रोव्हीजन, शिवर, अकोला, ५) श्री. सुनिल रंगराव देशमुख देशमुख मंगल कार्यालयासमोर, कनॉल रोड, डाबकी रोड, अकोला,६)दत्त मेडीकल किंवा तशनिक दुध डेअरी,गोरक्षण रोड,अकोला.७)प्रियंका सिमेंट,एस टी.कार्यालयासमोर,कौलखेड रोड,अकोला,८)दिनकर टेलर खडकी चौक,खडकी,अकोला यापैकी कोणत्याही ठीकाणी दि.०५ डिसेंबरपूर्वी जमा करावेत.
- अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 8788602633, 9850368469, 9921328920, 9422882777, 9975081769, 9822804505, 9049976600, 9890257735 या क्रमांकावर संपर्क साधावा.
माजी अध्यक्ष के.एम. देशमुख डोंरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून घटनात्मक रितीने या मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आलेली आहे. याच अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाची प्रथम सभा मंडळ अध्यक्ष पत्रकार संजय एम. देशमुख निंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली महादेव मंदीर अमानतपूर येथे पार पडली. यामध्ये देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख महिला मंडळाचाही सहभाग होता. या सभेला तिनही नोंदणीकृत मंडळाचे सर्व पदाधिकारी व इतर महिला आणि समाज बांधव उपस्थित होते. स्नेहभोजनापूर्वी सभा घेण्यात येऊन राज्यस्तरीय वधु-वर परीचय व स्नेहमिलन कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. निवड झालेले मंडळ हेच पदसिद्ध असून स्वतःला जबाबदार म्हणविणार्या काही लोकांनी वधू-वर मेळाव्याची वृत्ते व पोस्ट प्रसारीत करून समाज बांधवांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंडळाचे माजी अध्यक्ष के.एम. देशमुख यांनी या नव्या मंडळासोबत असल्याची कबुली मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्तांसोबत दिलेली असून तसे लेखी पत्र दिलेले आहे. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तिनही मंडळाचे अध्यक्ष सचिव आणि पदाधिकार्यांनी केलेले आहे.