वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
सातत्याने फोनवर असणे ही स्मार्टफोनधारकांसाठी चिंतेची बाब आहे. भारतीयांना आपल्या स्मार्टफोनबाबत विशेष प्रेम असून अधिकाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत असल्याचे समोर आले आहे. भारतातील बहुसंख्य नागरिक जागे असतानाच्या वेळेतील वार्षिक सुमारे अठराशे तास स्मार्टफोन वापरासाठी खर्च करत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. सायबर मीडिया रिसर्च आणि एका स्मार्टफोन उत्पादक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. दरवर्षी भारतीय युजर्स सरासरी ७५ दिवस स्मार्टफोनवर सोशल मीडिया किंवा इतर ऑनलाइन सेवांचा वापर करत असल्याचे एका अभ्यासात उघड झाले आहे.
सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर) ने चीनमधील सामोबाइल कंपनी वीवोसोबत एक अभ्यास तयार केला आहे. स्मार्टफोनचा अधिकाधिक वापर युजर्सच्या आरोग्यावर काय परिणाम करतो, यावर हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे. अधिक वेळ स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे लोकांच्या भावना, नातेसंबंध, पंसती-नापसंती यावरही परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. या अभ्यासासाठी रिसर्च फर्मने २००० जणांशी संवाद साधला. यामध्ये ६४ टक्के पुरुष आणि ३६ टक्के महिला होत्या.
काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ संवाद साधण्यासाठी वापरला जाणारा फोन स्मार्ट झाला आहे आणि त्याने मानवी जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये अप्रत्यक्ष सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. वीजबिल भरण्यापासून चित्रपटाचे तिकीट काढण्यापर्यंत आणि सुट्टीचे नियोजन करण्यापासून दैनंदिन गरजेच्या धान्य, भाजीपाल्याच्या खरेदीपर्यंत सर्वच कामे स्मार्टफोनच्या मदतीने सहज होऊ लागली आहेत. एक तृतीयांश वेळ स्मार्टफोनवर स्मार्टफोनधारक दररोज आपला एक तृतीयांश वेळ स्मार्टफोनवर घालवत असल्याचे समोर आले. यानुसार, एका युजर्सने दरवर्षी जवळपास १८ हजार तासांचा वेळ स्मार्टफोनच्या वापरासाठी दिला. टीएनजर्स असताना ७५ टक्के युजर्सने पहिल्यांदाच स्मार्टफोनचा वापर केला होता. तर, ४१ टक्के युजर्सना आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्याआधीच स्मार्टफोन वापरण्यास मिळाला होता. धक्कादायक म्हणजे, स्मार्टफोन पाहिल्याशिवाय कुटुंबीय किंवा मित्रांसोबत पाच मिनिटेदेखील संवाद साधू शकत नसल्याचे तीन युजर्सने सांगितले.
आरोग्यावर वाईट परिणाम
अभ्यासात सहभागी असलेल्यापैकी ५० टक्केहून अधिकजणांनी स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरणे सोडून देणे अथवा विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचे समोर आले. जवळपास सर्वच युजर्सने मान्य केले की त्यांना मित्र आणि कुटुंबीयांसोबत व्हर्चुअल संवाद साधण्यास आवडतो. तर, स्मार्टफोनच्या वापरामुळे रोजच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे ७० टक्के युजर्सने मान्य केले. स्मार्टफोनच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे युजर्सने मान्य केले.
सध्या तर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलचे वेड लागले आहे. मोबाईलशिवाय काहींचा वेळच जात नाही, असं झालय. मात्र याचे दुष्परिणाम देखील आता समोर येऊ लागले आहेत. अनेकांना मोबाईलमुळे आपला प्राण देखील गमवावा लागला आहे.
मोबाईलमधून निघणारे तरंग कॅन्सरचा धोका निर्माण करतात. या तरंगांमुळे अर्कोॉस्टिक नव्हे व सलायव्हरी ग्रंथींमध्ये गाठी निर्माण होण्याचा धोकादेखील वाढतो. संशोधकांनी मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे सांगितले नसले तरी ज्यांना मेंदूच्या कॅन्सरचा धोका टाळायचा आहे त्यांना झोपताना मोबाईल दूर ठेवूनच झोपण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. मोबाईलच्या लहरींमुळे पेट्रोल पंपावर स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तेथे गेल्यावर मोबाईलवर बोलण्यास मनाई करण्यात येते.
वैज्ञानिकांच्या एका गटाने फोनच्या लिथियम आयन बॅटरींमधून निघणाऱ्या १०० पेक्षा अधिक विषारी वायूंचा शोध लावला आहे. यामध्ये कार्बन मोनॉक्साईडचा समावेश आहे. यामुळे डोळे, त्वचा व नाकात जळजळ निर्माण होते. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले तरीपण लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते व अपघाताच्या प्रमाणात वाढ होते.
भारतामध्ये तंत्रज्ञानाच्या सवयीचा दर गरजेपेक्षा जास्त वाढल्याने तरूणाई ‘नोमोफोबिया’ नावाच्या आजाराने ग्रस्त होत आहे. त्यामुळं गॅजेट, मोबाईलचा वापर गरजेपुरताच करायला हवा. पण, नक्की काय आहे नोमोफोबिया याबद्दल अधिक माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.
नोमोफोबिया म्हणजे काय
मोबाईल स्क्रीन डोळ्यासमोर नसल्याने अस्वस्थता वाटते. वारंवार मोबाईल पाहण्याची सवय लागते. आपला मोबाईल विसरण्याची भीती असते.
मोबाईलच्या अतिवापराचे तोटे ?
फोनच्या वापरामुळे तुमचा वेळ वाया जातो. वागण्या- बोलण्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते. फोनच्या अतिरेकी वापरामुळे झोप बिघडते, झोप कमी येते. मोबाईल फोनचा बराच वेळ वापर केल्यानंतर मान दुखणं डोळे कोरडे होणं, कंम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम आणि अनिद्रेचं कारण बनतात. त्यामुळे मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा. एका दिवसात तीन तासापेक्षा जास्त वेळ कंप्युटरचा वापर करू नका. मोबाईल दिवसातून एकदाच चार्ज करावा.
या नियमांचं पालन केल्यास नामोफोबियाचा होणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आमच्या पडताळणीत तरूणाईला ‘नोमोफोबिया’ आजार जडतोय हा दावा सत्य ठरला आहे.
मोबाइल जवळ नसल्यावर अस्वस्थ, बेचैन व्हायला होणं, मोबाइलविना बसण्याची भीती वाटणं म्हणजे ‘नोमोफोबिया’. आज अनेकांमध्ये या रोगाची लक्षणं दिसू लागली आहेत. त्यापैकी तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचा कुणी असेल तर हे व्यसन सोडवण्यासाठी काही टिप्स
नोटिफिकेशन बंद करा !
फेसबुक, ट्रिटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सकडून सतत येणारी नोटिफिकेशन आपलं लक्ष विचलित करतात. फेसबुकवरची आपली पोस्ट कुणीतरी ‘लाइक’ केल्याचं नोटिफिकेशन येतं, आपला फोन वाजतो, आपली उत्सुकता ताणली जाते, आपण नोटिफिकेशन पाहतो, फेसबुकवर जातो आणि मग त्यातच गढून जातो, कामं विसरून स्मार्टफोनमध्ये डोकं घालून बसतो. हे टाळण्यासाठी नोटिफिकेशन बंद करून टाकणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्यामुळे तुमचा बराच वेळ सत्कारणी लागू शकतो आणि स्मार्टफोन दूर ठेवता येऊ शकतो. डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या!
आपल्याला जर स्मार्टफोनचा ‘चस्का’ लागला असेल, तर एखादं महत्त्वाचं काम करतानाही तुम्हाला मोबाइल साद घालू शकतो. बघू जरा व्हॉट्स ऍपवर काय आलंय, फेसबुकवर कुणी काही टाकलंय का, हे बघण्याची हुक्की येऊ शकते. अशावेळी एकच करा. डोळे घट्ट मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि मोबाइल न पाहण्याचा निर्धार करा. इथे मनावर ताबा ठेवू शकलात, तर तुम्ही या व्यसनातून लवकरच मुक्त होऊ शकता.
सोशल मीडिया ऍप नकोतच!
तुम्ही ‘नोमोफोबिया’च्या अगदी जवळ गेला असाल, तर मग स्मार्टफोनमधली सोशल मीडियाची सगळी ऍप तातडीनं बंद करा. हे टोकाचं पाऊल वाटेल, पण ते गरजेचं आहे. कामं संपल्यानंतर उरलेल्या वेळात सोशल साइट्स बघायच्या असतील, तर त्या ब्राउजरवरून पाहा. तो मार्ग थोडा क्लिष्ट असल्यानं आपोआपच तुम्ही इच्छेला मुरड घालाल. याउलट, ऍप असली की आपण उठसूठ एक क्लिक करून ‘सोशल’ भटकंतीत आपले तासन् तास वाया घालवतो.