ग्राम शिर्ला (अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण अंधारे यांना स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा कार्यगौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. ग्रामीण क्षेत्रात ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्कृष्ट कार्य आणि वाचनालयाद्वारे वाचन संस्कृतीची जोपासना या कार्यकरिता त्यांना सदर पुरस्कार जाहीर झाला आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून निवृत्त झाल्यानंतर यांनी आपल्या शिर्ला (अंधारे) या गावी सोमपूरी महाराज ज्येष्ठ नागरीक संघ स्थापन करून त्याद्वारे विविध उपक्रम राबविले. ज्येष्ठ नागरिक संघाचे वाचनालय सुरू करून वाचन संस्कृतीची जोपासना केली. सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या शिर्ला गावी ते दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. या कार्यक्रमाची ज्येष्ठ नागरिक विदर्भ पश्चिम विभागाने सुद्धा एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून दखल घेतली. तर ज्येष्ठ नागरिकांच्या वाचनालयाची मा. राजेश ताले अध्यक्ष स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन यांनी विशेष दखल घेतली. अंकुर साहित्य परिपाराशी ते निगडित असून पातूर तालुका अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत. ‘कैवल्याचे लेणे’ आणि गुण गातो आवडीने असे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत तरुणाई फाउंडेशनच्या तिसऱ्या अकोला जिल्हा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी त्यांची निवड झाल्याने साहित्य क्षेत्रातही त्यांचे अभिनंदन होत आहे.