- सरकारने जाहीर केले हेल्पलाईन नंबर
- मुंबई, १३ ऑगस्ट : राज्य सरकारने विद्यार्थिनींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत केले आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मुलींना शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, काही महाविद्यालये त्यांच्याकडून शुल्क वसूल करीत आहेत, अशा तक्रारी आल्या आहेत.
याविरोधात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ठोस पावले उचलली. त्यानुसार, जी महाविद्यालये विद्यार्थिनींकडे शुल्क मागतील त्यांच्याविरोधात तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ट्रिट करून माहिती दिली आहे. यात म्हटले की, मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत समस्या आल्यास सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ०७९६९१३४४४० आणि ०७९६९१३४४४१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
काय आहे योजना? - महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ही योजना जाहीर केली. योजनेनुसार, या वर्षीपासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ट्युशन आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत जाहीर केली आहे. 4 (वृत्तसंस्था)
About The Author
Post Views: 86