पालघर – तलासरी-डहाणू तालुक्यातील काही गावांना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास (4 वाजून 47 मिनिटाला) भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल मोजली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ जमिनीखाली 5 किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाचा धक्का डहाणू, […]
Category: महाराष्ट्र
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार या वर्षी आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. प्राध्यापक आशालता कांबळे या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या तसंच संविधान मूल्यांचं साहित्य लिहिणाऱ्या लेखिका म्हणून परिचित आहेत. पुरस्काराचे दुसरी मानकरी […]
पेजर फुटू शकतात तर ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही? निवडणूक आयोगाने उत्तर दिले
नवी दिल्ली: ईव्हीएम हॅकिंगच्या वाढत्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले की, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) हॅक करणे शक्य नाही, तर पेजर फुटण्याच्या अलीकडील घटनांचा हवाला देत काही लोक ईव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. […]
राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत निधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार निवडणूक अधिसूचना येत्या २२ तारखेला जारी होईल, २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरला होईल, तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता […]
वाचन संस्कृती गरजेची!
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी युवा पिढीमध्ये वाचनाचे बीज रुजले जावे, यासाठी डॉ. कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा होतो. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीवरून वाचनाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे लक्षात येते. वाचनाचा प्रचार, प्रसार होण्यासाठी शाळा, कॉलेजातून विविध उपक्रम राबविले जातात. मित्र, कुटुंबातील सदस्य, […]
तलाठी आणि कोतवाल पदाच्या नावात राज्य सरकारकडून बदल
राज्य सरकारनं तलाठी पदाचं नाव बदलून ग्राम महसूल अधिकारी केलं आहे. कोतवाल पदाचं नाव बदलून महसूल सेवक करण्याचा शासन आदेशही सरकारनं आज जारी केला. या नाव बदलामुळं तलाठी किंवा कोतवालांचं काम किंवा वेतनश्रेणीत काहीही बदल होणार नाही. तलाठी आणि कोतवालांच्या संघटनेनं केलेल्या मागणीनुसार सरकारनं ही नावं बदलली आहेत.
आरक्षण वाचवायचे असेल तर वंचितला मत द्या- ॲड.आंबेडकर
अकोला, दि. १३ |सध्याच्या परिस्थितीत आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा बनलेला आहे. संपूर्ण राजकारण आरक्षणाभोवती फिरत आहे. अनेक पक्षांकडून आरक्षण विरोधी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे आरक्षण संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आरक्षण वाचवायचे असेल तर आरक्षणाचे समर्थक असलेल्या नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून […]
क्षयरुग्णांना मिळणारी मासिक मदत 500 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत वाढवली
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सोमवारी सर्व क्षयरुग्णांना क्षयरोग निर्मूलनासाठी नि-क्षय पोशन योजनेंतर्गत मासिक मदत सध्याच्या 500 रुपयांवरून 1000 रुपये प्रति महिना करण्याची घोषणा केली. श्री. नड्डा म्हणाले की, सर्व क्षयरुग्णांसाठी पोषण आधार म्हणून नी-क्षय पोशन योजनेसाठी सरकारने 1040 कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाटपाला […]
डायबेटिक रेटिनोपॅथी चाचणी मार्गदर्शक तत्त्वे जारी
नवी दिल्ली: विट्रीओ रेटिनल सोसाइटी ऑफ़ इंडिया Vitreo Retinal Society of India (VRSI) आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया (RSSDI) यांनी (10 ऑक्टोबर) गुरुवारी जागतिक दृष्टी दिनानिमित्त अशा प्रकारची पहिली डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, जी प्रत्येक डॉक्टरांना मदत करेल. हे देशातील मधुमेही व्यक्तीला […]
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊनही, पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किमती आजही कायम राहिल्या, त्यामुळे दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या प्रमुख तेल विपणन कंपनीच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल […]