मानवी शरीर हे अत्यंत संवेदनशील आहे. आपल्या याच शरीराचं संरक्षण आपली त्वचा करत असते . अनेक प्रकारच्या विषाणूजन्य, जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य आजारापासून संरक्षण देणारे संरक्षक कवच म्हणजे आपली त्वचा असते परंतु अनेकदा अस्वच्छतेमुळे काही विशिष्ट प्रकारच्या विषाणूंचे आपल्या बाह्य त्वचेवर आक्रमण होते आणि आपल्याला त्वचेचे विकार होतात. शारीरिक अस्वच्छतेमुळे बहुतांशी होणारा त्वचा विकार म्हणजे खरूज . खरूज हि संपूर्ण शरीरावरील त्वचेवर कोणत्याही भागामध्ये होऊ शकते. खरूज होते म्हणजे नेमका कोणता आजार ? खरूज होण्याची कारण काय आहेत ? खरूज झाल्याची लक्षण काय असतात ?आणि खरूज होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक स्वरूपाचे उपाय आणि खरुजेवर वैद्यकीय उपचार कोणते ? याच प्रश्नाची उकल करण्यासाठी त्वचाविकार तज्ञ डॉ अमित गोयल यांच्याशी केलेली बातचीत .

■ खरूज म्हणजे नेमका कोणता आजार ?
खरूज हा खाज सुटणारा त्वचेचा विकार आहे. हा आजार सार्कोप्टस स्कॅबी नावाच्या लहान सुरजिंग माईट्समुळे होतो. ज्या ठिकाणी माईट्स बुरुजमुळे तीव्र खाज सुटते. खाज हि रात्रीच्या वेळी तीव्र स्वरूपात असते. खरूज हा आजार सांसर्गिक स्वरूपाचा आहे . हा आजार एका कडून दुसऱ्याला सहज पसरतो. शारीरिक संपर्काद्वारे किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी संपर्क आल्याने खरूज चा संसर्ग होऊ शकतो. तसेच खरूज झालेल्या व्यक्तीचे कपडे बूट, किंवा इतर वस्तू वापरल्याने देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, योग्य त्या उपचारानंतर हा आजार सहज बरा होऊ शकतो . खरूज या आजाराची लक्षण
नेमकी काय असतात ?
खरूज झाली कि शरीरावरील त्वचेवर तीव्र खाज सुटते. रात्री हि खाज तीव्र असते आपल्या त्वचेवर बुरशीजन्य स्वरूपाचे फोड येतात. आणि खाजवले कि ते चिघळतात हे बुरशीजन्य फोड किंवा चट्टे बोटांच्या मध्ये, काखेत कंबरेभोवती मनगटाच्या आतील भागात कोपरावर, जांघेमध्ये, पुरुषांच्या जननेंद्रियावर, खरूज उमटते . लहान मुलांच्या टाळूवर, हातांच्या तळव्यावर किंवा पायाच्या तळव्यावर खरूज होते. ज्या ठिकाणी खरूज होते त्या त्वचेवर खूप जळजळ आणि खाज येते अस्वस्थ वाटत हि खरुजेची लक्षण आहेत .
■ खरूज आजार होण्याची कारण काय आहेत ?
खरूज हा आजार मुख्यतः अस्वच्छतेमुळे होतो. घाणीशी संपर्क आला कि त्वचेवर बुरशीजन्य माईट्स जे विषाणू असतात त्यांचा प्रादुर्भाव होतो. हे माईट्स अंडी घालतात आणि हि अंडी उबतात परिपक्व होतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरतात. या माईट्स च्या मलमूत्रामुळे त्वचेला ऍलर्जी होते आणि लाल चट्टे उमटतात व तीव्र खाज येते . खरूज असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा अशा व्यक्तीच्या कपड्यांचा किंवा इतर वस्तूंचा वापर केल्याने देखील हा संसर्ग वाढतो. यासाठीच शारीरिक स्वच्छता महत्वाची असते. सध्या उन्हाळा सुरु आहे . उन्हाळ्यामध्ये अनेकांना प्रचंड घाम येतो . हा घाम त्वचेमध्ये झिरपून देखील खरूज होऊ शकते .
खरूज या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत? आणि वैद्यकीय उपचार काय आहेत ?
खरूज या आजारापासून आपला बचाव करायचा असेल तर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे शारीरिक स्वच्छता आपल्या संपूर्ण शरीराची नियमित स्वछता राखायला हवी . तसेच खरूज झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात न येणे आणि अशा व्यक्तीचे कोणतेही साधन न वापरणे हे प्रतिबंधात्मक स्वरूपाचे उपाय आहेत. खरूज झाली असेल तर परमेथ्रीन क्रीम लावावी ज्यामुळे माईट्स ची अंडी मरतात आणि खरूज बरी होते स्ट्रेमेकटोल नावाचे लोशन देखील उत्तम आहे खरजेवर अनेक प्रकारची बुरशीनाशक मलम देखील बाजारात उपलब्ध आहेत परंतु टायचा वापर त्वचाविकार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा. खरूज झालेल्या जागेवर थंड पाण्याचे कापड टाकावे कालोमाइन लोशन लावावे