
डॉक्टरांनी इशारा दिला
तुम्ही तुमचा फोन टॉयलेटमध्ये नेत असाल आणि १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्क्रोल करत असाल तर काळजी घ्या. जास्त वेळ टॉयलेटवर बसणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टेक्सास युनिव्हर्सिटी साऊथवेस्टर्न मेडिकल सेंटर, अमेरिकेतील तज्ज्ञांच्या मते, टॉयलेटवर बराच वेळ बसल्याने रक्ताभिसरणात समस्या निर्माण होतात आणि मूळव्याधसारख्या समस्या वाढू शकतात. तज्ज्ञांच्या मते, एखाद्याने शौचालयात ५ ते १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू वेळ नये. जास्त वेळबसून राहिल्याने पोट आणि गुदद्वाराच्या आजूबाजूच्या नसांवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे तेथील नसांना सूज येऊ शकते. अशा परिस्थितीत मूळव्याध आणि इतर समस्यांचा धोका वाढतो. (Sitting on the toilet for more than 10 minutes is dangerous)
जास्त वेळ बसण्याचे धोके
टॉयलेटमध्ये बराच वेळ बसल्याने पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे मल जाणे कठीण होते. याशिवाय, जास्त वेळ बसून राहिल्याने रेक्टल प्रोलॅप्सचा धोका वाढतो, ज्यामध्ये मोठ्या आतड्याचा भाग बाहेर येऊ शकतो. (Stop scrolling reels on toilet seat)
तुम्ही टॉयलेटमध्ये तुमचा फोन वापरणे थांबवा :
एखादी व्यक्ती टॉयलेटमध्ये फोन किंवा पुस्तके घेऊन जास्त वेळ घालवते, त्यामुळे शरीरात अनावश्यक ताण निर्माण होतो. शौचालयात गेल्यावर तेच काम करावे, जेणेकरून लोक ते लवकर संपवून बाहेर पडू शकतील, अशी तज्ज्ञ मंडळी सांगतात. जर तुम्ही टॉयलेटमध्ये १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसलात, तर तुम्ही हळूहळू उठून थोडा वेळ चालावे. यामुळे पोटाचे स्नायू सक्रिय होतात आणि हालचाल सुलभ होते. अधिक पाणी व फायबर प्या : तज्ज्ञांच्या मते, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. एखाद्याने दररोज २.७ ते ३.७ लिटर पाणी प्यावे आणि १४ ग्रॅम फायबर प्रति १,००० कॅलरीज अन्नात घेतले पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल किंवा शौचाला जास्त वेळ लागत असेल, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा म्हणजे पुढील वाढणाऱ्या समस्यांना, आरोग्याच्या तक्रारींना वेळीच लगाम लागू शकेल.