जगभरासह देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रभावी उपचारासाठी अनेक संशोधन प्रकल्प सुरू आहेत. आता संशोधकांनी आयएल-३५ या विशिष्ट प्रोटीनचा शोध लावला आहे. हे प्रोटीन मधुमेहावरील उपचारांसाठी एक नवीन पर्याय ठरू शकतो. (Institute for Advanced Study in Science and Technology)

हे प्रोटीन जळजळ निर्माण करणारी रसायने तयार करणाऱ्या पेशी कमी करते. यामुळे स्वादुपिंडाच्या पेशींचा प्रभाव कमी होतो. ही प्रक्रिया टाईप १ मधुमेह आणि ऑटोइम्यून मधुमेहात सकारात्मक, महत्त्वपूर्ण योगदान देते. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ‘इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’च्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. आयएल-३५ हे प्रोटीन रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करते. मधुमेहासाठी एक नवीन उपचार पर्यायदेखील उपलब्ध करते. ही संपूर्ण यंत्रणा समजून घेण्यासाठी आणि आयएल-३५ आधारित उपचाराच्या पुढील क्लिनिकल चाचण्या करणे आवश्यक आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, विकसनशील देशांतील मुले आणि किशोरवयीन मुलांभोवतीचा मधुमेहाचा विळखा घट्ट होत आहे. अशा परिस्थितीत मधुमेहावर प्रभावी उपचार करणे ही काळाजी गरज आहे. (Institute for Advanced Study in Science and Technology) संशोधकांच्या मते आयएल-३५ टाइप १ आणि ऑटोइम्यून मधुमेह टाळण्यास मदत करते. आयएल-३५ने स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना रोगप्रतिकारक पेशींवर परिणाम करण्यापासून रोखले. याव्यतिरिक्त आयएल-३५ने विशिष्ट रोगप्रतिकारक पेशी कमी केल्या, ज्यामुळे दाहक रसायने तयार होतात. हे स्वादुपिंडाच्या पेशींचे बिघडलेले कार्य कमी करतात. जे टाइप १ मधुमेह आणि ऑटोइम्यून मधुमेह मेलिटसमध्ये मोठे योगदान देतात.