अकोला : भारतीय संस्कृती आणि संस्कार हे जगात सर्वश्रेष्ठ असून ज्येष्ठ समाजाला नवीन दिशा देण्याचे काम करीत असतात तसेच ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्रीय संपत्ती आहेत असे विचार अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मीर साहेब यांनी व्यक्त केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघ अकोलाद्वारे करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल तसेच विवेक विचार या त्रैमासिकाच्या अंकाबाबत गौरवोद्गार काढले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या ते अकोला जेष्ठ नागरिक संघा द्वारे आयोजित कौटुंबिक मेळावा तसेच विवेक विचार मासिकाचे प्रकाशन, जेष्ठांच्या क्रीडा स्पर्धा आणि ज्यांच्या विवाहाला पन्नास वर्षे पूर्ण झाली अशांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख .पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव केला आणि सर्वधर्म समभाव अधोरेखित केला.
दुसरे प्रमुख पाहुणे शताब्दीच्या उंबरठ्यावर उभे असलेले बाळकृष्ण दादा आवदे यांनी ज्येष्ठांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहता आले ही आनंद पर्वणीच असल्याचे आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
कार्यक्रमाचा प्रारंभ खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाला प्रमुख अतिथींचे शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक संघाचे सचिव प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती यांनी केले त्यांनी संघाद्वारे करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली
त्यानंतर ज्यांनी आपल्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण केले असे अभि. विनायकराव पांडे, अतिरिक्त मुख्य सचिव फेस्कॉम, माजी अध्यक्ष अशोक कुळकर्णी, विठ्ठराव देशमुख, इंदाने, मनोहर कुळकर्णी, प्रभाकर जोशी, कठाळकर, अहिर, रमेश गट्टानी, मुंदडा, रघुनाथ मैन यांचा मान्यवरांनी सपत्निक सन्मान केला.
याप्रसंगी संघाद्वारे काढण्यात आलेल्या विवेक विचार त्रैमासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्यांना पारितोषिके देण्यात आली. विदर्भ पश्चिम विभागाचे सचिव सुहास काटे यांनी नांदेड येथे मार्चमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय महिला अधिवेशना बाबत माहिती दिली. विवेक विचारचे संपादक मोहनशास्त्री जलतारे यांनी विवेक विचाराची पार्श्वभूमी कथन केली. सदर सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी संघाचे तथा महानगर समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुळकर्णी हे होते. डॉ सत्यनारायण बाहेती सचिव यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन संघाचे उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी केले.
प्रमुख उपस्थितांमध्ये माजी अध्यक्ष अशोक कुळकर्णी जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार, कोषाध्यक्ष अशोक शिंदे प्रभाकर देशपांडे प्रमोद देशमुख सुनील खोत रमेश बाहेती श्री कोल्हे इत्यादी सदस्य तसेच महिला समिती अध्यक्षा संध्या संगवई, विद्याताई पांडे, शितल काटे चंद्रप्रभा चौधरी, , मानकर, रामदास वांडे आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती. निशा कुळकर्णी आणि आरती जलतारे यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाल्यावर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.