राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता खासगी रक्तपेढ्यांना थॅलेसेमिया डे केअर सेंटर्सला थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि इतर कोणत्याही रक्त विकाराच्या रुग्णांना मोफत रक्त देणे बंधनकारक असणार आहे.
राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी थॅलेसेमिया केंद्रांसह रक्तपेढ्यांची देखील आहे. त्यामुळे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सरकारने नियमावली जारी केली. थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि इतर कोणत्याही रक्त विकाराच्या रुग्णांना मोफत रक्त देणे आवश्यक आहे, ज्यासाठी सर्व परवानाधारक रक्त केंद्रांद्वारे वारंवार रक्त संक्रमण आवश्यक आहे. त्यामुळे एसबीटीसी बैठकीत ठरल्याप्रमाणे, रुग्णांना मोफत रक्त देण्याचा प्रश्न सुलभ करण्यासाठी आणि कोणताही थॅलेसेमिया रुग्ण रक्तापासून वंचित राहू नये याची खात्री करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मोफत रक्त देण्यासाठी अनुक्रमे २ – ३ रक्त केंद्रे जवळच्या थॅलेसेमिया डे केअर सेंटर्सशी जोडली गेली. मोफत रक्त देण्यासाठी मुंबईतील जवळच्या थॅलेसेमिया डे केअर सेंटरशी रक्त केंद्रे जोडली गेल्यानंतर, नवीन डे केअर सेंटर्स सुरू करणे, काही डे केअर सेंटर्सद्वारे स्वयंपूर्णतेचा प्रवेश, लिंकिंगची गरज यांसारख्या काही घडामोडी आणि अडचणी आल्या. त्यामुळे या अडचणी सोडवत महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेने थॅलेसेमिया डे केअर सेंटरशी निगडित रक्तपेढ्यांना राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आता खासगी १६ थॅलेसेमिया डे केअर सेंटर्सला ठरावीक सेंटरशी जोडून मोफत रक्त देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार या ब्लड बँकांना वीस ते पंचवीस रक्त पिशव्या देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेकदा रक्तपेढ्या
हा सरकारचा आदेश पाळत नसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेने थॅलेसेमिया डे केअर सेंटरशी निगडित रक्तपेढ्यांना स्मरणपत्र पाठवून अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये केंद्रांना किती युनिट्स रक्त मोफत देण्यात आले याचा अहवाल आहे. अनेक रक्तपेढ्यांनी सरकारी आदेशाकडे डोळेझाक केल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले असून मोफत रक्त युनिट देण्याच्या सूचनेचे पालन करण्यास सांगितले आहे.