रेल्वे स्थानकावर गाडीची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता यावा या उद्देशानं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर एक छोटं पुस्तक घर सुरु करण्यात आलं आहे. या पुस्तक घरामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतली पुस्तकं उपलब्ध आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दिवसाला सरासरी पंधरा ते वीस हजार प्रवासी प्रवास करतात. अनेकदा रेल्वे गाड्यांना विलंब होतो त्यामुळे रेल्वेच्या भुसावळ विभागानं हा अनोखा उपक्रम राबवला आहे.
About The Author
Post Views: 88