जिल्हा संयोजक यांची पत्रकार परिषदेत माहिती
अकोला : जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागावर आम आदमी पाटी आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हा संयोजक कैलाश प्राणजळे महानगर अध्यक्ष अलहाज मसूद अहेमद यांनी शुक्रवार ता. २ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात पंजाब व दिल्ली या राज्यात जनतेने आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत दिले. दिल्लीतील जनतेला २०० युनिटपर्यत मोफत विज, शिक्षण मोफत आरोग्याच्या सोयी, सुविधा, सर्व मुलांना मोफत ऑतराष्ट्रीय सारख्या दर्जेदार शिक्षण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, महिलांना मोफत बसप्रवास, घरपोच धान्य पुरवठा, वृद्धासाठी तिर्थ यात्रा आम आदमी पक्षाला शक्य झाले आहे. आम आदमी पक्ष प्रखर राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती व प्रामाणिक कार्यकर्ते व नेते असलेल्या लोकांचा पक्ष आहे. पंजाब व दिल्लीतील लोकाना ज्या सुविधा मिळाल्या त्या सर्व सुविधा, सोयी, ते सरकार महाराष्ट्रातील जनतेला मिळाले पाहिजे. महाराष्ट्रात सुद्धा दिल्ली, पंजाब या राज्यांद्वारे आला पाहिजे म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ जागा लढविण्याचा निर्धार आम आदमी पक्षाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, महाराष्ट्र राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालिया व राज्य संघटन सथिव एड. मनिष मोडक . यांनी केला आहे. उमेदवारी जाहीर करतांना प्रथम प्राधान्य पक्षातील सक्षम उमेदवार यांना दिले जाणार असल्याचे सांगितले. उमेदवारी जाहीर करतांना प्रथम प्राधान्य पक्षातील सक्षम पवाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विचारल्या जाईल, ज्या ठिकाणी जागा उपलक्ध असल्यास सक्षम उमेदवार निवडीचा विचार पक्षश्रेष्ठी करेल व त्यांची उमेदवारी घोषित करेल असे आजच्या पत्रकार परिषदे जिल्हा संयोजक कैलाश प्राणजाळे व महानगर अध्यक्ष अलहाज मसुद अहेमद खान यांनी कळविले, या पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर साकरकार, दर्पण खंडेलवाल, प्रदिपकुमार गवई, गजानन सुदूरकले, रफिकभाई, आकिबखान, काजी लायक अली, सुखदेव गोपनारायण ठाकुरदास चौधरी, अशोक शेगोकार, शफिक भाई, ज्ञानेश्वर दांदळे, मतीन रहेमान खान, अनिक अहमद, शेख अन्सार, अरविंद कांबळे, गजानन मेश्राम, राजाभाऊ देशमुख गजानन गणवीर, श्रावण रंगारी, शिवा मोहोड, रविद्र सावळे कर, रियाज खान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.