वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प तब्बल 1.54 लाख कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पामुळे तब्बल एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. यावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले आहे. अशातच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मेड इन इंडिया सेमीकंडक्टर निर्मितीमुळे लॅपटॉपच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होऊ शकते, असे सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी त्यांनी भारताचे आभार व्यक्त केले आहे. भारतात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर चीपमुळे लॅपटॉपच्या किंमतीमध्ये मोठी घट णार आहे. या सेमीकंडक्टरमुळे एक लाख रुपयांचा लॅपटॉप 40 हजार रुपयांपर्यंत अथवा त्यापेक्षा कमी किंमतीमध्ये मिळ शकतो. सेमीकंडक्टर प्रोजेक्ट सध्या तैवान आणि कोरियामध्ये आहे. लवकरच हा प्रोजेक्ट भारतामध्ये सुरू होणार असल्याचेही अग्रवाल म्हणाले. भविष्यात आम्ही महाराष्ट्रामध्येही प्रकल्प सुरू करणार आहोत. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इलेकट्रिक गाड्याची निर्मिती महाराष्ट्रात करणार आहोत, असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान, सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. हा प्रकल्प तब्बल 1.54 लाख कोटी रुपयांचा असून यामुळे तब्बल एक लाख जणांना नोकरी मिळणार आहे. सेमीकंडक्टर प्रोजेक्ट सध्या तैवान आणि कोरियामध्ये आहे. लवकरच हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये सुरु होईल.