तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही काय खाता याबरोबरच तुम्ही ते कधी खाता हेदेखील महत्त्वाचे आहे. विशेषतः लंच आणि डिनरमध्ये किती वेळ जावा, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकजण याकडे फारसे लक्ष देत नाहीत, मात्र दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर असणे गरजेचे आहे. या लेखात आपण लंच आणि डिनरमधील वेळेत काय फरक असावा आणि का असावा याविषयी जाणून घेऊयात.
■ लंच आणि डिनरमधली वेळ का महत्त्वाची आहे?
पचन – दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात पुरेसा वेळ असल्याने आपली पचनसंस्था अन्नाचे योग्य पचन करण्यास सक्षम असते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी यासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. नेहमीच्या वेळेवर अन्न खाल्ल्याने आपली पचन क्रिया व्यवस्थित होते. यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
■ एनर्जी लेव्हल – जेव्हा आपण योग्य वेळी खातो तेव्हा आपल्याला दिवसभर उत्साही वाटतो.
■ झोप- झोपण्याच्या काही तास आधी रात्रीचे जेवण करावे, जेणेकरून झोपण्यापूर्वी शरीराला अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळेल. यामुळे चांगली झोप येते.
■ लंच आणि डिनरमध्ये किती वेळ असावा?
साधारणपणे दुपारचे आणि रात्रीचे जेवण यामध्ये ४ ते ६ तासांचे अंतर असावे. हा वेळ तुमच्या पचनसंस्थेला अन्न पचवण्यासाठी पुरेसा आहे. परंतु ही वेळ प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असते आणि ती
प्रत्येक व्यक्तीच्या पचनक्रियेला लागणाऱ्या वेळेवर अवलंबून असते.
■ अधिक सक्रिय लोक – जे लोक अधिक सक्रिय आहेत, ज्यांना अंगमेहनतीची कामे करावी लागतात. त्यांना कमी अंतराने अन्न खावे लागेल.
■ कमी सक्रिय लोक – जे लोक कमी सक्रिय आहेत त्यांनी जास्त अंतराने अन्न खावे.
■ दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर नसण्याचे तोटे : वजन वाढणे – जर तुम्ही दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कमी वेळ ठेवलात तर तुमच्या शरीरात कॅलरीज जमा होत राहतात, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.
■ पचनाच्या समस्या सतत खाल्ल्याने पचनसंस्थेवर दबाव पडतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
■ कमी ऊर्जा – सतत खाल्ल्याने तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो.
■ झोपेची समस्या – रात्री उशिरा जेवण केल्याने झोपेचा त्रास होतो.
दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर कसे राखायचे?
■ जेवण रोजच्याच वेळी घ्या – दररोज दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा.
■ हलका नाश्ता घ्या – जर दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात बराच वेळ असेल तर तुम्ही फळे, दही किंवा काजू यांसारखा हलका नाश्ता घेऊ शकता.
■ रात्रीचे जेवण हलके ठेवा – जास्त प्रमाणात फायबर आणि प्रथिने असलेले रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित ठेवा.
■ झोपण्यापूर्वी काहीही खाऊ नका – झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी अन्न खा.
■ भरपूर पाणी प्या – पाणी तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
