उद्घाटक बालकलाकार अथर्व मोटे, अभिनेते, कवी तुषार बैसाने तर स्वागताध्यक्षपदी यांची विठ्ठलराव माळी यांची निवड
अकोला: शुभम मराठी बाल, कुमार,युवा व नवोदित साहित्य मंडळाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील शेतकरी वाडा, बहादूरा कृषि पर्यटन,ता.बाळापूर,जि.अकोला येथे रविवार,दि.२३ मार्च २०२५ रोजी आयोजित केलेल्या दहाव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी अकोला येथील सुप्रसिध्द वर्हाडी कवी शिवलिंग काटेकर यांची उद्घाटकपदी ‘धर्मवीर-२’,पहिलं मूल,बंटी बंडलबाज,सुपर डुपर चित्रपट फेम आणि काव्यांजली,तुझेच गीत गात आहे,माझी माणसं,पुन्हा कर्तव्य आहे,जय जय स्वामी समर्थ अशा अनेक मालिका, नाटके, वेबसिरीजमध्ये भूमिका केलेले मुंबई येथील बालकलाकार अथर्व मोटे तर स्वागताध्यक्षपदी शेतकरी वाडा कृषि पर्यटन केंद्र, बहाद्दूरा,बाळापूरचे संस्थापक विठ्ठलराव माळी यांची निवड करण्यात आल्याची माहिती शुभम साहित्य संस्थेचे केंद्रिय सचिव संदीप देशमुख यांनी दिली आहे.
शिवलिंग काटेकर हे संपूर्ण महाराष्ट्रभर ज्येष्ठ वऱ्हाडी कवी म्हणून प्रसिध्द असून १९८७ पासून त्यांनी कविता लिहायला सुरूवात करून पहिला काव्यसंग्रह ‘पावसाचं पाणी’, ‘वऱ्हाडधन’हा वऱ्हाडी शब्दकोश प्रकाशित करुन वर्हाडी साहित्यासाठी समर्पित भावनेने सातत्याने लेखन व कार्य करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी पाचशेहून अधिक कविसंमेलनांमधून,कार्यक्रमांमधून सहभाग घेतला आहे. आगामी ‘बेसर’ हा संग्रह व ‘वऱ्हाडधन’ शब्दकोशाची तिसरी आवृत्ती पंधरा हजार शब्दांसह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

मराठीला भाषेला मिळालेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ ही अभिमानाची गोष्ट असून या आनंदोत्सवात आमची शुभम साहित्य संमेलनाच्या सन्मानाच्या पदांसाठी केलेली निवड मनाला समाधान व आनंद देणारी आहे,अशी भावना शिवलिंग काटेकर,अथर्व मोटे आणि विठ्ठलराव माळी यांनी व्यक्त केली.या संमेलनाला नवव्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ‘एक ती’ चित्रपटाचे मुख्य अभिनेते,कवी तुषार बैसाने हे ही उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती शुभमच्या वतीने संस्थेचे केंद्रिय सचिव संदीप देशमुख, सचिन तायडे,कवी राहुल भगत, प्रा किरण वाघ मारे अनुवादक दीपक माहितकर, प्रा. वर्षा कावरे आनंदराव गोटकडे गणेश मेनकार प्रसिध्दीप्रमुख दिनेश छबिले यांच्या समितीने चारही मान्यवरांच्या नावांची घोषणा केली.