वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
मुंबई : ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केले. सह्याद्री अतिथीगृहात विविध
कलाकारांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
या विषयात काम करणाऱ्या श्रीमती अलका कुबल यांच्याशी
चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्रपटासंदर्भातील कल्पनांची देवाणघेवाण केली.
हा चित्रपट माहितीने अचूक होण्यासाठी तसेच दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल, असेही यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढच्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचे प्रकाशन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
About The Author
Post Views: 67