सरकारने घेतला निर्णय
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
दिल्ली,: मोदी सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये बुधवारी झालेल्या एका बैठकीत 5जी स्मार्टफोनमध्ये लवकरात लवकर 5जी सपोर्ट सॉफ्टवेअर अपडेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 5 जी स्मार्ट फोनची उपलब्धता वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे. यासोबतच 10 हजार रुपयांवरील प्रत्येक फोनमध्ये 5 जी असायला हवे असेही बजावण्यात आले. यामुळे काही कंपन्या 4जी फोन बनविणेदेखील बंद करण्याची शक्यता असल्याने 10,000 रुपये किंमत असलेले 5 जी फोन बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 4जी स्मार्टफोनचे उत्पादन थांबवावे, असे दूरसंचार विभागाने बैठकीत सुचविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्मार्टफोन कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10 हजार रुपयांपेक्षा अधिक किम असलेल्या स्मार्टफोनची निर्मिती थांबवावी आणि त्याऐवजी 5जी स्मार्टफोनची निर्मिती करावी.
यामुळे युजर्सलाही 4जी वरून 5जी स्मार्टफोनवर शिफ्ट करणे सोपे होईल, असे दूरसंचार विभागाचे मत आहे.
काही कंपन्यांची अडचण
मध्यम श्रेणीतील ग्राहकांना 50 कनेक्टिव्हिटी असलेले स्मार्टफोन उपलब्ध करून दिले जातील. यामुळे या फोनची किंमत वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, या निर्णयामळे काही स्मार्टफोन कंपन्यांची अडचणही होण्याची शक्यता आहे. 4जीवरून 5जीमध्ये शिफ्ट करण्यासाठी त्यांना हार्डवेअर सपोर्ट आणि गुंतवणुकीची आवश्यकता भासू शकते.