वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
जगभरात पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक रागीट असून, भारतीय महिलांमध्ये रागीटपणाचे प्रमाण जास्त असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.
‘गॅलप वर्ल्ड पोल’ने हा ग्लोबल इमोशनल अहवाल तयार केला आहे, ज्यात गेल्या दशकात लोकांची बदलती मानसिक स्थिती आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी एक मोठा अभ्यास करण्यात आला. २०१२ पासून ते २०२१ दरम्यान लोकांची मन:स्थिती हैराण करणारी होती. या अभ्यासासाठी १५० देशांचा समावेश केला होता, ज्यात १२ लाख लोक या सर्व्हेचा भाग बनले.
गॅलपच्या सर्व्हेनुसार, एका दशकाआधी महिलांचा राग पुरुषांच्या बरोबरीत होता, पण सध्या तो सहा टक्क्यांनी वाढला आहे. हे तर झाले जगातील महिलांबाबत ! भारत आणि पाकिस्तानातील महिलांबाबत सांगायचे तर सर्व्हेचे निष्कर्ष विचार करण्यास भाग पाडतात. कारण, जगाच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तानमधील महिलांमध्ये रागची भावना दुप्पट आहे. आकडेवारीनुसार समजून घ्यायचे तर जिथे जगात महिलांच्या रागाचा स्तर पुरुषांच्या तुलनेत सहा टक्के आहे. तेच भारत आणि पाकिस्तानातील महिलांमध्ये हा १२ टक्के जास्त आहे.
२०१९ मध्ये आलेल्या कोरोना महामारीने लोकांच्या भावनात्मक बदलात एक मोठी नकारात्मक भूमिका निभावली. लोकांमध्ये नैराश्य, उच्च तणावाची स्थिती आणि रागाची समस्या वेगाने वाढत आहे. गेल्या दशकातील शेवटच्या दोन वर्षांत महिलांच्या रागात वाढ झाली आहे. जगातील जास्तीत जास्त महिला आता जास्त शिकलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे आणि म्हणून त्या चुकीच्या व्यवहारावर लगेच व्यक्त होतात, पण या बदलत्या काळातही पुरुषप्रधान विचार शिल्लक आहेत. तरीही जास्तीत जास्त घरांतील महिला कुठे ना कुठे बिनधास्तपणे आक्रोश व्यक्त करीत आहेत.
नोकरीत उच्च पदाचा विषय असो वा पगाराचा विषय असो. महिलांना कमी समजणे किंवा त्यांच्यासोबत भेदभाव करणे त्यांच्या रागाचे मुख्य कारण आहे. महिलांमध्ये वाढत असणाऱ्या रागाला चुकीचे म्हणणे सोपे आहे, पण कारणाकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. घर असो वा बाहेर प्रत्येक ठिकाणी महिलांना कमी लेखणे दशकांपासून नुकसानकारक ठरत आहे. बदलत्या काळात महिला त्यांच्या हिंमतीने पुढे जात आहेत, पण हा आत्मविश्वास त्यांच्यात कुठेना कुठे राग निर्माण करीत आहे.