वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
कितीही जग पुढे गेले तरी, काही गोष्टी ‘जुने ते सोने’ असे म्हणून आपण वापरत असतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे माठ, माठातील पाणी पिल्यावर जी तहान शांत होते, ती फ्रिजमधल्या किंवा फिल्टरच्या पाण्याने होत नाही. माठातील पाणी आरोग्यासाठी लाभदायक असते. खरंतर लोक आधुनिकतेकडे वळतात. तसेच ते जुन्या गोष्टीही वापरतात. हल्ली प्लास्टिक बॉटलऐवजी मातीचे माठ तांब्याचे भांडे अशा वस्तूही प्रचलित आहेत. त्यातील पाणी आरोग्यास चांगले असते. कारण नैसर्गिक आहे. हे आपल्या मनावरच बिवलेले गेले आहे. जेव्हा आपण फ्रिजमधील किंवा फिल्टरचे पाणी पितो तेव्हा तहान भागते, पण ती तात्पुरती असते. पण तेच जर आपण माठातील पाणी पिले तर मातीच्या हलकसा सुगंध आणि थंड पाणी याने आपली तहान नक्कीच भागते. सध्या फिल्टरचे पाणी घरोघरी वापरण्यात येते ते पाणी योग्य असते की नाही, त्याची शुद्धता व ते आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक असते, याबाबत सांगणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
पाण्याचे फायदे
मातीच्या भांड्यात हवामानानुसार पाणी असते. ते कोणत्याही भांड्यात नसते. मातीच्या भांड्यातील खनिजांमुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. खोकला किंवा सर्दी असलेल्या लोकांनीही मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यास अपाय होत नाही. मातीच्या भांड्यात शरीरातील ग्लुकोज राखण्यासाठी आवश्यक असलेले पोषक जीवनसत्वे असतात. ही जीवनसत्वे शरीर शुद्ध करत असल्यामुळे स्टोनपासून बचाव होतो. गर्भवती महिला किंवा लहान मुले यांनी माठातील पाणी पिले तर त्यांना त्रास होत नाही.