वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
ॲक्युप्रेशर ही एक प्रकारची थेरपी आहे. ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये मानवी शरीरात असलेल्या प्रेशर पॉईन्टवर बोटांनी किंवा विशिष्ट अशा उपकरणाने दाब दिला जातो. या दबावामुळे न्यूरॉनमधील ताण कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो.
आपल्याला आश्चर्य व उत्सुकताही वाटत असेल की, एवढ्या हलक्या हाताने व फक्ता स्पर्शाने रोग कसा काय ठीक होऊ शकतो? ॲक्युप्रेशर ‘ऊर्जा सिद्धांत’ यावर आधारित कार्य करतो. या दबाव द्यायच्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणच्या ऊर्जा स्तरावर कंपन निर्माण करतो. हे कंपन (स्पंदन) हळूहळू दबावाच्या क्षेत्रातून शरीरात चोहीकडे पसरते. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये दगड टाकल्यावर पाण्यावर तरंगलहरी उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेल्या विशिष्ट बिंदूवर दाबल्याने एक कंपन व ऊर्जेचे तरंग तयार होतात. यामध्ये उच्च ऊर्जेचा तरंग निर्माण होतो. यालाच आपण जेवऊर्जा असे म्हणतो. यामुळेच आपले शरीर सतत कार्यरत राहते. मानवामध्ये असलेल्या याच ऊर्जेला आपण जैवऊर्जा म्हणतो. हेच आपल्याला जिवंत व मृत व्यक्तीततील फरक दर्शवतो. ही दाब देण्याची क्रिया कोणत्याही निर्जीव वस्तू किंवा व्यक्ती वर कार्य करू शकत नाही. कारण, त्यात ऊर्जेचा स्तर नसतो.
ॲक्युप्रेशरचा वापर केल्याने शरीराला अनेक मार्गाने फायदा होतो. काही आजारांमध्ये तर ॲक्युप्रेशरचा वापर अगदी महत्त्वाचा मानला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर, मनगटावर करण्यात आलेल्या अॅक्युप्रेशरने उल्टी आणि चक्कर यांसारख्या आजारांवर त्वरीत आराम मिळतो. यासोबतच सर्जरीनंतर हाडांमध्ये दिला जाणारा एनेस्थिशियाचा डोस मोशन सिकनेस, गरोदरपणातील काळ आणि केमोथेरपीनंतरही ॲक्युप्रेशर थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो.
संपूर्ण शरीरात अॅक्युप्रेशरचे १०० हून जास्त पॉइन्ट आहेत. हे पॉइन्ट शरीराला आराम देण्याचं काम करतात. विशेष म्हणजे या पॉइन्टची अनेक नावंही आहेत. पण आज आम्ही अशा नावांबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल अॅक्युप्रेशरचे तज्ज्ञ अधिक बोलताना दिसतात. पहिलं आहे लार्ज इन्टेस्टाइन ४. हा पॉइन्ट हाताचा अंगठा आणि तर्जनीच्या (अंगठ्या बाजूचं बोट) मध्ये असतो. दुसरा आहे लीवर ३. याचा पॉइन्ट पायाच्या वरील भागात अंगठा आणि बाजूच्या बोटाच्यामध्ये असतो. तिसरा पॉइन्ट टाचेच्या साधारण तीन बोट वर असतो. हे तीन प्रेशर पॉइन्ट सर्वात जास्त वापरले जातात.
ॲक्युप्रेशर उपचार करण्यासाठी शरीराच्या ज्या भागावर दाब / उपचार दिला जातो. त्याला ॲक्यु-बिंदू म्हणतात. हे ॲक्यु-बिंदू माणसाच्या शरीरात असंख्य आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले, तर मानवी शरीर हे अखंड ऊर्जेचे दुसरे नाव आहे. ज्यामध्ये अखंड कार्य करीत राहण्याची शक्ती आहे. ही शक्ती. सर्व सजीव प्राण्यांत जसे की, वृक्ष, पशू-पक्षी, जलचर प्राणी आणि मनुष्य प्राण्यातदेखील चेतना रूपात आहे. दुखऱ्या भागावर हलका दाब देऊन, स्पर्श करून बघून ही जीवन ऊर्जा शरीराच्या चेतनेवर / सहज-सरळ उपचार करण्याची पद्धत आहे. थोडक्यात, आपण असे म्हणू शकतो की, ॲक्युप्रेशर ही एक अशी चिकित्सक उपचार पद्धत आहे की, ज्यामध्ये ॲक्यु- बिंदूवर हलक्या हाताने दाबल्यास ऊर्जा संतुलित होते. अर्थात, रोगावर इलाज होतो.
माणूस मग तो चीन, भारत, अमेरिका किंवा गावात, जंगलात, आदिवासी रूपात राहत असला, तरी त्याच्या शरीरात ऊर्जा ही असतेच. ज्या ज्यावेळी माणसाला आपल्या ऊर्जेची ओळख पटली त्या त्यावेळी माणसाने त्याला वेगवेगळ्या रूपात प्रकट केले. कधी महाभारतातील वेदांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे भीष्म पितामह बाणांच्या टोकावर झोपणे, तर कधी बौद्ध भिक्षूंना या ज्ञानाची ओळख पटून ते चीन प्रांतात गेले व तेथे त्यांनी ते विकसित केले. लहान मुले खेळता खेळता अंगठ्यावर डोळा, नाक, कान काढून बाहुला-बाहुलीचे खेळ खेळायचे. ते एक अंगठ्यावरील चेहऱ्याच्या उपचार बिंदूचे संकेत होय. या पद्धतीचा शोध कसा, कधी आणि कुठे लागला हे ज्ञात नाही. परंतु, ज्या कुणी माणसाने प्रथम या ऊर्जेचा अनुभव घेतला व उपचार केला त्यालाच याचे पूर्ण श्रेय जाते. आजदेखील ॲक्युप्रेशरच्या या उपचार पद्धतीवर विशेष प्रयोग जगाच्या कानाकोपऱ्यात केले जात आहेत. या ऊर्जेची जाणीव होण्यासाठी आपल्या शरीरातील असंतुलन / आजारावरील उपचार आणि शरीर कायम निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारे कार्य होत आहे. काही जण या दबावाच्या उपचार पद्धतीला ‘ॲक्युप्रेशर’ म्हणतात, तर काही ठिकाणी या उपचार पद्धतीत सुई टोचून उपचार केल्याने याला ‘ॲक्युप्रेशर’ या नावाने ओळखतात. कधी कधी या अँक्यु बिंदूवर ऊर्जा संतुलित करण्यासाठी रंगाचा उपयोग केला जातो. याला रंग चिकित्सा असे म्हणतात. कधी कधी छोट्या चुंबकाच्या मदतीने ऊर्जेच्या लहरी उत्पन्न करून उपचार केले जातात. याला चुंबकीय चिकित्सा म्हणून ओळखतात. अँक्युप्रेशरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात. यात चायनीज ॲक्युपंक्चूर, सुजोक ॲक्युप्रेशर, आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर, इलेक्ट्रो ॲक्युप्रेशर, यौगिक ॲक्युप्रेशर, रिलेक्सोलॉजी वगैरे प्रकार येतात. विशेष म्हणजे, शारीरिक ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी त्यामध्ये काही हालचाल करावी लागते. जसे दाब देऊन सुई टोचून, रंग, चुंबक, मेथी दाणे लावणे वगैरे तंत्र वापरून केले जातात.