अकोला – नववर्षदिनी प्रकाश जोशी यांच्या अमृतवेल पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी नारायण अंधारे तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार महेंन्द्र कवीश्वर अशोकराव सकळकळे प्रा. राऊत हे होते. प्रतिभा टोपले यांच्या भावपूर्ण भक्तीगीताने सोहळ्याची सुरुवात झाली. साहित्यिकांनी वेदनांना वाचा फोडावीं असे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर यांनी आपल्या मनोगतात सांगितले तर अशोक सकळकळे यांनी प्रकाश जोशी यांचे भावविश्व विशाल असल्याची भावना व्यक्त केली.डॉ सत्यनारायण बाहेती यांनी अमृतवेलमध्ये कथा, काव्य आणि अध्यात्म असा त्रिवेणी संगम झाल्याचे सांगितले. संध्या संगवई पसायदानामृत संपादक प्रा. सुरेश कुळकर्णी, योगाचार्य भगवंतराव गावंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनुष्का टोपले यांनी यथोचित सूत्रसंचालन केले सोहळ्याला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अतिरिक्त मुख्य सचिव अभि. विनायकराव पांडे, विदर्भ पश्चिम विभागाचे सचिव डॉ. सुहास काटे माजी अध्यक्ष अशोक कुळकर्णी, महानगर समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुळकर्णी, प्रा. यादव वक्ते उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार, जिल्हा समन्वय समिती सचिव प्रमोद देशमुख, प्रभाकर देशपांडे, अरुण उपाध्ये, आनंद जोशी, अरुण जोशी, मिलिंद जोशी, शितल काटे, शकुन परांजपे, निशा कुळकर्णी, निलेश जोशी आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती. अवनी टोपले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. प्रसन्न टोपले, आभा टोपले, व निलेश जोशी यांनी सोहळ्याचे यथोचित नियोजन केले.सध्या संगवई आणि ज्योती जोशी यांच्या सुश्राव्य पसायदान गायनाने सोहळ्याची सांगता झाली.