पुढील काळात पावसाळा सुरू होणार आहे. हा काळ कीटकजन्य रोगांच्या प्रसारास अनुकूल असून मुख्यतः याच काळात कीटकजन्य आजार जसे हिवताप, डेंग्यूताप व चिकुनगुन्या ताप इत्यादी या आजारांचा प्रसार वाढतो. या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी […]
कासव घरात फीशपॉटमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा!
कासव आणि ससा यांची कथा तुम्ही ऐकली असेलच. या कथेत कासव विजेता आणि ससा हरणारा आहे. वास्तविक कासव हे आपल्या परिसंस्थेसाठी खूप महत्वाचे आहे. या कारणास्तव दरवर्षी २३ मे रोजी जागतिक कासव दिन साजरा केला जातो. दिवसाची सुरुवात अमेरिकन कासव रेस्क्यूने केली होती. या दिवसाशी संबंधित सर्व महत्वाची माहिती सदर […]
गौतम बुद्ध : समाजक्रांतीचे प्रणेते
भारतवर्षामध्ये ज्ञानक्रांती घडवून आणणारा ऋषितुल्य तपस्वी म्हणून भगवान गौतम बुद्धांचे जीवनकार्य अजरामर ठरले आहे. पौर्णिमेच्या दिवशी जन्म, महानिर्वाण आणि केवळ ज्ञानप्राप्ती हा अद्भुत योग या महामानवाच्या जीवनात घडून आला. भगवान बुद्धांनी दिव्यज्ञानाने सबंध जगाला प्रकाशमान करून टाकले आणि भारतमातेचा हा सुपुत्र सामाजिक न्याय आणि समाजक्रांतीचा उद्गाता ठरला. आज (२३ मे) […]
जाणून घ्या, ग्रीन टी विषयी…
ग्रीन टी हा पोषक घटकांचा खजिना मानला जातो. म्हणूनच बहुतेक आरोग्यतज्ज्ञ ते पिण्याची शिफारस करतात. मात्र, ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ माहीत असणे आवश्यक आहे; अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. याबाबतची ही तज्ज्ञांनी दिलेली माहिती… ग्रीन टी पिण्याचे लाभ : कर्करोग प्रतिबंध : कॅन्सर हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. […]
अडचणीतील बँका, पतसंस्था दलदलीतून बाहेर का निघत नाहीत?
पतसंस्था किंवा बँकिंग हे काळजीपूर्वक करायचे पूर्णवेळाचे काम आहे. राजकारण करता करता पतसंस्था चालवू म्हटले की, ठेवीदारांसह संचालक मंडळ बुडालेच ! अलीकडेच अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत दोन खळबळजनक घटना घडल्या. श्रीनाथ मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष पोपटराव शेवाळे यांनी केलेली आत्महत्या आणि संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे, त्यांचे […]
धन की बात !
एप्रिल महिना लागला की पहिल्या दिवशी काहीतरी लोणकढी थापा मारून मित्रांना फसवणे आणि दुरून त्यांची फजिती पाहणे यात असुरी नाही पण बालसुलभ आनंद असायचा. त्या थापा सुचणे आणि निरागस भाबडा भाव चेहऱ्यावर ठेवून मित्राला सांगणे ही अभिनयाची प्राथमिक कार्यशाळा असायची तेव्हा! आज अमुक सर सिनेमाचे, सर्कसचे पास देणार आहेत किंवा […]
त्वचाविकार – खरूज कारण आणि उपचार
मानवी शरीर हे अत्यंत संवेदनशील आहे. आपल्या याच शरीराचं संरक्षण आपली त्वचा करत असते . अनेक प्रकारच्या विषाणूजन्य, जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य आजारापासून संरक्षण देणारे संरक्षक कवच म्हणजे आपली त्वचा असते परंतु अनेकदा अस्वच्छतेमुळे काही विशिष्ट प्रकारच्या विषाणूंचे आपल्या बाह्य त्वचेवर आक्रमण होते आणि आपल्याला त्वचेचे विकार होतात. शारीरिक अस्वच्छतेमुळे बहुतांशी […]
काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा होणार जीर्णोद्धार
जम्मू काश्मीर येथील आनंतनाग जिल्ह्यातील 8 व्या शतकातील मार्तंड सूर्यमंदिराचा जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्यात येणार आहे. हे मंदिर भारतातील सर्वांत जुने सूर्यमंदिर आहे. सम्राट ललितादित्य मुक्तपाद यांनी हे मंदिर उभारले होते. त्यानंतर मध्य युगात मुस्लिम शासक सुलतान सिंकदर शहा मिर याच्या आदेशावरून हे मंदिर उद्धवस्त करण्यात आले होते. या मंदिराचे […]
वऱ्हाडी कथा : पंगत
संज्या हा आकोला जिल्ह्यातल्या माना या गावाचा. एक वलीतातला सधनं कास्तकार म्हनूनसन्या गावात त्याची ओयख. त्याचं मॅट्रीक लोग मान्यातचं शिक्षण होयेलं राह्यते.अन बारावी लोग तालुका मुर्चापूरले. त्याले नवकरी करनं आवळतं नसल्यानं . थो बारावी नंतर शिक्षण सोळूनं देते .अन वावराकळे लक्ष द्याले लागते. त्याची दा एक्कर जमीनं वलीता खालची असते. […]
चाचेगिरीचा अड्डा – सोमालिया
आफ्रिका खंडात उत्तर-पूर्व भागात असलेला सोमालिया हा एक छोटा देश. त्याचा उत्तरेकडील एक भाग गेंड्याच्या शिंगाप्रमाणे असल्याने सोमालियाला ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ असे नाव आहे. प्रत्येक देशाचे काहीतरी एक वैशिष्ट्य असते. या छोट्या सोमालिया देशाचे वैशिष्ट्य म्हणजे जगात एकूण जेवढी समुद्री चाचेगिरी चालते, त्याच्या नव्वद टक्के चाचेगिरी सोमाली पायरेट्स (चाचे) करतात […]
