यूजीसीने जारी केल्या ४२ अधिसूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अनेक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये नेट आणि पीएचडी न करताही प्राध्यापक होण्याची संधी दिली आहे. यूजीसीने यासंदर्भात ४२ अधिसूचना जारी केल्या. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह त्यांचा सीव्ही महाविद्यालयाच्या ईमेल आयडीवर पाठवावा लागेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या पृष्ठभूमीवर यूजीसीने एक नवीन […]
मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ना. गिरीष महाजन
अमळनेर : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री ना. गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या पदाधिकारीशी चर्चा केल्यानन्तर मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी व कार्यकारी मंडळाने ही निवड केली आहे. त्याचप्रमाणे संमेलनाचे निमंत्रक म्हणून मदत व पुनर्वसन, […]
बॅटरीशिवाय चालणारी जगातील पहिली ई-बाईक फ्रेंच कंपनीने केली विकसित
पॅरिस : फ्रेंच कंपनी एसटीईई ने बॅटरीशिवाय चालणारी ई-बाईक विकसित केली आहे. उद्योजक अॅड्रियन लेलिव्हरे यांनी त्याची रचना केली आहे. लेलिव्रे यांनी असा युक्तिवाद केला की बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम आणि इतर दुर्मिळ पृथ्वी घटकांचा वापर होतो. तसेच, त्यांच्या उत्खननादरम्यान पर्यावरणाची हानी होते. त्यामुळेच कंपनीने लिथियम बॅटरीऐवजी सुपर कॅपॅसिटरवर चालणारी ई-बाईक […]
जागतिक बचत किंवा काटकसर दिन : थेंबे थेंबे तळे साचे….
(जगभर काटकसर किंवा बचत दिन ३१ ऑक्टोबरला साजरा होतो. भारतात तो ३० ऑक्टोबरला साजरा होतो. या दिनाच्या निमित्ताने बचतीचा घेतलेला आढावा व या दिनाचे महत्त्व ) जागतिक बचत बँकेत १९२४ साली मिलान इटली येथे पहिली काँग्रेस भरली होती. या काँग्रेसमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर १९२४ ला जागतिक बचत किंवा […]
विदर्भाची कुलस्वामिनी माँ चंडिका देवी संस्थान कुरणखेड
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर क्र ६ कुरणखेड हे संमिश्र वस्तीचे गाव आहे. याच गावाच्या बसस्थानकापासून दक्षिणेस काटेपूर्णा नदीच्या काठावर दोन कि.मी. अंतरावर उंच टेकडीवर हिरवळ वृक्षांच्या छायेत या चंडिका मातेचे मंदिर असून तेथे मातेचे वास्तव्य आहे. याच ठिकाणास ढगा देवी म्हणून पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात आणि विदर्भातही ओळखले जाते. हे […]
उष्णताही साठवणे शक्य; आयआयटीचे संशोधन
पडलेल्या सुर्य प्रकाशापैकी ८७ टक्केहून अधिक प्रकाश वापरण्यायोग्य ऊष्मा ऊर्जेत रूपांतरित करणारे संशोधन आयआयटी मुंबईने केले आहे. झेंडूच्या फुलासारखी नॅनो रचना असलेले हे मटेरियल सौर ऊष्मा शोषण्यात अधिकवेगवान असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले आहे. ही उर्जा सामान्य तापमानाला असलेली हवा ६० डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करता येते आणि कोणत्याही प्रकारचा धूर […]
कोरोना लस शोधणारे शास्त्रज्ञ कॅटलिन, वेसमन यांना नोबेल
वृत्तसंस्था मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानाद्वारे कोरोना लस संशोधनात मोलाची कामगिरी बजावून जगाला मृत्यूच्या कराल दाढेतून बाहेर काढण्यात योगदान दिलेले शास्त्रज्ञ कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. १ दशलक्ष डॉलर्सच्या रोख रकमेसह स्मृतिचिन्ह देऊन उभयतांना १० रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यावेळी कोविड- १९ ने जगाला विळखा […]
चाण्यक्यनीति
रूप आणि तारुण्य या दोन्हीही गोष्टींनी संपन्न असून उच्च कुळांत जन्म असूनही जर मनुष्य विद्याविहीन असेल तर तो शोभून दिसत नाही. ज्याप्रमाणे सुगंध नसलेले चाफ्याचे फूल असते त्याचप्रमाणे हा असा मनुष्य असतो. ही अशी स्थिती आजकालही दिसून येते. निसर्गात तयार होणारी सोनचाफ्याची फुले कितीही सुंदर आणि सुगंधी असली तरी […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात दै देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश
अकोला- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या कोरोना काळात स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त करणाऱ्या पत्रकारांच्या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत अकोला येथील दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक ,एक आक्रमक शेतकरी नेते श्री. प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रवेश झाला आहे.ते इंडीयन लॕंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी […]
निद्रानाश !
कुंभकर्णाचा ब्रह्मदेवाला वर मागताना संभ्रम झाला. त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागितले आणि तो 6 महिने झोपून राहायचा. हल्ली आपली मात्र निद्रा नीट होत नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी आपला गोंधळ उडतो, आपण संभ्रमात राहतो. जीवनातील एक तृतियांश वेळ झोपेत जाते. ती जीवनातील अती आवश्यक गरज आहे, पण बरेच लोक निद्रेला प्राधान्य देत […]
