काव्यभीमायन
डॉ.विठ्ठल भिकाजी वाघ, अकोला, मो. : 9822726347
दोन शब्द ….।
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे अशा वादळाचं लौकिक नाव, जे उद्ध्वस्त करून गेलं, हजारो वर्षांच्या जुलमी मनुवादी व्यवस्थेला नि प्रस्थापून गेलं समताधिष्ठित मानवतावादी लोकशाही व्यवस्थेला. दलितांचा, उपेक्षितांचा नव्हे, सर्व विद्वान पंडितांचा बापच होता तो. म्हणूनच आदराने संपूर्ण जग त्यांना बाबासाहेब म्हणून अभिवादन करते. मानवी देहसिमेत सामावलेला तो विशाल हिमालय होता. अथांग सागर होता. त्यात सूर्याचं तेज होतं, चंद्राची शीतलता होती. वायाची चंचलता होती, आणि अग्नीची दाहकता होती. प्रज्ञा, शील, कस्र्णेचा तो उपासक होता. अलौकिक सामर्थ्य असलेला हा असिम महामानव शब्दांत किंवा काव्यांत सामावणं शक्यच नाही.
हजारो अनुयायांनी त्यांच्यावर अनेक लेख लिहिले, ग्रंथ निर्मिती केली, गीते लिहिली, कवने रचली व अजूनही अनेक लोक या प्रज्ञासूर्याची शब्दपूजा बांधत आहेत… अशीच या युगपुस्र्षाची काव्याराधना करण्याची प्रेरणा झाली वहाडी भाषा शब्दप्रभू डॉ.विठ्ठल वाघ यांना. त्यातूनच साकार झाले आहे “काव्यभीमायन”.
हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र नव्हे, तो आहे बाबासाहेबांच्या कार्याचा, त्यांच्या जीवनातील ठळक घटना – प्रसंगांचा, विचारांचा, तत्त्वज्ञानाचा छंदबद्ध शब्दालेख. यात विठ्ठल वाघांचं स्वतःचं असं काहीही नाही. बाबासाहेबांप्रति असलेल्या अपार श्रद्धेपोटी प्रकटलेले हे अखंड काव्य आहे.
बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारित हजारो अभिवादनात्मक कवितांचा समावेश असलेल्या विश्वविक्रमी “समतेच्या महाकाव्यात” डॉ.विठ्ठल वाघ सरांची कविता असावी, म्हणून मी त्यांच्याकडे कविता घेण्याकरिता गेलो. “आधी लिहिलेली कविता शोधून देण्यापेक्षा, नव्यानेच कविता लिहून देतो दोन तीन दिवसात” , असे सर बोलले. दिवसाकाठी तीन-चार कडवी लिहून मला व्हाट्स अॅप द्वारे पाठवू लागलेत. कविता तयार झाली. तरी काव्यलेखन मात्र अखंडपणे सु डिग्री राहिलं. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांना खुणावू लागलेत. शब्दरूप घेऊन साकार होऊ लागलेत. असा हा प्रवास दोन-तीन महिने अव्याहतपणे सु डिग्री राहिला. त्यातून सुमारे पाचशे कडवी तयार झालीत. “काव्यभीमायन” आकाराला आलं.
“काव्यभीमायन” हा कवितासंग्रह नाही. ते एक अखंड काव्य आहे. भीमायन, जात, धर्म, प्रबोधन, लोकशाही, भाषा, चिंतन- मंथन, युद्ध, पाकिस्तान आणि मुसलमान, कामगार, शेती, गांधी व प्रेरणा या उपशीर्षकामधून गुंफलेलं हे एक अद्वितीय पद्यशिल्प होय. ज्यांच्या श्वासाश्वासांत, नसानसांत, रक्ताच्या प्रत्येक पेशी – पेशींत काव्य स्र्जलेलं आहे, भिनलेलं आहे, अशा कविवर्य विठ्ठल वाघ यांच्या प्रतिभेतून प्रकटलेली अप्रतिम काव्यलेणीच म्हणावी ती. रसिक वाचक, काव्यप्रेमी मित्रांना ती निश्चितच आवडेल. काव्य भीमायनाच्या रुपाने मराठी साहित्य कृतीमध्ये एक गौरवशाली भर पडेल, असा विश्वास आहे.
प्रकाश अंधारे, (संपादक, समतेचे महाकाव्य), विशेष कार्य अधिकारी, मा.ना.बच्चुभाऊ कडू, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
n n n
भिमायन
चिखलाचे कैसे जगणे, ना रूप नसे आकार,
त्यातून अजिंठा लेणी, केलीस तू साकार.
बुद्धीचे वैभव बघता, डोळे दिपून जाती,
अलौकिक पांडित्याची, पसरे दिगंती कीर्ती.
अस्पृश्यांविषयी निखळ, हृदयी एकच तळमळ,
जाज्ज्वल्य राष्ट्रहिताची, रक्तामधूनी कळवळ.
प्रश्नाचे विश्लेषणही, कठोर निष्ठूर वाटे,
प्रहार मर्मावरचा, वेशीवर टांगे खोटे.
भाषणा महाभूषण, जोड लाभली कृतीची,
सत्याग्रहाने पेटून, ज्योती उठली क्रांतीची.
कालविसंगत टाळत झाला, नव्या युगाचा पाईक,
वैज्ञानिक दृष्टीपायी, तू ठरला मूर्तिभंजक.
जीवनमूल्यांसाठी, पदोपदी संघर्ष
झुंजार लढा झालेले, लढवय्ये आयुष्य.
ज्ञानाची विज्ञानाची, तू तुकयाची गा गाथा
तुझ्यात बघूनी बुद्धी, बुद्धी टेकवी माथा.
कल्याणा मानवतेच्या, सदैव तत्पर युद्धा
काळाने पाहिला ना, ऐसा कणखर योद्धा.
युगंधरा तू युगकर्ता, नव्या युगाची आशा
तेजस्वी शब्दामधूनी, ओजस्वी वदला भाषा.
वक्तृत्वाचा अखंड ऐसा, प्रेरक ओघ प्रवाही
मर्त्य जीवांना देई, जीवंतपणाची ग्वाही.
अन्याय सारण्यासाठी, झुंज दिली तू न्याय्य
दुखण्यावर दिलेला तू, संविधानातून उपाय
अविश्रांत परिश्रम तुझ्या, पाचविला पूजलेले
क्षण विश्रांतीचे काही, तुला न मानवलेले.
स्वतंत्र निर्भय बाणा, विवादात ना हरला
विरोधकांच्या लेखी तोही, क्रांतीकारक ठरला.
सुसूत्र विचार भाषण, भारदस्त ठरणारे
भीडभाड सारून सारी, न्यायास्तव झटणारे.
मनोनिग्रह कार्यशक्ती, वीर्यशाली धैर्य होते
विजिगिषु बुद्धिवैभव, नैसर्गिक हे देणे होते.
राजकीय गुलामी होती, सामाजिक पाशही होता
दोहीतून मुक्तीसाठी, जीव पाखडीत होता
धन किंवा बलशक्तीही, पाठीशी नव्हती काही
स्वातंत्र्य मिळाया तरीही, केली अखंड लढाई.
संघटित व्हावा देश, दृढ होवो लोकशाही
दुसरे तव डोळ्यांत, स्वप्नच नव्हते काही.
सर्वस्व शक्ती ओतून, निर्भयतेने लढला
प्रतिहल्ले उपमर्दाने, लढा कधी ना अडला.
अनभिषिक्त ऐसा राजा, तू दलितांचा ठरलेला
देताना तोंड विरोधा, तू पुस्र्नही उरलेला.
निंदेची कधी न पर्वा, विरोध जुमानला नाही
स्वातंत्र्य आमुचे म्हटला, कोणाची अमानत नाही.
तू वारस सिद्धार्थाचा, शूद्रांचा दास्यविमोचक
लढा अहिंसक लढला, कधी न झाला याचक.
सैतान ठरवले कोणी, गोयांचा हस्तक म्हटले
देशद्रोहाचे काटे स्र्तले, परी पाऊल न मागे हटले.
देशाच्या इतिहासाची, लिहिली नवीन पाने
आवळत्या कंठातूनही, गायीले मुक्तीचे गाणे.
कुत्सितांनी ब्रह्मद्वेष्टा, भीमासूर संबोधले
मुक्तीच्या वाटेवरची, अडखळली ना पाऊले.
दारावरी लक्ष्मी उभी, धनाचा पाऊस होता
मोह तो जीवास नव्हता, समतेचा हव्यास होता.
ध्येयनिष्ठा बुद्धिमत्ता, अविरत संघर्षाने
तू मिळवित गेला स्थाने, अपुल्या कर्तृत्वाने.
सनातनी कौरवासंगे, मुत्सद्दी कृष्ण तू लढला
समताधिष्ठित तेव्हा, स्वतंत्र ध्वज फडफडला.
केळकरांनी गौरव, मुक्तपणाने केला
आंबेडकर दलितांचा, अनभिषिक्त राजा झाला.
कृषकांचे भूमीहिनांचे, जाहला तुम्ही पुढारी
राबत्या कामगारांची, दु:खही जाणली सारी.
लोकांत जाऊनी त्यांचे, प्रश्न जाणले सारे
उत्तरे मिळाया गेले, ठोठावीत राजद्वारे.
दलितांच्या दुखण्याची तू, ऐकली कस्र्ण किंकाळी
होळीत भाजले त्यांना, द्यायला नवी दिवाळी.
थरारून सोडणारा, स्फूर्तिदायक भाष्यकार
मुर्दाडाही जिवंत कस्र्नी, जाई केलेला जागर.
वादविवादातूनी, काँग्रेसवर होई मात
टिकणार कसा कोणी, बिनतोड युक्तिवादात.
शासन कर्त्यामधले, दोष दाखवित आले
उपयोगी सूचनामधुनी, जनहितच साधत गेले.
वैयक्तिक अन् देशहितास, संघर्ष जेधवा झाला
प्राधान्य दिले तू, केवळ देश हिताला.
जोवर जीव जीवात, अस्पृश्या अंतर नाही
प्रसंगी देशाहूनही, दलितांचे हितच पाही.
स्वत:चे हित सदैव, दुय्यम मानत आला
स्वहिताकडे नेणारा, तो मार्ग न चालत गेला.
शक्ती बुद्धीचा वापर, नाही उच्च पदाच्यासाठी.
संघर्ष जेवढा केला, केवळ देशहिताच्यासाठी
दलितांसोबत अवघ्या, हिंदूना जागृत केले
शककर्ता पुस्र्ष म्हणुनी, सदा गौरविले गेले.
स्वातंत्र्य मानवा लाभो, म्हणून जे जे झटले
त्या थोरांमध्ये वरती, तव नाव लिहिले गेले.
गुलामीतूनी मुक्ती, स्वातंत्र्य मिळो दलिताला
तळहातावरती प्राण, घेऊन सदा लढलेला.
निष्कलंक चारित्र्याने, नैतिक धैर्यही जपले
गुणवत्तेच्या आधारे, नभ कीर्तीचे व्यापले.
पदांचे उंच आकाश, कष्टाने आले हाती
सुटली ना विनम्रतेने, पावला खालची माती.
जन्म गरिबीत झाला, गरिबीतच जीवन गेले
म्हणून गरिबांसाठी, घराचे दार ठेवले खुले.
मनात किल्मिष नाही, दुखवावे भावही नाही
जोमाचा हमला निश्चित, वृत्तीवर समाजद्रोही.
सत्तेचा मोह कधीही, मनास शिवला नाही
तयार पद त्यागाला, जर जनहित साधले नाही.
तळे ओंजळीत घेता, जगणे हो चवदार
नि:सत्व माणसे तेव्हा, गेली होऊन पाणीदार.
मूकनायका “वाचा”, दिले विद्रोहाचे भान
तेव्हा श्वासामधूनी, क्रांतीचे घुमले गान.
तू दलितांची माय, अन् शोषितांचा बाप
तव पुण्याईने जळले, मनूचे अवघे पाप.
वृत्तपत्र हे अज्ञांसाठी, ज्ञानाची असते पोई
“प्रबुद्ध” व्हाया “भारत”, रक्ताची केली शाई.
स्वतंत्र नको मतदार, बापूंनी उपोषण केले
हट्ट सोडूनी दयाघना, प्राण तयांचे वाचविले.
धर्मांचे सर्व जगातील, चिंतन मंथन घडले
युगांची प्रतीक्षा सरली, धम्माचे दार उघडले.
मानेस वाकत्या झुकत्या, ताठपणाचा पाठ दिला
सत्व हरवल्या जीवा, अस्मितेचा घाट दिला.
छाटल्या पंखासही तू, भरारीचा मंत्र दिला
थवा तेव्हा पाखरांचा, उंच अस्मानात गेला.
क्रांती मनात केली, स्फुर्ति जनात आली
दारात सौख्य घेऊन, वरात विसाव्या आली.
राख फुंकून अवघी, अंतराळा चेतविले
वठले वृक्षही तेव्हा, अवकाशी पालवले.
कुटीस तिमीरामधल्या, तेजस्वी झुंबर दिले
शतकांचे मालवले ते, प्रदीप्त अंबर झाले.
समता स्वातंत्र्याच्या, प्रदीप्त केल्या ज्योती
लोकशाहीच्या वाटा, लख्ख उजळूनी जाती.
घामाचा अन् अणूंचा, होवो न कधी अवमान
त्यासाठी जागवला तू,मातीतील स्वाभिमान.
पाण्याची लढाई केली, सामाजिक स्वातंत्र्याची
सत्य अहिंसक मूल्या, जपणाया चारित्र्याची.
काळोखातील पायाला, चालाया वाटा नव्हत्या
तेव्हा पाजळल्या गा, तू अस्मितेच्या पणत्या.
मर्त्य झाल्या संवेदना, जाणल्या तू वेदना
त्यास वाचा देऊनी, केल्या उजागर भावना.
छाटल्या पंखासहि तू, भरारीचा मंत्र दिला
थवा तेव्हा पाखरांचा, उंच अस्मानात गेला.
कोंडल्या श्वासास तेव्हा, वादळाचा वेग आला
गढ्यामढ्यांचा पाशवी, क्षणार्धात अंत झाला.
मातीत दाबल्या बिजा, आषाढाचे दान दिले
वांझ झाल्या माळराना, हिरवे हिरवे प्राण दिले.
भाषा ही नव्हती जेथे, त्या ओठी आशय दिला
तोही उन्नयनाचा, प्रबंध होऊन गेला.
प्रज्ञासूर्या अज्ञानाला, ज्ञानाचे वरदान दिले
शिवलेल्या ओठालाही, बृहस्पतिचे स्थान दिले.
मज मायभूमिही नाही, हे शल्य मनाला खुपले
जर टाळू वरचे लोणी, स्मशान खाते इथले.
वाणी ठरली युगवाणी, नव्या युगाची जननी
गुलाम करत्या बेड्या, क्षणात गेली तोडूनी.
देवपणाची जागा, व्यक्तीस द्यायची नाही
हुकूमशाहीच्या बेड्या येती, लोकशाहीच्या पायी.
स्त्रियांनाही विद्या यावी, अवघ्या व्हाव्या ज्ञानी
अबलांच्या व्हाव्या सबला, ऐसी बोले युगवाणी.
उद्बोधक लेखन असून, स्थगित झाले “समता”
अंजन घालीत आले, पाक्षिक नव्याने “जनता”.
सख्या सोबत्या आधारे, चळवळ बहिष्कृतांची
आत्मयज्ञा चेतवीले, मुक्ती व्हाया दलितांची.
स्त्रीत्वाची प्राणप्रतिष्ठा, प्राणपणाने केली
सर्जकतेने तिची, काया विस्मीत झाली.
उत्थाना लाभलेले, तव कृतिशील तंत्र
समता स्वातंत्र्याचा, प्रेरक ठरला मंत्र.
निर्वाणीच्या लढ्यामधून, बदलून गेली हवा
सनातन्यांना सुचू लागला, विचार काही नवा.
ब्रिटिश लोकसभेने, लढाऊ बाणा पाहिला
चर्चिलच्या विद्वतेला, आव्हान देत राहिला.
राजगृहाच्या तळाशी, रमाबाईचा
वरच्या मजल्यावरती, हो ज्ञानाचा तव जागर.
वेद, गीता, संत साया, प्रेषितांना नाकारले
मुक्तिदाता तू म्हणूनी, दलितांनी स्वीकारले.
सखोल धर्मशास्त्र, अवघी वाचून झाली
मुस्लीम, ख्रिश्ती, शिखांची, तत्त्वे पसंत न आली.
शासन अस्पृश्यांना, हरिजन देई नाव
विरोध केला सोडून, सभागृहाचा ठाव
पाऊस, वादळ, विजा, बाजूला सारीत वारे
कानात प्राण ओतून, तुलाच ऐकती सारे
संघराज्य होण्यासाठी, प्रस्ताव असे आलेला
दूरदृष्टीच्या मुत्सद्या तू, त्यालाही विरोध केलेला
गोलमेज परिषदेतील, ब्रिटिशांनी मानले दावे
भारतीयांनी देशाचे, रक्षण स्वत: करावे.
राज्यपालासमोर जेव्हा, तू एक निवेदन दिले
महारांना सैन्यामधले, दार उघडले गेले.
कर्तब राज्यपालांच्या, ध्यानात जेधवा आले
संरक्षण सल्लागार, समितीत नेमले गेले.
“क्रिप्स योजना” येता, विरोध केला तिजला
हिंदूंच्या राज्यसत्तेशी, ती बांधते दलिताला.
राज्याच्या प्रशासनास, लोकनेता प्रथमच आला
व्यासंग सर्व विषयांचा, गौरवान्वितही झाला.
सामाजिक बंडखोरी, सत्पात्र ठरवून गेली
मंत्र्याच्या पदलाभाने, आनंदित जनता झाली.
शाहूंचा प्रभाव दिसतो, केलेल्या कार्यावरती
हिंदू कोड अन् घटना, ही स्वप्नांची त्यांच्या पूर्ती
सुधारक शाहू विचार, सदैव प्रेरणा देई
पाऊल मराठी अवघ्या, देशाला व्यापून जाई.
शाहूंचे आर्थिक साह्य, “मूकनायका” वाचा देई
प्रबोधनाचे वादळ, गतीमान केवढे होई.
अधिष्ठान विचारांचेही, तव संग शाहूंना देई
हातास मिळाला हात, संपाया ब्राह्मण शाही.
समाजस्थितीची जाण, जबाबदारीचे भान
व्यासंगातून चालविले, परिवर्तक अभियान.
तळागाळातील लोकांची, हृदयी तळमळ सच्ची
चळवळ करून शक्ती, प्रतिगाम्यांची केली खच्ची.
निभावाया जबाबदारी, पूर्वग्रहा सोडुनी देई
विधायक कार्यासाठी, हेकाही टाळला जाई.
विभाग बघता सारे, अर्थ नियोजन व्यापार
समर्थ ऐसा दुसरा, कोणीच नसे बघणार.
दलितांच्या सेवेवाचून, दुसरे मनात नाही
मोल दुसया प्रश्नाचेही, कधी कमी मानले नाही.
धार्मिक ग्रंथावरती, टिकास्त्र सोडले जेव्हा
हिंदूंची जीवघेणीही, धमकी न मानली तेव्हा.
वक्तृृत्व प्रभावी ऐसे, विरोध मावळत जाई
माराया उठला हात, टाळी वाजवीत येई.
करती जे उपहास, ते मित्र होऊनी जाती
निंदकाही पाठविताती, घटना समिती वरती.
ग्रंथालयाचे मोल, प्राणाहून वाटे मोठे
धोक्यात जीव घालून, त्यांचे रक्षण करणे होते.
तुझ्याच संघर्षाने, इतिहास बदलला गेला
महाभारता मधुनी, पण कृष्ण वगळला गेला.
एकाच्या शिरावरती, अवघा पडला भार
पेलाया समर्थ ठरले, नावाजले शिल्पकार.
कठोर खडका जैसे, फुलासारखे कोमल
अश् डिग्री अन् रक्तात, नाते हृदय दुर्मिळ.
राजकीय क्षेत्रामधली, अलौकिक बुद्धीमत्ता
समर्थ असे चालाया, देशाचे शासन, सत्ता.
लढणारा तत्त्वासाठी, झुंझार योद्धा ठरला
जीवनाचे एकच ध्येय, अन्याय पाहिजे सरला.
साध्या सरळपणाचा, शब्दातून प्रत्यय येतो
प्रकांड पांडित्याचा, साक्षात्कारही तेव्हा घडतो.
तर्काधिष्ठित ही शैली, प्रतिपक्षावर करते वार
मुलाजा ठेवत नाही, तो थोर असो अवतार.
राजर्षी करवी लाभे, जरीपटक्याचा मान
शोधला पुढारी आपला, ज्याचा शुद्रांना अभिमान.
शाहूंना तुझ्यात दिसला, कणखर क्रांतीकारी
नेतृत्व देई जो शूद्रा, घेण्यास उंच भरारी.
जागा सभासदाची जादा, लाभे विधिमंडळातूनी
प्राप्त आणखी झाली, तू केल्या झगड्यामधुनी.
सरकारी नोकयातून, राखीव जागा दलितांसाठी
लंडनला राखीव केल्या, तांत्रिक शिक्षणासाठी.
उरात तळमळ मोठी, दलितांनी शिक्षित व्हावे
मिलिंद महाविद्यालय, उभारले तू नवे.
शिक्षण घेऊनी उच्च, जीवन व्हावे सार्थ
म्हणून दलितांसाठी, स्थापिलेस तू सिद्धार्थ.
टांगले दु:ख शुद्रांचे, वेशीवरती सर्व
तम सारून नैराश्याचा, दाखवले प्रकाश पर्व.
जागवता आत्मतेजा, त्या आत्मभानही आले
गुलाम जगणे सोडून, स्वतंत्र होत निघाले.
समशेर लेखणीचे, प्रतीक बोलके केले
बल बुद्धीचे ऐसे, अद्वैत पाहिजे झाले.
शूद्र पूर्वी कोण होते?, ग्रंथ व्यासंगातून आला
त्रिवर्णातील क्षत्रिय, चौथा शूद्र होऊनी गेला.
हरिजनांच्या उद्धारास्तव, भूतदयेचे सोंग नको
अशा महात्म्यां सोबत, काडीचा संपर्क नको.
अस्पृश्य अशा जातीत, दुर्दैव जन्मलो आहे
हिंदू म्हणून मरणे, आता जीवा न साहे.
भारतीय आपण सारे, जपायची भारतीयता
कर्नाटकी प्रांतिकता ही, गुन्हा ठरावी आता.
समान हक्कापासून, वंचित राहील जनता
अधिकार हे जाती केवळ, संस्थानिकांच्या हाता.
ब्रिटिश युद्धानंतर, देतील कोणता दर्जा
हितकारी असता आम्ही, पुरवू तयांना ऊर्जा.
केलेली राज्यघटना, अस्पृष्या सम्मत नाही
बळजोरी लागण्या केली, तर निश्चित क डिग्री लढाई.
राज्यशाशित असता, समाजवादही चाले
औद्योगिकरणांमधून, सौख्य गतीने आले.
प्राचीन संस्कृती सोबत, धोका नको कराया
अराष्ट्रीय ऐसे कोणीही, अस्पृश्यास नको म्हणाया.
यासाठी धर्म बुद्धाचा, आहे स्वीकारलेला
इतिहासातून विध्वंसक, ऐसे नाव नको व्हायाला.
आधार हिंदूशास्त्रांचा, घेतच रचना झाली
पराशर कौटिल्याची, अन् साक्ष स्मृतींची दिली.
महिलांच्या हक्कासाठी, आणले तू हिंदू कोड
नामंजूर ते झाल्याने, ठसठसतो अजून फोड.
चातुर्वर्ण्य निर्मूलनाचा, शंख तुम्ही फंुकता
उदार सावरकरही, सुसज्ज सुस्वागता.
दलितांच्या हितामधेच, राष्ट्राचे हित दडलेले
स्वागतार्ह होईल स्वप्न, आज मला पडलेले.
अस्पृश्यता ना त्यागली, तर हिंदूधर्म त्यागतो
माणसा सन्मान आणि, समानताही मागतो.
अस्पृश्यता मिटवून, माणुसकीचा दर्जा द्यावा
परिषदातून अवघ्या टाहो, फोडून केला धावा.
प्रतिकारा अन्यायाच्या, करून उठला बंड
धर्ममार्तंडांची तेव्हा, कोसळली उतरंड.
मंदिर प्रवेशासाठी, सडा सांडला रक्ताचा
अग्निदिव्य करता पार, मार्ग न सुटला मुक्तीचा.
मगरमिठीचा पाश, पुरोहितांच्या पडला
मंदिर खुले व्हाया ते, सत्याग्रह तेव्हा घडला.
घटना समितीमध्ये, ठराव विचार आला
अस्पृश्यता बाळगणे हा, घोर अपराध झाला.
कायदा संमत होता, मंदिर प्रवेशा करिता
नाशिक, आळंदी, पंढरी, खुली जाहली दलिता.
जात
कर्मगुणांचा पाया, वर्णास चारही होता
प्रतिभा कर्तृत्वाची, लिहिली जायची गाथा.
जन्माहून जातीहून, व्यक्तीचे ठरता स्थान
पंख छाटले गेले, सरले अस्मान उड्डाण.
आधीच्या चार वर्णांचे, जातीत रूपांतर झाले
वंशाचे होते एका, लोक विभाजीत केले.
चातुर्वर्ण्य व्यवस्था ही, जातीतून जाती करते
पंगू होऊन प्रतिभा, कर्तृत्वाला अंतरते.
जातीचे निर्मूलन हो, प्रक्षोभक येता पुस्तक
श्रृतीस्मृती भक्तांचे, चक्राऊन गेले मस्तक.
जाती करून जाती, नीतीमत्तेची माती
संकुचित करते निष्ठा, स्वकिय जातीपुरती.
इतरांचे गुण सद्गुण, टाळीत मारीत जाते
जातीयतेचे जाते, अस्पृश्या भरडतीत जाते.
नैसर्गिक वृत्तीवरती, प्रतिबंध लादले जाती
हे दास्य करूनी जाते, बुद्धी शक्तीची माती.
धार्मिक असो आर्थिक, सर्वत्र लादते दास्य
तुमच्याच पूर्व जन्मीच्या, भोगा म्हणे पापास.
ज्ञानाला वंचित शूद्र, अर्थाचे ठरती दास
हाती ठेवते शस्त्र, संधीच नसे बंडास.
कर्तृत्वा करते पंगू, गोठवते प्रतिभेला
स्पृश्यांच्या वाहून पखाली, शूद्राचा मरतो हेला.
हिंदू समाज केवळ, जातींचा समूह काही
तो एकसंघ नसल्याने, राष्ट्रही म्हणवत नाही.
अवनती, पराभव झाले, जाती व्यवस्थे पायी
परकीय शृंखला आल्या, हिंदूंच्या हाती पायी.
धर्माचे शास्त्र हिंदूंचे, पेरते मनात जात
देव आणि धर्मभोळे, त्याचेच बळी ठरतात.
अंगतपंगत बसता, मांडीला मांडी भिडते
जातीने पडते अंतर, मनातले ना मिटते.
जातीभेदा पायी, देशभक्ती फुलली नाही
स्वप्नही राष्ट्रैक्याचे, कधी साधले नाही.
जाती अन् भटशाहीने, होतसे राष्ट्रविनाश
कारण ना ठरलेले, ख्रिस्ती, मुस्लीम त्यास.
जाती पंथामधले भेद, हिंदूंचे प्राचीन वैरी
भर टाकाया पक्षांच्या, नको झडाया फैरी.
जातीपातीमधला द्वेष, हा समाज तोडीत आला
मूठमाती देऊन त्याला, नवराष्ट्रा जोडीत चाला.
सामाजिक सुधारणा हा, मूलभूत प्रश्न मानावा
जाती व्यवस्थेचाही, क्रांती करता विचार व्हावा.
आंतरजातीमध्ये, विवाह होतील जेव्हा
रक्तामध्ये येईल, एकजीवित्व तेव्हा.
सरकारी नोकरीला, आयोग एक नेमावा
जातीच्या वहिवाटीला, थारा त्यात नसावा.
जातीय दंगली वरती, घालावी कायम बंदी
कायदे विधीच्या काही, करायच्या तरतूदी.
जाती-जातीतून दंगे, कधी कुठे ना व्हावे
सुख शांतीचे जीवन, लोकांना जगता यावे.
देऊळ शुद्रांसाठी, वर्ज्यच मानले जाते
जगन्नाथ पुरीला जाता, दुस्र्नच दर्शन होते.
धर्म
सांप्रत काळी धर्म हा, धर्म राहिला नाही
धर्माच्या नावे केवळ, मूर्तीची पूजाच होई.
देवही नाही धर्मही नाही, ऐसे स्वरूप धर्मा आले
शुद्ध नी उदात्त स्थिती, त्याला देणे जस्र्री झाले.
धर्माची प्रथम अवस्था, वैयक्तिक आत्मोन्नतीची
दुसरी परस्परांशी नाते, सांगत्या विधी नियमांची.
तिसरी जीवना मधल्या, गरजा जे पुरवीती
व्यक्तींचे ऐशा पूजन, धर्माच्या नावे करती.
संत वा धर्माच्या नावे, एकत्र निधी जो करती
गरिबांच्या आरोग्यावर, खर्चावा शिक्षणा वरती.
अभ्यास हिंदुधर्माचा, सांगून येवढे जातो
तो वैदिक, ब्राम्हण, हिंदू, ऐशा स्थित्यंतरातून येतो.
कालांतराने काही, बुद्धाचे विचार आले
सामाजिक धार्मिक ऐसे, पुनस्र्ज्जीवन सु डिग्री झाले.
जगातील श्रेष्ठ धर्म, हिंदूच मानला होता
खंत विचारा जैसा, आचार कधीही नव्हता.
नीच आणि हलका दर्जा, माथी मारत असतो
ऐशा दुष्ट रूढी जो जपतो, तो धर्मच माझा नसतो.
माणूस माणसाशी, माणूस म्हणून वागावा
स्वातंत्र्या, समते संगे, बंधुत्वाचा धर्म लाभावा.
आर्थिक सत्ता केवळ, अंतिम सत्ता नसते
मानवी जीवनामध्ये, धर्माचे स्थानही असते.
धर्मामधील भक्ती, आत्म्याची करील मुक्ती
विभूती पूजनातून जन्मे, हुकूमशाही व्यक्ती.
हिंदूंची निष्ठूर वृत्ती, कधीच बदलत नाही
अस्पृश्य होती मुस्लीम अन्, ख्रिश्चन होती काही.
आत्मघातकी उदासीनता, हिंदूधर्मा मारक ठरते
धर्मांतर अस्पृश्यांचे, संख्याबळ दुबळे करते.
काटेरी झाडावरती, गुदमरती पाखरे
पसंत करतील घरटे, सन्मान पावया दुसरे.
हिंदूंचा सोडून पिच्छा, राखावा स्वाभिमान
इतर समाजा जैसा, मिळवावा मानसन्मान.
अस्पृश्य मानले तुच्छ, निष्ठूर हिंदू लोकांनी
पदरात पडे ना काही, संघर्ष तयाशी करूनी.
हिंदू समाज म्हणजे, जातींचा समूह एक
ऐक्याची भावना नाही, शकले त्यात अनेक.
हिंदू समाजामधल्या, सारख्या वाटती रीती
तुकड्यांमधून वसती, एकसंघ त्या नसती.
सजातीयपणाचा भाव, दूर करतो दुजाभाव
याहून अन्य जे मार्ग, ते ठरती अवघे वाव.
हिंदू समाज अवघा, एकवर्णी होऊन जावा
दास्यातून मुक्ती आणि, होईल रक्षण तेव्हा.
समाजातला दर्जा, धर्म आणखी मालमत्ता
ही तीन कारणे ठरती, निर्माण व्हायला सत्ता.
हिंदू भूमिचे आम्ही, कक्षेत हिंदूंच्या राहू
जपू संस्कृती इथली, शिख होऊनी जाऊ.
प्रलोभने नाकारू, धनदौलत आणि मान
धर्मांतर करणे नाही, एका राष्ट्रहिता वाचून.
हिंदू समाजामधून, सामाजिक समता नाही
आर्थिक समता नसता, प्रगतीची नसते ग्वाही.
हिंदू संहिते मधूनी, हिंदू नियंत्रित व्हावे
निबंधसारखे अवघ्या, देशांमधून असावे.
हिंदू कायद्यामध्ये, एकसूत्रता यावी
रूढीत चालत आल्या, कालोचित भर घालावी.
हिंदू म्हणून जगता, येत असे दुर्बलता
यापुढे न सोसायाची, ही अवनत स्थिती आता.
अस्पृश्यता दुर्धर, जडलेला रोग समाजा
तो गेल्यावीन हिंदूंची, प्रगती नाही समजा.
जर अस्पृश्यांना पदरी, पडले हक्क समान
हिंदूंचा लढू लढाही, देऊन आपुले प्राण.
वर्चस्व स्पृश्य हिंदूचे, सार्वत्रिक असते तेव्हा
सोसणे असे दलितांना, कायमचा जुलूम तेव्हा.
हिंदूंचे धार्मिक ग्रंथ, ते राजकीयही असती
गीतेने केवळ ब्राह्मण, वर चढविलेले दिसती.
हिंदुंशी भांडण आहे, काही मुद्यांवरती
स्वातंत्र्यास्तव देशाच्या, देऊ प्राणाची आहुती.
उत्कर्ष हिंदूंचा व्हाया, राखाया स्वाभिमान
एक करा हिंदुस्थान, अन् दुसरा पाकिस्तान.
समाजरचना प्राचीन, हिंदुंनो त्वरित सोडा
आधुनिक काळा सोबत, नाते नव्याने जोडा.
आर्थिक धार्मिक ऐसे, वर्चस्व हिंदूचे पाही
राजकीय लादले जाता, अस्पृश्य सोसणे नाही.
वैध हक्क आकांक्षेच्या, जर ब्रिटिश आले आड
अस्पृश्य लढा देऊन, करतील तयांचा पाड.
भारतीयांचे जीवन पूर्वी, गतीमान केवढे होते
राजकीय बघता तैसे, जगात कुठेही नव्हते.
कालांतराने वेद, दूषित अवघे केले
ब्रह्मवाक्य ते ठरता, सर्वच नासून गेले.
अस्पृश्यता ही येते, जातीचे असता भेद
हिंदुंनी तरण्यासाठी, या स्र्ढीस द्यावा छेद.
वर्णाश्रम अभिन्न अंग, हिंदूंचे आहे म्हणता
देशात यायची कैशी, बंधुता अन् समता.
आचार विचारातून, हिंदूंचा बदल दिसावा
नागरिकाचा हक्क, सर्वांचा एक असावा.
दगडी पाषाणाचे, हृदय हिंदूंचे असते
आपटा कितीही डोके, रक्तात नाहले नसते.
स्वातंत्र्य, समता आणि, बंधुता जर पावली
हिंदू वटवृक्षाची, स्वीकार क डिग्री सावली.
जातीव्यवस्था करते, हिंदूना नीतीभ्रष्ट
समाजा दुर्बल करते, आणि अखेर नष्ट.
हिंसा, अनीती, लाच, हास करणारे हिंदुंचा
उद्धारा घ्यावा त्यांनी, धर्म गौतम बुद्धाचा.
ब्राम्हणी हक्क वा सत्तेत, दडली ना ब्राह्मणशाही
ती समता स्वातंत्र्याला, नकार नेहमी देई.
विवाह भोजनापूरती, ना सिमीत ब्राह्मणशाही
जे नागरिकांचे हक्क, ती तेच द्यायची नाही.
ब्राह्मणशाही असता, आर्थिक संधी जाते
सबंध आयुष्याला, म्हणून गरिबी खाते.
पुरोहिता साराया, ब्राह्मण धजणे नाही
एकाच शरीराचे ते, दोन अवयव पाही.
पुरोहितगिरीचा धंदा, जन्मजात नसावा
उत्तीर्ण परीक्षा होई, त्या कुणासही तो द्यावे.
अपेक्षित असे ती पूर्ती, बौद्धांचा धर्मच करतो
स्वीकार जगाने करता, उद्धारही निश्चित ठरतो.
बौद्धांची टिकाऊ तत्वे, देती समानतेची ग्वाही
म्हणून घ्यायची दिक्षा, असे ठरविले पाही.
संस्कार कसे बुद्धांचे? विधी कसे? असतात
कोलंबोला देऊन भेट, जाणले सर्व साक्षात.
भौतिकदृष्ट्या बुद्धाचा, हा धर्म संपला आहे
आध्यात्मिक शक्ती म्हणून, अजून जीवंत आहे.
असमानतेचे तत्त्व,ब्राह्मण पाळते झाले
समानता शिकवाया, सिद्धार्थ तेधवा आले.
बौद्धांच्या काही रिती, वैष्णव पाळत आले
अल्लाउद्दीन कातिल येता, परदेशाला बौद्ध निघाले.
लागली ओहोटी ऐशी, बौद्ध हिंदू होता काही
राजकीय वारे तेही, अनुकूल ठरले नाही.
असमानतेच्या भिंती, निर्मिती मनूची होती
स्त्रीचा विनाश झाला, होत गेली अवनती.
बुद्धाने स्त्रियांचा कधीही, तिरस्कार केला नाही
परिव्राजक आयुष्याचे, स्वातंत्र्य मिळवून देई.
आत्मिक उन्नतीची वाट, मोकळी तयाने केली
स्त्रियांच्या जीवनामध्ये, तेव्हाच क्रांतीही झाली.
हिंसा, अनीती, लाच, रोग हिंदूंना जडलेले
बौद्धाचा स्वीकार करता, जावे निघून हे सडलेले.
प्रस्तुत पिढ्यांच्या पुढती, पर्यायही दोनच असती
बुद्धाचा धर्म स्वीकारा, वा मार्क्स करा सांगाती.
बुद्धास मानले नाही, तर युरोप अमुचा होईल
संघर्ष होऊन तैसा, आशिया पेटत जाईल.
बौद्ध धर्म सोडला नाही, गोमांस खाणे ना सुटले
म्हणून या लोकांना, अस्पृश्य गेले म्हटले.
बौद्ध ब्राह्मणी झगडा, निकरावर जेव्हा आला
अस्पृश्यतेचा जन्मही, त्याच्या मधूनच झाला.
हिंदूंच्या पुनस्र्ज्जीवना, बौद्धांनी नकार दिला
अस्पृश्यतेचा शिक्का, त्यापायी कपाळी बसला.
हिंदूत घेतला जन्म, मरण टाळले त्यात
बौद्ध धम्माच्या दीक्षेने, दैन्यावर केली मात.
धर्माचे सर्व जगातील, चिंतन मंथन घडले
युगांच्या प्रतीक्षेनंतर, धम्माचे दार उघडले.
सोबत्यांसवे केलेली, चळवळ बहिष्कृतांची
बुद्धांची देतच दीक्षा, प्रज्ञा,शील, करूणेची.
रंगून परिषद मूर्ती, बुद्धाची देऊन गेली
मार्गावर देहूच्या तू, प्राणप्रतिष्ठा केली.
पालीतला पांडुरंग, अर्थ असे कमळाचा
पंढरीचा देव विठोबा, बुद्धच आहे मूळचा.
ईश्वरा मानती हिंदू, आत्म्यावरही विश्वास
बुद्धाने नकार देऊन, अमान्य केले त्यास.
चातुर्वर्ण्य मानती हिंदू, जातीस मान्यता देती
बुद्धाचा धर्म उभा हा, समतेच्या पायावरती.
मी देवांचाही देव, श्रीकृष्ण सांगतो आहे
ख्रिस्ताची वदते वाणी, देवाचा पुत्र मी आहे.
देवाचा प्रेषित म्हणूनी, पैगंबर सांगत आला
मार्गदर्शक ऐसा बुद्ध, नीतीतत्वे सांगता झाला.
यज्ञात आहुती द्याया, ब्राह्मण सांगत असती
चातुर्वर्ण्य कर्माला, पर्याय बुद्ध दे नीती.
सामाजिक स्थैर्यासाठी, धर्म पाहिजे नीतीचा
बुद्धिप्रामाण्या सोबत, आधारही विज्ञानाचा.
नीती केवळ काही, सर्वस्व नसे धर्माचे
स्वातंत्र्याचे मूल्य हवे, समता अन बंधुत्वाचे.
धर्माने दारिद्र्याला, पवित्र समजू नाही
वैभव आत्मप्रतिष्ठा, दोहोंची द्यायची ग्वाही.
समाज स्थैर्यासाठी, आधार लागतो काही
निर्बंधासह नीतीचा, विचार जस्र्री होई.
अट बुद्धीप्रामाण्याची, धर्माचा पाया ठरते
त्यासाठी विज्ञानाचा, स्वीकार धर्मही करते.
संहिता नीतीची केवळ, सर्वस्व नसे धर्माचे
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, हो पालन या मूल्यांचे.
सुख-शांतीस्तव धर्माने, सुस्थिती असावे म्हटले
म्हणून जगण्या मधले, दारिद्र्य पाहिजे हटले.
अपेक्षित ऐशी पूर्ती, बौद्धांचा धर्मच करतो
स्वीकार जगाने करता, उद्धारही निश्चित ठरतो.
बौद्धांची टिकाऊ तत्वे, देती ग्वाही समानतेची
म्हणून आपण दीक्षा, घ्यायची त्याच धम्माची.
समान दर्जा संधी, समान दे अधिकार
धर्माचा अशाच आता, करायचा स्वीकार.
आता घटक नसू हिंदूंचे, असू भारतीय समाजाचे
हक्कदार ठरतो सारे, राजकीय स्वातंत्र्याचे.
धर्माची अपुल्या दीक्षा, निघाले दलिता द्याया
मौलवी, पाद्रींचा डाव, घालविला तू वाया.
लोक यावे सोबतीला, जावोत सारे सोडूनी
घ्यायचा ना श्वास आता, धर्मांतराच्या वाचूनी.
वेगळ्या धर्मात जाता, स्वर्ग ना लाभायचा
न्याय्य हक्काचा अपुला, ना लढा थांबायचा.
नबाब किंवा पोप ना, धर्मांतराने व्हायचे
मानसन्माना करिता, ना टळे लढायचे.
हिंदू राहा सांगायला, अवतार घे तू ईश्वरा
धर्मांतराचा निर्धार हा, ढळणार नाही नश्वरा.
जर का झालो मुस्लीम, अराष्ट्रीय आम्हा म्हणतील
दुपटीने होता संख्या, ते वरचढही ठरतील.
ख्रिश्चन झाल्यावरती, ब्रिटिशांचे फावेल
प्रस्थापित सत्ता त्यांची, अजून दृढ होईल.
अस्पृश्य ख्रिश्चन होता, आर्थिक लाभही नाही
सामाजिक न्यायासाठी, ते कधीच लढले नाही.
हिंदुंच्या खच्चीकरणा, अन्य धर्म हे टपलेले
मुस्लिम, ख्रिश्चन जाळे, टाकुनिया बसलेले.
दारावरी लक्ष्मी उभी, धनाचा पाऊस आहे
जीवास त्याचा मोह नाही, समतेचा हव्यास आहे.
विधायक कर्तृत्वातून, हिंदूंना धोके कळले
म्हणून अस्पृश्यांना, जवळ घ्यावया वळले.
धर्मांतर करण्याची ही, घोषणा प्रभावी ठरली
प्रवेश द्यावया उत्सुक, देऊळेही उरली सुरली.
त्रावणकोरामधे देवळे, म्हैसूरात खुले दरबार
दलितांना प्रवेश लाभे, पुण्याचा फळे करार.
माणूस माणसाशी, माणूस म्हणून वागावा
स्वातंत्र्य अन् समतेसवे, बंधुत्वाचा धर्म हवा.
चांगुलपणाचे बीज, धार्मिक भावनेपोटी
नसावा ढोंगधतुरा, धर्माची लावून पाटी.
धर्मांतर परिषद होता, येवल्यास दिली ग्वाही
हिंदूत जन्मलो तरीही, हिंदूत मरणेच नाही.
बहिष्कृत हितकारिणी, सभेमधुनी दिलासा
शिका, संघटित होऊन, संघर्ष करावा ऐसा.
हिंदी समाजामधून, सामाजिक समता नाही
आर्थिक समता नसता, प्रगतीची नसते ग्वाही.
हिंदू संहिते मधुनी, हिंदू नियंत्रित व्हावे
निर्बंधसारखे अवघ्या, देशामधून असावे.
हिंदू कायद्यामध्ये, एकसूत्रता यावी
स्र्ढीत चालत आल्या, कालोचित भर घालावी.
यज्ञात आहुती द्याया, ब्राह्मण सांगत जाती
चातुर्वर्ण्य, कर्माला, पर्याय बुद्ध ते देती.
प्रबोधन
संग्राम असे मुक्तीचा, घेणारा सत्वपरीक्षा
समर्पणाची आपण, हवी घ्यायला दीक्षा.
आत्मोध्दारा अपुल्या, आत्मबला जाणावे
त्यासाठी कोणावरती, अवलंबून नसावे.
केवळ राज सत्ता, दु:खावर इलाज नाही
सामाजिक उत्थानाची, त्वेशाने करा लढाई.
परंपरेने अपुली, मुस्कटदाबी होई
ठिणगी असंतोषाची, प्रज्वल करीत जाई.
उन्नती कधी ना होते, भिकेच्या दयेवरती
आत्म्याचा एल्गार हवा, अपुल्या प्रगतीसाठी.
जीवास जीव देणाया, बनवा अपुल्या फौजा
सगळे एकमताने, अन् एकजुटीने झुंजा.
रायनायक अपुला, रायगडाचा वीर
तसे लढावे आपण, होऊन धीरगंभीर.
भुके भूमिहीन असती, मुके वस्त्रहीनही साथी
ज्याचा अभाव आहे, द्यायचे तयांच्या हाती.
सामाजिक हक्का संगे, राजकीयही गाठा
शिक्षण घेता खुलती, प्रगतीच्या नवीन वाटा.
मुक्तीचा संग्राम लढावा, तळहाती घेऊन शीर
तेव्हा मढे गुलामी, जळून जाईल सत्वर.
दृढाचार्या पुढती, निरर्थ लवचिक बाता
धैर्य धडाडीतून, हादरे द्यायचे आता.
आध्यात्मिक वेडापायी, धर्मभोळे राहू नका
पोटाची शमवा भूक, देवा मागे धाऊ नका.
धर्मभोळी वृत्ती आम्हा, दुर्बल करीत आहे
दळत आहे खालचा, अन् वरचा खात आहे.
ईश्वर कारण नाही, ना पातक गेल्या जन्माचे
दुर्दशा लिहिली भाळी, हे पाप शोषण कर्त्यांचे.
सन्मान तयांना मिळतो, जे ठेवती उच्च आकांक्षा
स्थिती सुधारत नाही, मागून दरिद्री दीक्षा.
युग नैराश्याचे गेले, आरंभ नव्या युगाचा
निबंध व्हावया आता, संकल्प करा त्यागाचा.
आर्थिक गुलामी सोडू, सामाजिक दर्जा घेऊ
वर्ण जातीला गाडू, सन्मान आपला पाऊ.
एकीचे बळ हे मोठे, तिजला अभंग राखा
दुभंगल्याची माती, हे अनुभवातून शिका.
झुगास्र्नी बेड्यांंना, श्वास मोकळा घ्यावा
प्रश्नाचे उत्तर अपुल्या, काळ द्यायला हवा.
फाटके वस्त्र चिंध्यांचे, ताटात शिळी भाकरी
सोडून भिकारी जगणे, पेटून उठा अंतरी.
उपोषणांनी टळणारी, नाहीच उपासमार
क डिग्री कायदे तसले, ते करणारे सरकार.
जप, तप, पूजा-अर्चा, सारे सोडून द्यायचे
जागृत शिक्षित होत, उन्नत होत जायचे.
सुशिक्षण स्वाभिमान, सामर्थ्यही वाढवतो
तोच फक्त समाजाला, शिखरावर चढवतो.
हिंदूंचा सोडून पिच्छा, राखावा स्वाभिमान
इतर समाजा जैसा, मिळवावा मानसन्मान.
गळ्यात मडके आणि, कमरेस बांधणे फांदी
लाजिरवाणे असले, जगणे त्यागू आधी.
निद्रिस्त समाजामध्ये, सुधारास ना संधी
सनातनी वहिवाटींना, शक्तीने क डिग्री या बंदी.
स्वावलंबी स्वाभिमानी, दलितांनी ठरणे आहे
त्यासाठी चळवळ करता, हासत मरणे आहे.
राष्ट्रास संपदा अन्न, देऊन सोसता भूक
भाकरी, वस्त्र लाभाया, लढू होऊनी एक.
जगताना ध्येय हवे, पक्के ध्यानात ठेवावे
साध्य करायला तेही, रात्रंदिवस झटावे.
असे अभाव चारित्र्याचा, तो सुशिक्षितही नाही
पशुशी तुलना करता, भयंकर ठरतो तोही.
कम्युनिस्टा वरती, विसंबून राह्यचे नाही
प्रश्नांची व्यावहारिक बाजू, त्यांना उमजत नाही.
मोबदल्यावाचून राबा, आणि गुलामी भोगा
उधळा या कारस्थाना, जे हक्काचे ते मागा.
राष्ट्राच्या भवितव्याला, प्राधान्य सर्वथा द्यावे
नेता, व्यक्ती, पक्षाला, त्यापुढे गौण समजावे.
प्रगतीची किल्ली असते, केवळ राज्यसत्ता
ती काबीज करण्यासाठी, संघटित व्हावे दलिता.
रक्ताचा लावून टिळा, निर्धार करावा आपण
स्वातंत्र्याचे करीत राहू, प्राणपणाने रक्षण.
जाती, पंथ असूद्या किती, एकराष्ट्र होऊनी जाऊ
सलोखा जपू उराशी, एकत्रच अवघे राहू.
जेव्हा तांडव करती, अमानुष या वृत्ती
प्रतिबंधासाठी ध्येय, शील असावे शक्ती.
समाजातूनी यावे, सुधारणेचे पर्व नवे
त्यासाठी सर्व स्त्रियांनी, संघटित व्हायला हवे.
रीतीरिवाज चालत आले, ते सर्व सोडून द्यावे
शिक्षित मुलांना कस्र्नी, प्रगतीपथावर न्यावे.
अस्पृश्य तुम्ही पोरींनो, शिक्षित खूप ठरावे
तस्र्णाशी उच्चवर्णीय, चुकूनही ना लग्न करावे.
भावना न्यूनगंडाची, आपल्या मधूनी काढा
आर्थिक शक्ती नंतर, लग्नाचा वाचा पाढा.
डोळ्यांमधून वसत्या, स्वप्नास जागवा भव्य
समर्थ बनवा त्यांना, काही कराया दिव्य.
अपत्यांचा लग्नानंतर, भार नको अतिरिक्त
मर्यादित कुटुंब ठेवी ,तो म्हणावा देशभक्त.
राहणी स्वच्छ असावी, दुर्गुणा नसावा वाव
पाळेल पथ्य हे त्याला, सन्मान मिळे वैभव.
मित्रत्वाचे शुद्ध नाते, पतीपत्नीतून असावे
दासी म्हणून जगणे, स्त्रीला मान्य नसावे.
बहुपत्नीत्वाची रीत, अविलंब करावी बंद
अद्वैत कुटुंबामधले, देत असे आनंद.
लढा खालच्या मधला, वरच्यांना पूरक ठरतो
दगड तळातील हलता, वरचाही सहजच हलतो.
देशाचे रक्षण करण्या, कल्याण साधण्या अपुले
सैन्यातून व्हावे भरती, शूद्रांनो असेल पटले.
लढाऊ शक्ती अपुली, पुन्हा उजळली जावी
वाढाया सांघिक शक्ती, कामास तेवढी यावी.
सुसंगतीस्तव जुन्या, मतास चिकटू नाही
देशहितास्तव संधी, पुनर्विचारा देई.
विधीमंडळामधुनी, पडेल विधेयक जेव्हा
नि:शस्त्र प्रतिकाराचा, लढा उभारा तेव्हा.
अहिंसा तत्वाविषयी, प्रेम मनातून ठेवा
शरणागती नसावी, तो गुलाम करता कावा.
अस्पृश्य डागच आहे, आपुल्या देहावरती
तो पुसून काढायाला, द्यावी प्राणाची आहुती.
श्रुती स्मृतींनी केले, ते मान्य नसे शोषण
पुराणमत वाद्यांचे, यापुढे क डिग्री ना पोषण.
जरी मरी वेताळाच्या, भ्रामक भंपक बाता
कबीराचे वास्तव दोहे, तुकयाची शाश्वत गाथा.
नैसर्गिक हा जन्म, त्या जात कोणती नाही
मानवता हा धर्म, त्याहून दुसरा नाही.
देव दैवावरी भरोसा, घातक ठरला मोठा
मनगटाच्या जोरावरती, परिवर्तन घडवू आता.
देव आहे नाही सोडा, विचार तयाचा नको
काशी, त्र्यंबक, पंढरी हे, तीर्थ कराया नको.
स्वर्ग, वारी, तुळशीमाळा, ह्या नाकारा गूढ कल्पना
त्यातून व्हायचे मुक्त, गुलामीचे हे पाशच जाणा.
पाया चातुर्वर्णाचा, उखडून फेकू जेव्हा
समाज समताधिष्ठित, होईल एकवर्णी तेव्हा.
विषमतेचे जहरी ऐसे, जे ग्रंथ पाजती विष
निषेध क डिग्री या त्यांचा, क डिग्री निरामय देश.
पुराणातली वांगी, समूळ खणुनी काढू
अन् विज्ञानाचा तेथे, डोळस झेंडा गाडू.
काल्पनिक जो आहे, का पूजता तो परलोक
घामाच्या अभिषेकातून, समृद्ध करा इहलोक.
जगण्यास हव्या सुखसोई, परमार्थ द्यायचा नाही
संपन्न ऐहिकासाठी, ही हक्काची लढाई.
अस्पृश्य जातीत होता, रोटीबेटीचा व्यवहार
तेव्हा न पहावा ढोर, चांभार कोण महार.
जातीजाती मधल्या, लग्नास द्यायचा हात
इच्छेनुसार व्हावे, बळजोरी नसावी त्यात.
हिंदूंचे घेऊन साह्य, स्वातंत्र्य गमाऊ नाही
ध्येयापासून अपुल्या, दलितांनो ढळणे नाही.
दलितांची प्रगती काही, भीक नसे हिंदूंची
कमाई केवळ तुमच्या, कष्टाची एकजुटीची.
लोकशाही
काहींना असते हक्क, काहींना हक्कच नसणे
तेथे लोकशाहीची मुळे, अशक्य असते स्र्जणे.
परंपरावाद्यांच्या, हाती जर सत्ता गेली
जाणावे लोकशाहीची, तेथे इतिश्री झाली.
मूठभर सत्ताधारी, बहुसंख्य सत्ताहीन
व्यवस्थेत ना ऐशा, लोकशाही कधी येईन.
इतर समाजालाही, समता आदर देई
वृत्तीच मनाची ऐसी, ये घेऊन लोकशाही.
यंत्राचा वापर व्हावा, द्यावा सुधारणेला वाव
सर्वास फायदा त्याचा, दे लोकशाहीला ठाव.
राजकीय जीवनातील, लोकशाही असे अपुरी
सामाजिक, आर्थिक होता, सामान्या हो हितकारी.
सामाजिक लोकशाही, मूल्य मानवी पुजते
स्वातंत्र्य, समता आणि, बंधुत्वही ती जपते.
सामाजिक समता नसता, सबलांची सत्ता येते
गळचेपी लोकशाहीची, आर्थिक गुलामी देते.
समता जर का नसली, सामाजिक आर्थिक ऐशी
लोकशाही अन्य घटनाही, सामान्य मानतील कैशी?
बहुमताच्या जोरावरती, पक्ष व्हायचा भ्रष्ट
अनिर्बंध सत्तेपायी, लोकशाही होतसे नष्ट.
झुंडशाहीला नाझींच्या, वांशिकतेचा रे आधार
लोकशाही विश्वामधली, गिळंकृत करणार.
लोकशाही विलया जाता, भवितव्याचा हो नाश
स्वातंत्र्य संस्कृती जपण्या, व्हायचे सज्ज युद्धास.
देवपणाची जागा, व्यक्तीस द्यायची नाही
हुकूमशाहीच्या बेड्या, येथील लोकशाहीच्या पायी.
भाषा
प्रांतांच्या रचनेसाठी, आधार मान्य भाषेचा
एकसंघ समाजाकरिता, तो किरण असे आशेचा.
राज्याची भाषा बनली, राष्ट्रभाषा जर का
प्रांतिक राष्ट्रवाद, येण्याचा असतो धोका.
युरोप झाला तैसा, भारतही शतखंड
राष्ट्रभाषा हिंदी करता, राहील देश अखंड.
आधार नको भाषेचे, प्रांतांच्या रचनेसाठी
संघर्ष दोहोंचा होता, देशाचे तुकडे होती.
चिंतनमंथन
नाही पैसा बुद्धिमत्ता, माणसाची जोड नाही
काम अशा समाजात, करणे अवघड होई.
सुख समृद्धीच्यासाठी, घातला जरी ही घाट
पतिव्रता ना धरते, वेश्येची कधीही वाट.
लोकांची असावी सत्ता, नको उच्च वर्णाची
प्रगती होईल तेव्हा, पिळल्या छळल्या वर्गाची.
स्वातंत्र्य लाभणे टिकणे, शक्य नाही जाती पायी
त्यांचे मूळ धर्मशास्त्रे, त्यांची मिजास ठेवू नाही.
बुद्धीवादाने जगणारी, जिथली रीतच नसते
श्रद्धाळू जाणीव तिथली, विचार जाणत नसते.
पक्षाचे एका पूजन, जनमानस जेथे करते
लोकशाही मूल्याला, ते केवळ मारक ठरते.
गरीब आणि धनिक, दोनच वर्ग जगात
गरिबीचे असती मूळ, शोषण कर्ते श्रीमंत.
साम्राज्यशाहीचा अंत, स्वातंत्र्य द्यायचा नाही
त्यानंतर लढणे आहे, मिटवाया भांडवलशाही.
जनतेचे हित असावे, सुशिक्षितांच्या हृदयी
त्याच्या विरोधी जाते, ते शिक्षण वाया जाई.
असे अभाव चारित्र्याचा, तो सुशिक्षितही नाही
पशुशी तुलना करता, भयंकर ठरतो तोही.
बहुमताच्या जोरावरती, पक्ष व्हायचा भ्रष्ट
अनिर्बंध त्या सत्येपायी, राज्यही व्हायचे नष्ट.
चपखल बसेल ऐसा, पोशाख हवा अंगाला
राज्याची घटना तैशी, क्रमप्राप्त असे देशाला.
देवपणाने जेव्हा, माणूस पुजला जातो
समजावे समाज तेव्हा, संपूर्ण लयाला जातो.
अतिमानवी गुण, घेऊन जन्मला नसतो
कर्तृत्व प्रयत्नातून, माणूस चढतो पडतो.
राजकीय सत्तेलाही, आर्थिक असावी जोड
त्यावाचून विषमतेचा, फुटायचा ना फोड.
सांगती तुकोबा तैसे, हो दुष्टांचे निर्दालन
अहिंसाच ती ठरते, सुष्टांचे करता पालन.
सांगते अहिंसा तत्त्व, प्राण्यांवर दया करावी
दुष्टांचे निर्दालनही, अहिंसेचा भाग ठरावी.
स्वातंत्र्य लाभणे केवळ, सर्वस्व द्यायचे नाही
घटना समाज त्यातून, कैसा घडतो ते पाही.
हिंसेला शरण गेल्याने, शांतता जेधवा मिळते
ती नसते शांतताही, वर आत्मघातकी ठरते.
युद्धाला उत्तर नसते, केवळ युद्धची लढणे
युद्ध जिंकूनी न्याय, प्रस्थापित असते करणे.
अवघी सत्ता असूनी, अपयश येते हाती
सामान्यजनांची जर का, टळणारी नसेल माती.
सरकारी सेवेमधुनी, न्यायाची असते आशा
आर्थिक वाढतो दर्जा, हाताशी येता पैसा.
सरकार समाजामध्ये, निर्माण सलोखा व्हावा
हिताचा सार्वजनिक, तेव्हा सफल व्हायचा दावा.
पशू मानवामध्ये, संस्कृती अंतर करते
माणूस सुसंस्कृत होणे, म्हणून जस्र्री ठरते.
पशू करीतसे तृप्ती, शरीर वासनांची
मानवास चिंता असते, सुसंस्कृत मणसाची.
आवश्यक असती वस्तू, गरजांच्या पूर्तीसाठी
त्या यंत्राद्वारे बनवा, श्रम कष्ट वाचण्यासाठी.
सम वाटप संपत्तीचे, सुधारणा अंतिम नाही
रचनेत समाजाच्याही, बदल अपेक्षित पाही.
निर्णय सदा सरकारी, निश्चित असा लागतो
तडजोडी केल्यावर तो, पक्षी वा मासाही नसतो.
प्राधान्य पक्ष हिताला, जर राष्ट्रहिताहून दिले
स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात, समजावे अपुले आले.
घटनेची पाळून शिस्त, हक्क हवे मिळवाया
असहकारातून संधी, नको अराजकाला द्याया.
राष्ट्राची राज्यघटना, चांगली असो वाईट
राज्यकर्ते कैसा करती, बघावा वापर नीट.
कायद्याचा भंग होईल, सत्याग्रह तो करणे नाही
घटनेच्या विस्र्द्ध जाईल, ऐसे न करावे काही.
थोरांसाठी उरी असावा, कृतज्ञतेचा भाव
आत्मप्रतिष्ठा जपूनी, स्वाभिमानी राखू नाव.
राजकारण म्हणजे काही, सर्वस्व नसे राष्ट्राचे
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, प्रश्नही जीवन मरणाचे.
सटवी कधी कपाळी, प्रारब्ध लिहित नसते
माणसाच्या कष्टातून, भविष्य घडले असते.
भौतिक समृद्धीतही, दु:खाचा नसतो अंत
भाकरीने भागत नाही, हवा माणूसही सुसंस्कृत.
शतकांचे गुलाम झालो, देशद्रोही वृत्तीच्या पायी
दाहीरचा सेनानायक, कासीमाला फितूर होई.
जयचंद आपुला जेव्हा, घोरीस निमंत्रित करतो
हा कावा पृथ्वीराजा, विश्वासघातकी ठरतो.
शिखांवर जेव्हा केला, हमला ब्रिटिशांनी
हातच केले म्यान, पंजाबी शूरविरांनी.
स्वराज्यासाठी अपुल्या, शिवबा पेटून उठले
राजपूत मराठे तेव्हा, मोगलाकडूनच लढले.
प्रातिनिधिक असावे, स्वरूप स्वराज्याचे
वगळून सामान्याला, नको उच्च वर्णीयांचे.
सैनिक भरती साठी, गुणवत्तेला प्राधान्य
निकष नसावे दुसरे, क्षमते वाचून अन्य.
स्त्रिया अन् सामान्यांचे, मतदान करावे मान्य
कैवार तयांचा घेईल, तोची महात्मा धन्य.
धर्मदायी संस्थांमधला, फंड शिक्षणासाठी
घर, आरोग्याची संधी, खेड्यास मिळावी मोठी.
आधुनिक व्हावे खेडे, अन्य नसे पर्याय
सभागृहाच्या सोबत, ज्ञानोपासक ग्रंथालय.
महार वतनाचे या, उच्चाटनही गरजेचे
विधेयकाला याही, बळ नव्हते विधीसभेचे.
युद्ध तसा तह करण्याचा, हक्क आम्हाला यावा
ब्रिटिशांच्या राष्ट्रकुलातून, दर्जा समान द्यावा.
महार वतनावरचा, कर मीठच जखमेवरती
तो काढून वतने द्यावे, अन् दास्यातूनही मुक्ती.
विधिमंडळातून, राखीव असाव्या जागा
दलितांनो खेड्यामधल्या, जमिनीवर हक्कही सांगा.
पुणे करार फसवा, तो रद्द व्हायला हवा
दलितांचा मतदानाचा, का हक्क हिरावला जावा?
राखीव ठेवल्या जागा, दलितांच्या साठी जेथे
स्वतंत्र मतदारांचा, संघ असावा तेथे.
राखीव नसता संघ, संयुक्त असो मतदार
या योग्य मागणीलाही, मान्य करो सरकार.
अपेक्षीले हृदयाचे, परिवर्तन होईल
सनातन्यांना जडली, खोड कशी जाईल?
जनसंखेच्या स्फोटाने, प्रगती खुंटून जाते
तू दिल्या इशायांचे, प्रत्यंतर आता येते.
मूलभूत हक्कांसाठी, नवीन जाहीरनामा
फेटाळीत समतेसाठी, रूढींचा हुकूमनामा.
स्वातंत्र्य लाभले तेही, जाईल वरिष्ठ हाती
दलितांची तरीही मात्र, सुरूच राहील माती.
दलितांना देवळात, का बरे मज्जाव आहे?
प्रवेश आता त्यातील, स्वाभिमानी प्रश्न आहे.
पाण्याला वंचित करती, विटाळ मानती स्पृश्य
ब्रिटिशांच्या या राज्यात, दिसे न बदलते दृश्य.
स्वावलंबी असा मार्ग, विद्यार्थ्यांनी चोखाळावा
राजकारणाचा भाग, लायक व्हाया टाळावा.
हरिजनांसाठी निधी, हा गुलामी पाश आहे
हिंदूंच्या या आमिषात, दलितांचा नाश आहे.
तांत्रिक शिक्षण घ्यावे, उत्पादन वाढीसाठी
अंमल त्याचा व्हाया, लागा शासनापाठी.
मजूर पक्ष शिकवील, लोकशाही लोकांस
विधीमंडळातून, प्रगतीची ठेवी आस.
काँग्रेस पक्ष हा केवळ, पिळवणुकीचा स्त्रोत
राजकीय दे स्वातंत्र्य, पुनर्रचनेला ना दे हात.
काँग्रेस असे धनिकांची, दलितांची होणे नाही
हिंदूंची जाति संस्था, समान मानत नाही.
खादीचे कपडे टोपी, काँग्रेसी असते झूल
त्याला बळी पडण्याची, टाळावी दलिता भूल.
काँग्रेस पक्ष हा अपुला, शत्रुच पर्यायाने
शेतकरी मजुरांशी, त्याला ना घेणे देणे.
स्वीकारा अन्य धर्मिक, जर अस्पृश्यांनी केला
मानावे जबाबदार, काँग्रेसच केवळ त्याला.
सामाजिक न्यायासाठी, अस्पृश्य जेधवा लढले
राजकीय क्षेत्रातील, प्रतिनिधित्व पदरी पडले.
शेटजी अन् भटजींचा, पक्ष असे काँग्रेसी
काढावा आपुला पक्ष, केले सूचित मराठ्यांंशी.
देशभक्ती म्हणजे काही, काँग्रेसी मिरास नाही
मते वेगळी असणे, नसे अनुचित काही.
वर्तन उद्धट असते, काँग्रेस जनांचे जाणा
म्हणून तुही सोडत गेला, मुखावाटे तोफखाना.
जगता येईल दलिता, ऐशी समान संधी नाही
दु:खाला दारिद्र्याला, सीमाच उरली नाही.
असपृश्यता हे पाप, अन्याय्य स्र्ढी मानावी
दलिता सोसत नाही, स्पृश्यांनी दूर करावी.
अस्पृश्यता गाडणे काही, बहुमताचे काम नाही
समूळ करणे नाश, ही नैतिक घटना होई.
चातुर्वर्ण्य हेच मुळी, विषमतेचे मूळ आहे
अस्पृश्यता जातीयता हे, तयाचे फळ आहे.
हिनत्व लादले आहे, या देवपणाच्या पायी
उद्धार स्वत:खेरीज कुणी, दुसरा करीत नाही.
शनिगुस्र्चरित्राचे, व्यर्थ असे पारायण
वार तसे उपवास, अवनतीस होती कारण.
जप, तप लटके सारे, त्याने का भरते पोट?
हाताची तोंडाशी ना, श्रमा वाचून पडते गाठ.
अस्पृश्यांच्या न्यायासाठी, स्पृश्यांनी काय हो केले?
ब्रिटिशांची राजसत्ता, त्याच मार्गावस्र्नी चाले.
रोटीबेटी बंदी जाता, जात नसे अस्पृश्यता
समूळ उच्चाटन हे, खरी आणते समता.
मोक्षप्राप्तीची वृत्ती, करते कपाळ मोक्ष
आत्मघातकी ऐसे, स्वप्नीही नसावे लक्ष्य.
प्राधान्य अन्न वस्त्राला, ज्ञानास नसे पर्याय
ऐसे जीवन जगण्यासाठी, मंदिर द्यायचे काय?
मंदिर नको जीवाला, मोक्षाच्या प्राप्तीसाठी
मानवी हक्क देणाया, समतेच्या तत्त्वासाठी.
सामाजिक स्थैर्यासाठी, धर्म पाहिजे नीतीचा
बुद्धी प्रामाण्यासोबत, आधारही विज्ञानाचा.
ब्राह्मणेतर नेत्यांचे, स्खलन कशाने झाले
कारण पुढे स्वतःच ते, ब्रह्मण होऊन गेले.
विवाह आंतर जातीचे, अन् सोबत खानपान
स्पृश्यांनी करता मान्य, होतील दलित विलीन.
बरोबरीचा दर्जा, सामाजिकही मिळता
स्पृश्यांसोबत समता, येईल साधता दलिता.
युद्ध
युद्धाचा वीट आलेला, दिसतो आहे जगास
दुर्धर तीन व्याधींची, झालेली बाधा त्यास.
दुसया देशावरती, साम्राज्य लादती अपुले
दुसरे कारण भांडण, काळ्या गोयामधले.
दारिद्र्याचा तिसरा रोग, विश्वाला छळतो आहे
आर्थिक दुबळी राष्टे्र, आता समर्थ करणे आहे.
आर्थिक औद्योगिकही, वाढत जाता शक्ती
साम्राज्यवादी सरती, रंगभेदातूनही मुक्ती.
पाण्यापरीस पैसा, युद्धे करण्या जाई
मानव संस्कृतीचा, विनाश त्यातून होई.
कोटींची राखच करते, अमेरिका अन् ब्रिटन
तो निधीस करून जावा, दारिद्र्याचे उच्चाटन.
ब्रिटिश साम्राज्याचे, प्रेम आम्हाला नाही
प्रजा मानते केवळ, आम्हा समान दर्जा नाही.
पोलंडच्या युद्धामध्ये, भारतीयांनी अडकू नये
ब्रिटिशांना साथ करून, गुलामी घट्ट क डिग्री नये.
पोलंडने ज्यू लोकांचा, कमी छळ केला नाही
ब्रिटिशांची अडचण काही, भारतीयांना संधी नाही.
महायुद्ध लढण्याला, महार फलटण केली
आर्थिक कारणे देत, बरखास्तही नंतर झाली.
नाझींच्या विजयापायी, स्वातंत्र्य लयाला जाई
समतेचे, बंधुत्वाचे, पदरी फळही नाही.
महायुद्ध हे केवळ, भूभाग लाटण्या नाही
सहजीवन राष्ट्रांमधले, त्यातून साधले जाई.
परराष्ट्रीय धोरण अपुले, मित्राहून शत्रूच करते
म्हणून सैन्यावरती, उत्पन्नही खर्ची पडते.
ब्रिटनला हुजूर जाऊन, मजूर शासन आले
मनापासुनी त्यांचे, स्वागतही करून झाले.
संरक्षण खात्यावरचा, खर्च वाजवी नाही
देशाच्या कल्याणाला, उपयोगी नसे तो काही.
यातून सुटण्यासाठी, शस्त्र हवे हाताशी
सौम्य भाषणे करूनी, होईल रक्षा कैशी?
लोकशाही राष्ट्रासंगे, मैत्र असावे अपुले
देश सुरक्षित राहील, एरव्ही व्हायची शकले.
परराष्ट्रनीतीही अपुली, आहे केवळ चुकली
मित्र म्हणावी ऐशी, दाखवा राष्ट्रे कुठली?
पाकिस्तान आणि मुसलमान
दूर दृष्टीचे दर्शन, फाळणीतही झाले
धर्मांध नगायांवरती, मृत्यूने तांडव केले.
अल्पसंख्याक अवघे, एकत्र लढले जेव्हा
जीनांच्या नेतृत्वाचा, आधार वाटला तेव्हा.
जमातच आमुची राष्ट्र, लागले जीना बोलाया
त्यांच्याच विरोधी आता, लागेल आम्हा लढाया.
काँग्रेसी गेले जेव्हा, मंत्र्यांचे मंडळ सोडून
साजरा जीनाने केला, तो मुक्तीदिन म्हणून.
भौगोलिक कारण दुबळे, समृद्ध साधना पुढती
मुस्लीम नको वर्चस्व, सैन्याची करता भरती.
जुलमाने करता एकी, ती बाधक हो प्रगतीला
अखंडाचे बघतो स्वप्न, भोगणे निराशा त्याला.
मुसलमान असलेल्यांना, भूभाग वेगळा हवा
दलितांचा केवळ आहे, समान हक्कासाठी दावा.
पाकिस्तान निर्मितीचा, आनंद मुस्लीमा झाला
विरोध घातक म्हणूनी, सावरकरांनी केला.
भारताच्या सीमेवरती, वसलेले पाकिस्तान
दुसरे चीन, रशिया, मांडून बसले स्थान.
पाकीस्तानावर जे लिहिले, विद्वत्ताप्रचुर ठरले
स्पष्ट विचारासोबत, राष्ट्रांचे हितही जपले.
हिंदूस्थान-पाकिस्तान, अशी राष्ट्रे दोन करावी
हिंदू उत्कर्षाची वाट, मोकळी करूनी घ्यावी.
मुस्लीम हे हिंदू लोका, काफीर असे गणतात
अस्तित्व, मानसन्मान, तया नच मानतात.
जे मुस्लीम नसती लोक, घृणाच तयांची करती
मुस्लीम नाहीत राज्ये, ती सारीच वैरी ठरती.
हिंदू आपुला मित्र, हा विचार शिवत नाही
मायभूमी हिंदुस्थान, ते कधीच मानत नाही.
नैसर्गिक आहे त्यांची, आक्रमकाची वृत्ती
हिंदूंच्या दुर्बलतेचा, लाभ घ्यायची नीती.
आम्ही अल्पसंख्यही नाही, आता पाकिस्तानी शास्ते
भविष्य उज्ज्वल त्यांना, तिथेच अपुले दिसते.
लोकशाहीची मूल्ये, मुस्लीम मानत नाही
आधारीत धर्मावरती, त्यांचे राजकारण होई.
सुधारणा क डिग्री जाता, मुस्लीम विरोधी होतो
विश्वात्मक ना बंधुत्व, अनुयायीच पात्र ठरतो.
फाळणी असे फलदायी, स्वराज्य देऊनी जाई
भविष्य ज्याचे त्याचे, मनासारखे होई.
खुशाल मान्यता द्यावी, निर्माया पाकिस्तान
परस्परांचे हक्क मग, मारणार तरी कोण?
अखंड हिंदुस्थान, ना एकजीव होणार
विषाने द्वैत मताच्या, जितेपणी मरणार.
अदलाबदली व्हावी, हिंदू-मुस्लीम यांची
साकार व्हायची स्वप्ने, एकजिनसी राष्ट्राची.
स्वतंत्र पाकिस्तान, देशाला होईल धोका
ही भीतीच मिथ्या आहे, ती मुळात काढून टाका.
फेकता अधिकचे ओझे, बुडते जहाज वाचे
देश सुरक्षित व्हाया, हो पालन या तत्त्वाचे.
उत्कर्ष हिंदुचा व्हाया, राखाया स्वाभिमान
एक करा हिंदुस्थान, अन् दुसरा पाकिस्तान.
शरियतनुसार या देशाने, चालणे असे धोक्याचे
भविष्य का ढकलावे, काळोखातून या लोकांचे.
हत्याकांड थांबायाला, भारतातून मुस्लीम काढा
स्थलांतराने हिंदू, पाकिस्तानचे सोडा.
कल्पना स्थलांतराची, धुरीणांनी अमान्य केली
पाकिस्तानातील हिंदूंची, दु:खेही वाढत गेली.
हिंदूंनी छळले म्हणूनी, मुस्लीम आपुले नसती
जुलुमाने धर्मांतरही, दलितांचे तेही करती.
दलित मुस्लीम झाले, ते अपुले करून घेऊ
आश्वस्त करूनी सकला, स्वधर्म तयांना देऊ.
जनता मुस्लिमांची, कुराणवादी सारी
सनातन्यांशी ऐशा, कधी न व्हायची यारी.
सुधारणा कुठलीही, मुस्लिमा वाटे पाप
हिंदू समान ठरती, ते कर्मठ आपोआप.
कामगार
कामगार या वर्गाचे, दोनच शत् डिग्री असती
ब्राम्हणशाही आणि, भांडवलशाही वृत्ती.
कामगारा एटजूट हवी, अपुले हक्क मिळवाया
समूळ तेव्हा जाईल, ही ब्राह्मणशाही लया.
मालकवर्गानेही योग्य, कामगारा वेतन द्यावे
शोषण थांबून त्याने, राबणाराही सुख पावे.
भरपगारी रजा द्यावी, कामगारा बारमाही
विधीमंडळाकडूनी, घेतली हमी अन् ग्वाही.
कामगार बंधुंनो ऐका! “भारत छोडो” नारा फसवा
लोकशाही रूजवायाला, नवीन भारत घडवा.
अभ्यास कामगारांचा, परदेशी कायद्यांचा
अस्पृश्यास देऊनी गेला, सन्मान मंत्रीपदाचा.
कामगार हितासाठी जे, जीव तोडूनी केले
सन्मान कराया त्याचा, मंत्रीपदही चालून आले.
कामगारांच्या संपावर, होतो गोळीबार जेव्हा
स्वराज्य ठरते शाप, मुस्कटदाबी होते तेव्हा.
कामगारा क डिग्री नये, तू ईच्छेविस्र्द्ध काम
त्यांच्यासाठी भाग पाडणे, करणे असे गुलाम.
कामगारा हक्कच आहे, संपावर जाण्याचा
मालकाच्या समोर अपुल्या, मागण्याही ठेवण्याचा.
युद्धाला द्रव्य अमाप, खर्ची पडे धनिकांचे
कामगारा देता शिक्षण, आरोग्य सुधारे त्यांचे.
शेती
शेतीचे समान वाटप, आणि क्षेत्र असावे मोठे
झाला ना अंमल त्याचा, येईल भोगणे तोटे.
रान तोडल्या जमिनी, दलित बांधवा द्याव्या
पडीक पडल्या त्याही, कसावयाला घ्याव्या.
कृषकांच्या शेतीसाठी, पूरवाया पाणी हवे
धरण जाहले उभे, भाकरा नांगल नवे.
हिमालयातून येती, नद्या घेऊनी पाणी
शेतीच्या ओलीतास्तव, घ्याव्या सर्व जोडूनी.
जमिनीचे झाले तुकडे, त्यात लोकसंख्येचा भार
त्याने शेतकयांचे प्रश्न, वाढून गेले फार.
शोषण नको कुळांचे, संरक्षण त्यास मिळावे
कामगारा परीस तेही, सवलतींकडे वळावे.
भूमीहिनाला जमीन, द्यावी बेकारीतून मुक्ती
औद्योगिक धंदे देता, आर्थिक वाढे शक्ती.
कोकणातली खोती, लयास जाईल जेव्हा
स्वामी शेतजमिनीचे, कुळेच होतील तेव्हा.
विधिमंडळावर नेला, शेतकयांचा मोर्चा
किमान वेतनासाठी, मजूरांच्या केली चर्चा.
हटवा जमीनदारी, लाभाची आर्थिक नाही
मालकास द्यायची नाही, कुठलीही भरपाई.
देतात कालवे पाणी, दर त्याचा निम्मा व्हावा
मजुरांच्या संघटनेने, प्रतिनिधी निवडावा.
खोती लयाला जाया, तुस्र्ंग अवघे भरू
शेतकरी कोणीतरी, प्रांताचा प्रधान करू.
खोतीचा जुलूम जावा, विधेयकातून मांडू
विरोध होता करबंदीच्या, चळवळीतून भांडू.
जमीनदारी नष्ट व्हावी, समाजवादी ओरड होती
विधेयकावर मौन तयांचे, सांगे नियत होती खोटी.
शासकीय कराचा पैसा, असतो शेतकयांचा
शिक्षण, कर्ज फेडीला, उपयोग करावा त्याचा.
नवभारत निर्मितीला, वेगाने हो सुस्र्वात
शेतीला जल देणारी, दामोदर योजना त्यात.
कुळ कायदा भूमिहीनांना, सांगा द्यायचा काय?
सामुदायिक शेती हा, दुखण्यावरती उपाय.
जमिनी भाडेपट्ट्याने, जर का शासन देई
जमीनदार वा भूमीहीनही, असणार कुणीही नाही.
गांधी
गतकालीन आदर्शाने, भारत घडणे नाही
अट्टहास हा गांधीजनांचा, जीवास पटणे नाही.
शास्त्रशुद्धची विचार व्हावा, देशाच्या भवितव्याचा
व्यर्थ असा अभिमान नसो, अर्धनग्नही राहण्याचा.
गांधींच्या मुखात राम, बगलेत सुरीही असते
गोलमेज परिषदेतून, भूमिकाही गोलच असते.
“करेंगे या मरेंंगे” ऐसा, गांधींनी दिलेला नारा
कायद्याला देशांमधल्या, कमजोर असे करणारा.
भाळायचे ना आपण, गांधीवादावरती
ग्रामीण जीवनाचे ते, पुनरूज्जीवन करती.
यंत्रयुग या महात्म्या, वाटते केवळ शाप
परत निसर्गा जाऊ, सांगणे केवढे पाप.
समान आर्थिकतेची, तळमळ नाही ऊरात
सामाजिक दृष्ट्या म्हणूनी, प्रतिगामी ते ठरतात.
धर्माची देऊन आफू, भ्रमिष्ट करती लोका
भूतकाळाकडे वळावे, हा फसवा केवळ धोका.
हरिजन मंत्री घ्यावा, धाटत होते खरे
गांधींनी विरोध केला, कसे विसरता बरे?
गांधींनी पुरस्कृत केला, अनुवंशिक व्यवसाय
चातुर्वर्ण्या जपण्याचा, हा दसरा ढोंगी उपाय.
नैसर्गिक असते वृत्ती, त्यानुरूप धंदा व्हावा
वंशानुकूल करणे, हा गुलाम करता कावा.
विक्षिप्त वागतो तोही, योगी महात्मा ठरतो
त्याच मेंढपाळा मागे, मेंढ्यांचा कळपही फिरतो.
चातुर्वर्ण्य हिंदुत्वाचे, अभिन्न आहे अंग
हा विचार गांधीजींचा, स्वप्नांचा करतो भंग.
हरीजनांचा सेवकसंघ, बापूजींनी काढलेला
अस्पृश्य एकही तेथे, का नसे हो नेमलेला?
हरिजनांना गणता, पुत्र म्हणून देवाचे
स्पृश्यांना म्हणाल का हो, तुम्ही अवघे सैतानाचे.
गांधींचे भक्त म्हणून, पटेल स्वागत करती
असे वाटते जोडा, फेकावा त्यांच्यावरती.
रानड्यातुनी आधुनिक, ज्ञानाचे युग दिसताहे
गांधीयुग हे भारतातले, तमोयुगची आहे.
गांधीजींच्या धाडीपासून, अंतर ठेवून वागा
शूद्रांच्या उद्धाराची, एक तरी कृती सांगा.
काँग्रेस गांधीजी वरचा, ग्रंथही बॉम्बच ठरला
त्यापासून सावध व्हावे, दलितांना आग्रह धरला.
विभक्त नको मतदार, गांधींनी उपोषण केले
हट्ट सोडूनी दयाघना, प्राण तयांचे वाचविले.
सुभाषचंद्रा सोबत, नेहरूही शरण गेले
जवळ क डिग्री ना गांधी, जर प्राणही दलिता गेले.
प्रेरणा
स्वातंत्र्य, बंधूते संगे, समता जर पावली
हिंदू वटवृक्षाची, स्वीकार क डिग्री सावली.
नीच आणि हलका दर्जा, माथी मारत असतो
ऐशा दुष्ट रूढी जपतो तो, धर्मच माझा नसतो.
ब्राह्मणी हक्क सत्तेत, दडली ना ब्राह्मणशाही
ती समता स्वातंत्र्याला, नकार नेहमी देई.
विवाह भोजनापूरती, ना सीमित ब्राह्मणशाही
जे नागरिकांचे हक्क, ती तेच द्यायची नाही.
n n n