ॲमिबियासीस ही एक विश्वव्यापी समस्या आहे. प्रदूषित पाणी पिणे, दुषित भोजन घेणे अथवा वाईट सवयी यांच्या कारणाने हा रोग मुख्यत्वे होतो.
या रोगापासून बचावासाठी पुढील गोष्टींवर लक्ष द्यावे. पाणी, खाद्यपदार्थ, भाज्या, फळे आदी प्रदूषित होण्यापासून बचाव करावा. उघड्यावर शौच- स बसू नये. शौचानंतर तसेच भोजन घेण्यापूर्वी हात साबणाने चांगल्याप्रकारे धुवावेत. पिण्याच्या पाण्याबाबत विशेष सावध राहावे. त्यात अमिबाचे सिस्ट असू नयेत, याची खात्री करावी. पाणी फिल्टर करून अथवा उकळून पिण्यास घेणे अधिक उत्तम भोजन उघडे ठेवू नये. उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. कच्च्या भाज्या, सॅलड प्रकारे धुऊनच खावे. भाज्या प्रदूषित होऊ नयेत यासाठी व्हिनेगरने धुऊन उपयोगात घेता येतील. हॉटेल, रेस्टॉरंट अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या आणि भोजन वाढणाऱ्या व्यक्तीची नियमित मल तपासणी करावी. अशात या रोगाचे संक्रमण आढळल्यास उपचार करून घ्यावेत. अशा व्यक्तींना स्वच्छ राहण्याचे, साफ राखण्याचे तसेच वेळोवेळी नखे कापण्याबाबत निर्देश द्यावेत. बाजारातील उघड्यावरील हात नदार्थ, चाट, पकोडे, मिठाई, कापून ठेवलेली फळे यांचे सेवन करू नये.