किचनमध्ये नाश्ता, जेवण करत असताना खूप कचरा गोळा होतो. या कचऱ्याचा वापर “तुम्ही रोपांमध्येही करू शकता म्हणजे ऑर्गेनिक खत म्हणून तुम्ही भाज्यांच्या, फळांच्या सालींचा कचरा वापरू शकता. यामुळे कमीत कमी खर्चात तुम्हाला ऑर्गेनिक खत मिळेल. रोपांवर हा उपाय करण्यासाठी साली वेगळ्या ठेवाव्या लागतील. यात थोडी मेहतन लागते कारण आपण प्रत्येक पदार्थाचा कचरा बाहेर फेकून देतो किंवा कचऱ्याच्या कतो. खत तयार करण्यासाठी तुम्हाला फार काही लागणार नाही फक्त भाज्यांचा आणि फळांचा गोळा झालेला कचरा एका भांड्यात काढावा लागेल. 1 ते 2 दिवसांनी याचं खतात रूपांतर होईल. घरात तयार केले जाणारे ऑर्गेनिक खत स्वस्त आणि खूप प्रभावी ठरते. ऑर्गेनिक खत तयार करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा कचरा लागेल. तुम्ही कचऱ्याचा वापर करू शकता पण लसूण, कांदा, केळी, चहा पावडर, संत्री आणि भाज्यांच्या साली वापरा. या पद्धतीने बनवलेले खत फायदेशीर ठरेल.
सफरचंदाचे साल : झाडांना पोटॅशियमची आवश्यकता असते. पोटॅशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी सफरचंदाचे साल एक उत्तम उपाय आहे. तुम्ही सफरचंदाचे साल मिरचीच्या रोपासाठी किंवा फुलांच्या रोपासाठी वापरू शकता. सगळ्यात आधी एका कोरड्या जागेवर सफरचंदाचे साल घेऊन त्यानंतर त्याचे खत बनवा.
कांद्याचे साल : किचनमध्ये कांदा आणि लसणाचे साल सगळ्यात दिसून येतात. किचनमध्येसुद्धा हे दोन पदार्थ सगळ्यात जास्त वापरले जातात. ही सालं फेकण्यापेक्षा याचे नैसर्गिक खत बनवून तुम्ही याचा वापर रोपांसाठी करू शकता.
संत्र्याचे साल : संत्री एंटी ऑक्सिडेंसयुक्त फळ आहे. संत्र्याच्या सालीत भरपूर पोषक तत्व असतात. संत्र्याचे साल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. या सालींची सुकी पावडर बनवू शकता. याची पेस्टही चेहऱ्यावर लावू शकता. याशिवाय झाडांच्या चांगल्या विकासासाठी तुम्ही संत्र्याचे साल वापरू शकता.