अमळनेरच्या साने गुरुजी साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घघाटन आज लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या आधी सकाळी वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला असून ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झालं. अमळनेरमध्ये याआधी १९५२ मध्ये साहित्य संमेलन झालं होतं त्यानंतर ते ७२ वर्षांनी होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत.
About The Author
Post Views: 88