अकोला – रामायण व महाभारत युद्ध हे स्त्री सन्मानासाठी झाले असे उद्गार श्री गोविंद शेंडे क्षेत्रीय मंत्री विश्व हिंदू परिषद यांनी रामायणातील सामाजिक समरसता या विषयावरील आपल्या व्याख्यानात काढले. पुढे बोलतांना त्यांनी केवट, शबरी यांच्याशी प्रभुरामाचे स्नेहबंध कसे जुळले होते हे विस्ताराने विषद केले.
सदर कार्यक्रमात प्रा. सुरेश कुळकर्णी संपादित पसायदानामृत या अध्यात्मास वाहिलेल्या मासिकाच्या श्रीराम नवमी विशेषांकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. सुरेश कुळकर्णी यांनी केले यावेळी विश्वाहिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी श्रीरंगराजे, गणेश मोकाशी, प्रा. अजय मिलजावार, ह.भ.प. तुळशीदास मसने, सुरज भगेवार, अशोक भंसाळी, भीम जियानी, विरवाणी हरिओम पांडे, निलेश पाठक, सुधाभाऊ बावस्कार ह.भ.प. वेणूमाधव कुळकर्णी, गजानन देशपांडे, डॉ. घिरणीकद, गणेश काळकर, प्रकाश घोगलिया, योगाचार्य भगवंतराव गावंडे, प्रा. यादव वक्ते, नारायण अंधारे, योगाचार्य चंद्रकांत अवचार, प्रकाश जोशी, संदीप निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरेंद्र जयस्वाल यांनी सुयोग्य सूत्रसंचालन केले. सुरज भगेवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक संघात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.
ग्राम शिर्ला (अंधारे) : येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघात आज भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे, जनार्दन इंगळे, (मेजर) रामकृष्ण खंडारे आणि अध्यक्ष नारायण अंधारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विरपिता काशीराम निमकंडे, निळकंठराव अंधारे, दामोदर अंधारे, सुरेंद्र गाडगे, रामदास सावरकर, देविदास निमकंडे, रमेश वरणकार, काशिनाथ ढाळे व ग्रामस्थांची