अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामसेतू बांधला गेलेल्या तामिळनाडूतील अरिचल मुनाई येथे पोहोचले. रामसेतूबाबत अनेक मतमतांतरे आहेत. हा पूल मानवनिर्मित आहे की नैसर्गिक, असा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. शतकानुशतके अस्तित्वाला आणि वानरसैन्याने केलेल्या बांधकामाला हिंदू धर्मीयांमध्ये मान्यता आहे; पण पूल केवळ एक या पुलाच्या मिथक आहे, असा दुसरा मतप्रवाह आहे. हा पूल मानवनिर्मित आहे हे सिद्ध करण्यासाठी देशात अनेक प्रयत्न झाले, परंतु त्यापैकी बहुतेकांना मान्यता मिळाली नाही. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर आणि राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर आता येणाऱ्या काळात रामसेतूशी संबंधित गुपिते उघड होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी आध्यात्मिक प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या अरिचल मुनाईला भेट दिली. अश्चिल मुनाई हे नाव अनेकांना ठाऊक असेल. कारण याच ठिकाणी रामसेतूची उभारणी झाली, असे पौराणिक संदर्भातून दिसून आले आहे. प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी रामसेतूला भेट देण्यामागे आगामी काळात मोदी सरकार या सांस्कृतिक वारशाची पुनर्रचना करणार असल्याचे आणि त्याला वैधानिक अधिमान्यता मिळण्यासाठी वैज्ञानिक संदर्भांची उकल करणार असल्याचे प्रतीत होते. रामसेतू खरोखरच अस्तित्वात होता का, याबाबतचे गूढ आजही भारतीय समाजात आहे. रामायणातील उल्लेखाप्रमाणे रावणाच्या लंकेला जाताना वानरसेनेने या सेतूची उभारणी केली होती. तमिळनाडूच्या पंबन बेटाला श्रीलंकेच्या मन्नार बेटाशी जोडणारा हा आराखडा रामायण काळापासून असल्याचे सांगितले जाते; पण हा पूल मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो. इसवी सनपूर्व पाच हजार वर्षांपूर्वीचा रामायणाचा काळ आणि रामसेतूच्या शास्त्रीय विश्लेषणात एक साम्य दिसून येते.