श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) : भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत, असे राधा वेणुगोपाल स्वामींचे प्राचीन मंदिर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मेलियापुट्टीमध्ये आहे. आंध्रचे खजुराहो मंदिर म्हणूनही या मंदिराची ओळख आहे. या भागातील अनेक नवविवाहित जोडपी त्यांच्या पहिल्या रात्रीपूर्वी आधी या मंदिराला भेट देऊन पूजा करतात. जवळपास २०० वर्षांपासून या ठिकाणी ही प्रथा सुरू आहे.
राधा वेणूगोपाल स्वामी मंदिराच्या चारही बाजूला असलेल्या भिंतींवर विविध दगडांमध्ये कोरलेल्या मूर्ती आहेत. तर मंदिराच्या छतावर कोरलेल्या फुलांच्या आकृती सारख्याच वाटतात. पण जवळून पाहिल्यानंतर त्यातही पूर्णपणे वेगळेपणा जाणवतो. मंदिराचे मुख्य पुजारी गोपीनाथ सांगतात, मंदिराची रचना कलिंगा स्थापत्य शैलीतील असून मंदिराची निर्मिती १८४० मध्ये झाली आहे. महाराणी उत्तरा यांनी मंदिर बांधले.
ज्ञात इतिहासानुसार, १८४० च्या दशकात मेलियापुट्टी परिसर पारलामिकीडीचे महाराज वीरवीरेंद्र प्रताप रुद्र गजपती नारायण देव यांच्या प्रशासनाच्या अधिपत्याखाली होता. महाराणी विष्णुप्रिया यांनी महाराजांना मूर्तीकलेचा प्रसार होऊन याचं सौंदर्य वाढावे म्हणून एक मंदिर बांधण्याची विनंती केली. त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले.
मंदिराच्या निर्मितीसाठी महाराजांनी पुरी, ओडिशामधून शिल्पकारांना बोलावले. मंदिरात येणाऱ्या लोकांना ६४ कलांची माहिती व्हावी म्हणून मंदिरात मूर्ती तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले. त्यामुळं शिल्पकारांनी ६४ कलांची माहिती देण्यासाठी कोरीव काम करून मूर्ती या ठिकाणी आणल्या. त्यानंतर मंदिराच्या चारही भिंतींवर त्या मूर्ती ठेवण्यात आल्या आणि नंतर मंदिराचं बांधकाम सुरू झाले. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाची राधा वेणूगोपाल स्वामींच्या रूपात पूजा बांधली जाते. गोपीनाथ यांच्या म्हणण्यानुसार, मंदिरात येणाऱ्यांना वैदिक शास्त्र आणि ६४ कलांचे सार समजावून सांगितले जायला हवे. या मूर्तीमध्ये प्रेमाशी संबंधित मूर्तीचाही समावेश आहे. ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’चे प्रवक्ते वाविलपल्ली जगन्नाथ नायडू म्हणाले की, ‘त्यावेळी सेक्सबाबत फार जागरूकता नव्हती. सार्वजनिकरीत्या यावर चर्चा केली जात नव्हती. त्यामुळं मंदिरांच्या भिंतींवर शिल्प तयार करण्यात आली. जे लोक मंदिरात येतील त्यांना मूर्तीच्या माध्यमातून त्या तयार करणाऱ्यांचा नेमका उद्देश काय होता, हे लक्षात येईल.’ गोपीनाथ म्हणाले की, मंदिराच्या आसपासच्या गावांतील नवविवाहित जोडपी आधी या मंदिरामध्ये येतात. ‘मंदिराच्या आसपासच्या जवळपास ५० गावांमधील नवविवाहित जोडपी लग्नानंतर पूजा करण्यासाठी सर्वात आधी या मंदिरात येतात. ते मंदिराच्या चारही बाजूंचं तीन वेळा दर्शन घेतात. मंदिराच्या आसपास कामूक मूर्तीही आढळतात. जोडप्यांनी त्या पाहिल्यानंतरच त्यांच्या पहिल्या रात्रीची तयारी केली जाते. ‘
गोपीनाथ म्हणाले की, ‘एकाच कुटुंबात जन्मलेले किंवा विशेषतः भाऊ-बहीण या मंदिरात येत नाहीत. मंदिरांच्या भिंतींवर लैंगिक मुद्रांमधील मूर्ती आहेत. त्यामुळं मंदिरात येणाऱ्या तरुण-तरुणींना काहीसे विचित्र वाटते. तसेच बहीण-भावांनाही मंदिरात आल्यानंतर लाज वाटते. त्यामुळं एकदा असे म्हटले गेले की, बहीण-भावाने एकत्र मंदिरात जाऊ नये. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी स्वामीच्या पूजेसाठी बाहेर जातात. मंदिरात सेक्सशी संबंधित खूप मूर्ती होत्या. त्यामुळं काही निर्बंध होते. पण सध्या असे काहीही नियम नाहीत.
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या छतावर ६४ दगडी फुलं आहेत. ती सर्व एकसारखीच दिसतात. पण बारकाईने पाहिल्यास प्रत्येक फूल पूर्णपणे वेगळं असल्याचे लक्षात येते. ते ६४ कलांचे प्रतीक आहेत. या भागातील दुसऱ्या कोणत्याही मंदिरात अशा प्रकारची वास्तुकला पाहायला मिळत नाही. संपूर्ण मंदिर दगडापासून तयार करण्यात आले आहे. पण ते अनेक रंगांनी रंगवण्यात आले. – सत्यनारायण, पुजारी
मंदिराच्या निर्मितीमागं तत्कालीन महाराज गजपती नारायणदेव यांचा मुख्य उद्देश जोडप्यांना वेद, कला आणि सेक्सबाबत शिक्षित करणं, हा होता. मंदिराच्या निर्मितीपासूनच शाही कुटुंबाकडून याची देखभाल केली जात होती. पण गेल्या काही काळात यासाठी निधी मिळू शकलेला नाही. त्यामुळे इतिहास आणि खास वैशिष्ट्ये असलेले हे मंदिर दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. – जगन्नाथ नायडू, मंदिराचे प्रवक्ते