विचारमंथनात अंजलीताईंचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघात प्रवेश
हार्ट अटकच्या शक्यतांवर प्रतिबंध करणाऱ्या ईमरजन्सी किटचे वाटप
अकोला : देशातील लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जतन आणि समृध्द लोकशाहीतून संविधानाचे संवर्धन करीत पत्रकार व समाजाच्या हक्कांसाठी संघर्षरत राहणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची सर्वसमावेशक सामाजिक वाटचाल कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे, असे गौरवपूर्ण प्रतिपादन अग्रेसर सामाजिक नेत्या, आंबेडकरांच्या प्रबुध्द भारतच्या संपादिका प्रा. सौ. अंजलीताई आंबेडकर यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नियमित मासिक विचारमंथन तथा सन्मान समारंभात त्या बोलत होत्या. त्यांनी लोकस्वातंत्र्यचे सभासदत्व स्विकारून या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेत प्रवेश केला. त्यासाठी विचारमंथन मेळाव्यात त्यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान करून केन्द्रीय कार्यकारिणी कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांना महासंघाच्या विशेष मार्गदर्शिका तथा राज्य संघटन प्रमुख म्हणून नियुक्तीपत्रासह, खास सन्मानपत्र, शाल, ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना अंजलीताईंनी या पत्रकार महासंघाच्या ‘लोकस्वातंत्र्य’ या नावातूनच सर्वसमावेशक आणि समतावादी लोकशाहीची वाटचाल लक्षात येते. पत्रकार कल्याणासोबतच सामाजिक उपक्रमातून कृतिशील पत्रकारिता आणि त्यासाठी सामाजिक क्षेत्रातील ईतर नामवंतांनाही सोबत घेऊन चालण्याची अभिनव संकल्पना ही वैचारीक परिवर्तनातून सामाजिक विकासाची खरी वाटचाल आहे, असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका आणि रजधुळ मासिकाच्या संपादिका देवकाताई देशमुख, आयएमए पदाधिकारी, अस्थिरोग तज्ञ, डॉ.रणजित देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, प्रा. डॉ. संतोष हूशे, उपाध्यक्ष प्रदिप खाडे, सचिव राजेन्द्र देशमुख अरविंद देशमुख (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय देशमुख यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या वाटचालीची माहिती दिली. तर प्रा. संतोषजी हूशे यांनी सुध्दा मनोगतातून संघटनेच्या ३ वर्षाच्या व्याप्तीमधील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या योगदानाची माहिती दिली. याप्रसंगी देवकाताई तथा डॉ. रणजित देशमुख आणि उपस्थितांनी संघटनेच्या गतिमान कार्याबद्दल आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात.
प्रा. मनोज देशमुख व सौ. दिपाली बाहेकर यांच्या बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रा राजाभाऊ देशमुख, रावसाहेब देशमुख, गजानन जिरापूरे, संदिप देशमुख, (अमरावती) नंदकिशोर चौबे, अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके, सागर लोडम (ग्रामीण), देवेन्द्र बन्सोड, देवेन्द्र मेश्राम (जि. प्रसिध्दी प्रमुख, पालघर) सुरेश डहाके, मनोहर मोहोड, दिपक देशपांडे, पंजाबराव वर,संतोष धरमकर, अॅड. राजेश कराळे, सतिश देशमुख, (निंबेकर), विजय बाहकर, मनोहरराव हरणे, शामराव देशमुख,राजाभाऊ देशमुख (रामतिरथकर) रामराव देशमुख, सौ.सोनल अग्रवाल, सौ.सुलभा देशमुख, सौ.राजश्री देशमुख, (खामगाव) वसंतराव देशमुख (नारखेडकर), प्रा. आर. जी. देशमुख (माजी संपादक पिकेव्ही), कैलास टकोरे, अशोक भाकरे, शशिकांत हांडे, प्रा. विजय काटे, डॉ.विजयकुमार बढे, सुरेश भारती, सुरेश पाचकवडे, अशोककुमार पंड्या, के. एम. डॉ. अशोक तायडे, कृष्णा देशमुख, सुनिल देशमुख (निंबेकर), गौरव देशमुख, प्रा. सुरेश कुलकर्णी, देवीदास घोरळ, शिवचरण डोंगरे, ओरा चक्रे, वासुदेव चक्रनारायण, आत्माराम तेलगोटे, ज्ञानदेव खंडारे, रामराव खंडारे, व ईतर बहूसंख्य पत्रकार व समाजसेवी उपस्थित होते. आभारप्रदर्शन विजयराव बाहकर यांनी केले.