चिनी बनावटीच्या मोटारींबाबत संभाव्य सुरक्षा धोक्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांना दिले आहेत. या चौकशीमुळे इलेक्ट्रिक वाहनं आणि इतर अत्याधुनिक वाहनांमध्ये चालक आणि त्यांच्या खासगी माहितीवर देखरेख ठेवण्यासाठीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर प्रतिबंध घातला जाईल, असं सांगितलं जात आहे. अमेरिकी नागरिकांच्या डेटाच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व पाऊलं उचलत असल्याचं बायडेनं यांनी म्हटलं आहे. वाहन बाजारपेठेच्या भविष्याबाबत एकाधिकारशाही तयार करण्यासाठी चीन चुकीच्या मार्गांचा वापर करत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
About The Author
Post Views: 92