अकोला : अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणी मनसेचे 5 कार्यकर्ते अटकेत आहेत. तर जवळपास 20 कार्यकत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या सचिन गालट, ललित यावलकर, अरविंद शुक्ला मुकेश धोंडफळे आणि रुपेश तायडे या 5 जणांच्या जामिनावर आज (ता. 2 ऑगस्ट) शुक्रवारी दुपारी सुनावणी होणार आहे. तर मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकोला जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 7 ऑगस्टला होणार सुनावणी होणार आहे. अमोल मिटकरी गाडी हल्ला प्रकरणात काल अटक करण्यात आलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आतापर्यंत जवळपास 20 कार्यकर्त्यांवर तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. यातील प्रमुख आरोपी पंकज साबळेसह तीन आरोपींना जामीन मिळाला आहे. मात्र, गाडी तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळे हे अद्याप फरार आहेत. दुनबळे यांच्या अटकेसाठी अकोला

पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. मात्र, सध्या कर्णबाळा हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे. तर मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकोला जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 7 ऑगस्टला होणार सुनावणी होणार आहे. अमोल मिटकरी गाडी हल्ला प्रकरणात काल अटक करण्यात आलेल्या 6 मनसे कार्यकत्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आतापर्यंत जवळपास 20 कार्यकर्त्यांवर तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. यातील प्रमुख आरोपी पंकज साबळेसह तीन आरोपींना जामीन मिळाला आहे. मात्र, गाडी तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळे हे अद्याप फरार आहेत. दुनबळे यांच्या अटकेसाठी अकोला पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. मात्र, सध्या कर्णबाळा हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.
20 पेक्षा अधिक मनसैनिकांवर गुन्हा
दरम्यान, गाडी तोडफोड प्रकरणी आता मनसेचे पदाधिकारी सचिन गव्हाळे आणि मनसेचे माजी नगरसेवक राजेश काळे यांनाही अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील सरकारी बगीचा जवळून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत 7 जण अटकेट आहेत तर तिघांना जामीन मिळाला आहे. मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता.