
केळी खाल्ल्यानंतर, पचनाच्या समस्या टाळण्यासाठी किंवा पोषक तत्वांचे जास्तीत जास्त शोषण करण्यासाठी काही पदार्थ आणि पेयांचे सेवन करणे टाळले पाहिजेत. जाणून घ्या, अशा पदार्थांविषयी ज्यांचे केळीनंतर सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते.
केळ्याचे सेवन करणे आरोग्यसाठी फार निरोगी मानले जाते. केळे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. केळ्यामध्ये अनेक पोषक तत्त्वे, फायबर, पोटॅशियम, आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे शरीराच्या अनेक प्रक्रियांना मदत होते. दरम्यान, काही प्रसंगी केळे खाणे टाळले जाते. परंतु, केळे खाण्याचे अनेक फायदे शरीराला असतात. व्यायामशाळेमध्ये जाऊन कसरती करणारे मंडळी केळे खाण्याला जास्त प्राधान्य देतात. केळे खाणे हे उत्तम असते. काही प्रसंगी यांचे सेवन नक्कीच टाळले गेले पाहिजे. त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे केळं खाल्ल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे पचनसंस्था आणि शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात.
केळं खाल्ल्यानंतर दूध
आयुर्वेद म्हणते कि केळं आणि दुधाचा संगम करणे म्हणजे एकंदरीत विष तयार करणे असते. अशा प्रकारचे मिश्रण शरीरात पचनासंबंधित त्रासला निर्मिती देतात. केळे आणि दुधाचे मिश्रण करून त्याचे सेवन करून प्यायलाने अपचन, सूज आणि इतर पचन समस्या होऊ शकतात. काही लोक याचे शेक बनवून घेत असले तरी, ते शक्यतो टाळणं चांगलं.
केळं खाल्ल्यानंतर पाणी
केळं खाल्ल्यानंतर लगेच कंपणी पिणे टाळा. केळं खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने गॅस तसेच अपचन सारख्या समस्या उद्भवतात. शरीराची पचनसंस्था मंदावते. उलट्या होण्याची शक्यता वाढते. विशेषतः थंड पाणी पिणे हानिकारक ठरू शकते, कारण ते पचनाच्या प्रक्रियेत अडथळा आणते. तहान असल्यास किमान ३० मिनिटांची प्रतीक्षा करावी.
केळं खाल्ल्यानंतर आंबट पदार्थ
केळं खाल्ल्यानंतर दही किंवा लिंबासारख्या आंबट पदार्थांचे सेवन करू नये. पचनाच्या समस्येला कारणीभूत ठरणाऱ्या या मिश्रणाने पोटात आम्लता वाढण्याची शक्यता असते.
केळं खाल्ल्यानंतर मसालेदार पदार्थ
केळं खाल्ल्यानंतर लगेच मसालेदार अन्न खाल्ल्यास पचनसंस्था प्रभावित होते. यामुळे गॅस्ट्रिक समस्या वाढते. तसेच शरीरात अपचन होऊ शकते. म्हणूनच, केळं खाल्ल्यानंतर योग्य अंतर ठेऊनच इतर पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. पोटाच्या आरोग्यासाठी या सवयींकडे विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे.