वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला जिल्हयातील देगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. ग्रामिण भागातील हे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय ज्ञानाचा एक ओजस्वी झरा असून आजच्या नवतरूण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि उज्वल भविष्याचे क्रांतीकारी पाऊल ठरावे, असे उद़गार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. अशोक शिरसाट यांनी आपल्या प्रास्ताविकांतून याप्रसंगी काढले. देगांवच्या विद्यमान सरपंच सौ.दिपाली राजेश सरदार यांचे शुभहस्ते सदर वाचनालयाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी माजी सरपंच तथा बाळापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवाजी भाऊ पाटील, कॉग्रेसचे जिल्हा सचिव तथा मानकी येथील धडाडीचे कृतीशील कार्यकर्ते श्री संजय भाऊ पेटकर, माजी सरपंच श्री चक्रधर कातखेडे, पोलीस पाटील महादेव सरोदे, अॅडव्होकेट प्रजानंद उपर्वट वंचित आघाडीचे प्रसिध्दी प्रमुख सुमेध अंभोरे, उपसरपंच विष्णु भाकरे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण अंभोरे, सागर अंभोरे, सुप्रसिद्ध कथाकार मोहन अवचार, सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई , श्री राजेश सरदार, न्यायपत्रचे तालुका प्रतिनिधी भालेराव दादा, ग्रा.प .सदस्य प्रमोद तायडे यांचेसह समस्त देगांवची गांवकरी मंडळी तथा मोठ्या संख्येने महिलावर्ग या प्रसंगी उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यांत आले. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यांत आले.तंटामुक्ती अध्यक्ष जगजीवनराम कातखेडे तसेच अॅड. प्रजानंद उपर्वट यांचा या प्रसंगी यथोचित सत्कार करण्यांत आला. सौ आशाताई इंगळे (तायडे) यांचेसह छोटया मुलींनी महापुरुषांची सुरेल गीतें सादर केली. मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. अभ्यासपूर्ण सुत्रसंचालनाची धूरा प्रसिध्द साहित्यिक तथा धम्माचे सखोल ज्ञान असलेले सामाजिक कार्यकर्ते मनोहर भाऊ इंगळे यांनी सांभाळली, तर विद्रोही साहित्यिक तथा चिकित्सक अभ्यासक नागसेन अंभोरे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.