अकोला – आज संवाद कमी झाले आहेत.जवळ बसलेल्यांशीही न बोलणे हे शिष्टाचार झाले आहेत.त्यामुळे सुशिक्षत माणसं माणसापासून दुर जात अआहेत. अशा चिंतनिय परिस्थितीत समाजमनाचा आरसा असलेल्या साहित्य निर्मितीसोबतच कवी ,साहित्यिक आणि रसिक माणसांना एकत्र आणणाऱ्या साहित्य चळवळी निर्माण झाल्या पाहिजेत.त्या चालवणारे पुढे आले पाहिजेत.प्रत्येक मायबोलीमध्ये आपलेपणा,जिव्हाळा असतो.त्यामुळे आपल्या भाषेचा आदर असावा परंतू ईतर भाषांबाबत दुरावाही नसावा.असे महत्वपूर्ण प्रतिपादन मराठी भाषा संवर्धन आणि समृध्दीबाबत बोलतांना दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक,म.रा.साहित्य संस्कृती मंडळ सदस्य श्रीपाद अपराजित यांनी केले.मराठी भाषा विभाग,व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने तरुणाई फाउंडेशन,कुटासा यांच्या वतीने आयोजित ७ वे जिल्हा मराठी साहित्य संमेलन अकोला येथे नुकतेच पार पडले.त्या संमेलनाचे उद्घाटक म्हणून श्रीपाद अपराजित बोलत होते. अध्यक्षस्थानी वऱ्हाडी कथाकार सु.पुं अढाऊकर,तर प्रमुख अतिथी म्हणून म.रा साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य बारोमासकार, डॉ.सदानंद देशमुख,स्वागताध्यक्ष म्हणून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय.एम.देशमुख,सिने अभिनेता कुणाल मेश्राम,देवकाताई देशमुख,पुष्पराज गावंडे,प्रा.डॉ.संतोष हुशे,प्रा संजय पोहरे, डॉ.किरण वाघमारे,प्रा.दिपाली सोसे, यांची विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.डॉ.विनय दांदळे यांनी पाहूण्यांचा परिचय देऊन डॉ.किरण वाघमारे यांनी संमेलनाची भुमिका विषद केली तर तरूणाई फाउंडेशन अध्यक्ष यांनी प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल व आगामी उपक्रमांची माहिती दिली.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात हे दोन दिवसीय संमेलन ९ सत्रांमध्ये पार पडले.सर्वप्रथम देशमुख फाईलमधील गजानन महाराज मंदिरातून ग्रंथदिंडी काढून ती संमेलनस्थळी आणण्यात आली.तेथील वारकरी संस्थेचे विद्यार्थी,टाळ ,मृदुंग व वासुदेल दृश्य हे या विलोभनिय ग्रंथदिंडीचे आकर्षण ठरले. त्यानंतर महापुरूषांना वंदन अभिवादन करून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संमेलनाध्यक्ष सु.पुं अढाऊकर यांनी मोठ्या प्रकाशन संस्था ह्या नवोदित ग्रामीण साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित नसल्याची खंत व्यक्त केली. दरोरोजच्या बोलीभाषेमध्ये मराठी शब्दांचा वापराची अपेक्षा व्यक्त करीत अभिजात मराठी भाषेचे महत्व अधोरेखित केले. तर डॉ. सदानंद देशमुख यांनी पूर्वी साहित्त्यिकांना भेटण्यासाठी गर्दी होत होती.आता भेट तर दुरच,अभिरूची कमी झाल्याने पुस्तक प्रकाशनात प्रतींची संख्या घसरल्याचे सत्य बोलून दाखविले. त्यांचेसह उपस्थित अतिथींनी दररोजच्या व्यवहारात मराठी शब्दांच्या वापराची गरज प्रतिपादीत करून वाचन संस्कृतीच्या अभावावर खंत व्यक्त केली. तरुणाई फाउंडेशनच्या चळवळीला व अध्यक्ष संदीप देशमुख यांच्या उपक्रमशिलतेला शुभेच्छा व्यक्त केल्या. संजय देशमुख यांनी स्वागताध्यक्षिय भाषणातून सर्व मान्यवर,साहित्यिक व रसिकांचे स्वागत करून वाचनसंस्कृती विस्तारातून मराठी भाषा अबाधित ठेवण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. ग्रंथदिंडी आणि उद्घाटनानंतर झालेल्या संमेलनामध्ये दोन दिवसात परिसंवाद, हास्यधारामधील कवीसंमेलन, कथाकथन, गझल मुशायरा, भावबंध कविकट्टा,या सत्रांमध्ये निमंत्रित व वेळेवर उपस्थित साहित्यिकांनी आपल्या विविध साहित्यकृती सादर केल्या. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी, बोईसर, मुंबई व खामगाव तथा अकोला येथील पदाधिकाऱ्यांना स्वामी विवेकानंद युवाश्री, आदर्श पत्रकार दर्पण, जीवन गौरव, व ईतर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सहभागी कवी आणि साहित्यिकांचे सहभागाबध्दल सन्मान करण्यात आले. सागर लोडम यांच्या वऱ्हाडवृत्त व संजय देशमुख यांच्या विश्वप्रभात या संमेलन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
प्रा.मोहन काळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अभिजात मराठी भवितव्याबाबत प्रा.डॉ.संदिप काळे, डॉ.कल्पना थोरात, प्रा.डॉ.स्वप्निल इंगोले, यांनी विचार व्यक्त केले. तर हास्यधारा कवि संमेलनात आशा शिंदे यांचे अध्यतेत व दिवाकर देशमुख यांचे सुत्रसंचलनात नितीन देशमुख अॕड अनंत खेळकर, नितीन वरणकार, गौतम गुळधे, विजय सोसे, गजानन मते, प्रा.संजय कावरे, रविन्द्र महल्ले, का.रा.चव्हाण, धीरज चावरे, प्रशांत भोंडे, शिवराज जामोदे, देवानंद गहिले, प्रशांत असनारे, नईम फराज, चाफेश्वर गांगवे, विशाल मोहोड, हे निमंत्रित व ईतर असंख्य कवींनी तथा रविवारच्या सत्रात प्रा.वर्षा कावरे यांचे अध्यतेत सुरेश पाचकवडे, डॉ विनय दांदळे,गजानन हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा.डॉ.श्रध्दा थोरात,प्रा.नाना भडके,प्रा.महादेव लूले,शांतीलाल चव्हाण श्री शिवाजी व विविध महाविद्यालयातील नवोदित कवी,विद्यार्थांनी तथा अनेकांनी आपल्या प्रतिभेचा आविष्कार घडविला.आबासाहेब कडू यांचे अध्यतेखाली प्रा.मोहन काळे,अलका बोर्डे,विद्या बनाफर,साधना काळपांडे,यांनी कथाकथन सादर केले.ज्येष्ठ साहित्यिक देवकाताई देशमुख यांचे अध्यक्षतेखाली गजल मुशायरा पार पडला.यामध्ये प्रा.डॉ.संजय पोहरे,दिगंबर खडसे,मंगेश गजभिये,ऐजाज शेख,अजित सपकाळ अमोल शिरसाट विद्यानंद हुडके गजानन कदम ,प्रवीण हटकर,दिनेश गावंडे, रंजना कराळे मिलींद इंगळे,हे निमंत्रित व ईतर प्रतिभावंताचा सहभाग होता.या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय व राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांमधून प्रदिप खाडे,राजेन्द्र देशमुख,प्रा.विजय काटे,विजयराव बाहकर,अरविंदराव देशमुख (नागपूर) संजय देशमुख,प्रा.हेमंत बुरंगे (अमरावती) जगदिश अग्रवाल,पंजाबराव देशमुख,रामराव देशमुख (खामगांव) दिलीप बनकर,प्रमोद अंभोरे,देवानंद वाकळे,रवी साबळे,मोहम्मद युनूस (परभणी)

अक्षरक्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर घोरसे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या समारोपीय कार्यक्रमात तुळशीराम बोबडे, प्रा.सदाशिव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. या साहित्य संमेलनाला राज्यभरातील साहित्यिक, कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. रसिका़सोबतच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी, अमरावती, खामगाव, नागपूर, अकोला येथील पदादधिकारी आणि सभासदांची यावेळी उपस्थिती होती. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर भिसे यांचे विशेष सहकार्याने हे संमेलन यशस्वीपणे पार पडले.हा वैचारीक सोहळा यशस्वी करण्यासाठी तरुणाईचे अध्यक्ष संदिप देशमुख यांचेसोबत, संजय एम.देशमुख, नियोजन समिती अध्यक्ष डॉ.किरण वाघमारे, सचिव डॉ.गणेश मेनकार, देवानंद गावंडे, सागर लोडम, गजानन हरणे, राहूल भगत, विक्रम सोनी, सचिनकुमार तायडे, विशालराजे बोरे, सुनिल दिवनाले दीपक माहितकर, दिलीप नवले, पंजाबराव वर, मनोहर मोहोड, मंजु झांबरे रिता देशमुख सुलभा देशमुख व अनेकांनी अधक परीक्षम घेतले.
