वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला- येथील बी. आर. हायस्कूलचे प्रांगणात गुरुवार दिं 10/ 11/2022 ला सायंकाळी अकोला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सद्गुरुनानक जयंती, कोजागिरी, दिवाळी आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम हर्षोल्लसात संपन्न झाला. विचारपिठावर विदर्भ पश्चिम विभाग सचिव डॉ. सुहास काटे, जी.एस सेठी संघाचे अध्यक्ष तथा महानगर समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुळकर्णी, उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार, जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष नारायण अंधारे हे होते. प्रतिमापूजन, मान्यवरांचे स्वागत,साने गुरुजी प्रार्थनेनंतर गुरुनायक आणि साने गुरुजी प्रार्थने नंतर सद्गुरु नानक जयंती निमित्य जी.एस. सेठी यांनी सद्गुरु नानक यांचे जीवन आणि कार्याच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला. गुरुनानक हे समतावादी संत होते. त्यांनी कर्मकांडावर प्रहार करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले नारायण अंधारे आणि प्रा. यादव वक्ते यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष मनोगतामध्ये चंद्रकांत कुळकर्णी यांनी ज्ञान हाच गुरु नानकांचा ईश्वर होता ही बाब अधोरेखित केली. सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी तर प्रकाश शेगोकार उपाध्यक्ष यांनी आभार व्यक्त केले.
नंतरच्या सत्रामध्ये दीपोत्सवात बिन आवाजाच्या फटाक्यांनी सर्व ज्येष्ठांनी दिवाळी हर्षोल्लासात साजरी केली व दिवाळी फराळ आणि कोजागिरीच्या दुग्धपानाचा आस्वाद घेतला. अखेरच्या संस्कृतिक सत्राला मोहनशास्त्री जलतारे यांच्या गणेशवंदनेने सुरुवात झाली. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी आंतरिक दिप प्रज्वलित होण्याकरिता ईश स्तवन आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. सुहास काटे, शरयू देशपांडे, तुळशीराम बोबडे, शितल काटे, योगाचार्य भगवंतराव गावंडे, विठ्ठलराव देशमुख, प्रा. यादव वक्ते, प्रकाश जोशी, चंद्रकांत कुळकर्णी, अशोक कुळकर्णी, नारायण अंधारे, सौ.सेठी, चंद्रप्रभा चौधरी, के.जी. देशमुख, विवेक जोशी यांनी आपल्या रचना सादर केल्या. संध्या संगवई, यांच्या ‘आज जाने की जिद ना करो’ या गझलेने सर्वांना मंत्रमुग्ध केले. संस्कृतीक सत्राचे बहारदार सूत्रसंचालन संध्या संगवई यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये माजी अध्यक्ष अशोक कुळकर्णी प्रादेशिक कृषी समिती अध्यक्ष सारडा, बाळासाहेब काळे, शांताराम बुटे, रामभाऊ बिरकड, रामदास वांडे, विजयकुमार लांडगे, प्रदीप कर्णेवार, अनंत अंधारे आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.