गेल्या सहस्त्रकात जगातील अनेक प्रदेशांमधे मोठे नरसंहार करून त्या प्रदेशांचा ताबा मिळवणारे अनेक क्रूरकर्मा होऊन गेले. त्यातील अनेकांनी तेथील संस्कृतीही नष्ट करण्यात यश मिळविले. अशा क्रूरकर्मा राज्यकर्त्यांच्या यादीत चेंगझखान या मंगोलियन सम्राटाचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. असे म्हणतात की, चेंगिझखानाने त्यांच्या कारकिर्दीत सुमारे दोन ते अडीच कोटी माणसांची कत्तल केली […]