शहरातील उंचच उंच इमारतींमध्ये लिफ्ट ही असतेच. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करण्यात येतो. ऑफिसमध्ये किंवा मॉल्समध्ये लिफ्ट वापरणे सामान्य बाब झाली आहे. याशिवाय लिफ्टच्या वापराने वेळ तर वाचतोच शिवाय मेहनतही लागत नाही. पण, अनेकदा लिफ्टमध्ये अडकल्याचा अनुभव कित्येक जणांना येतो आणि अशावेळी लोक पॅनिक होतात. लिफ्टमध्ये अडकणे खरंच त्रासदायक असू शकते. हा अनुभव अनेकांना भीतिदायक ठरू शकतो. लिफ्टमध्ये अडकल्यावर घाबरून जाण्याऐवजी मनावर ताबा मिळवत या समस्येतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर लिफ्टमध्ये अडकले असाल तर आरडा-ओरडा करण्याऐवजी थोडा वेळ शांत राहण्याचा प्रयत्न करा. शांत राहिल्याने तुम्हाला मानसिक स्ट्रेस येणार नाही. अशाने तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यास कोणतीही अडचण जाणवणार नाही. याशिवाय तुम्ही दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही लिफ्टमध्ये अडकले असाल आणि लिफ्टमधील लाइट्स बंद असतील तर सर्वप्रथम लाइट्स शोधा. लिफ्टमध्ये लाइट्स नसतील तर अशावेळी तुम्ही मोबाइल टॉर्चचा वापर करू शकता. अनेकांना अंधाराची भीती असते अशावेळी हा हॅक तुम्हाला उपयोगी पडेल. बऱ्याच वेळा लिफ्टच्या आतही मोबाइलमध्ये नेटवर्क असते. अशावेळी मदतीसाठी कोणाला तरी कॉल करा. लिफ्टमध्ये इतरही लोक असतील तर ते तुमच्यापासून अंतर राखत आहेत की, नाही ते चेक करा. अशा परिस्थितीत अनुचित घटना घडू शकते. एकटे लिफ्टमध्ये अडकले असला तर मोबाइल बॅटरी जपून वापरा. अलार्म बटण किंवा कॉल बटण दाबा – लिफ्टमध्ये ही दोन्ही बटणे असतात. अलार्म बटण हे लिफ्टमध्ये कोणीतरी अडकल्यावर आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे यासाठी असते. जर आवाज देऊनही मदत मिळत नसेल तर अलार्म बटण दाबा. कॉल बटण हे सुरक्षेसाठी असते आणि ते दाबल्याने तुम्हाला तंत्रज्ञांशी संपर्क साधून मदत