राज्यातल्या इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर सुरू कराव्या असा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आदेश लागू होतील. दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांनी प्राथमिकचे वर्ग दुसऱ्या सत्रात भरतील अशी सूचना यात केली आहे. ज्या शाळांच्या व्यवस्थापनांना वेळेत बदल शक्य नाही त्याप्रकरणी शिक्षणाधिकारी किंवा प्राथमिक शिक्षण निरीक्षकांनी प्रत्येक शाळेनुसार निर्णय द्यावा असे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं दिले आहेत.
About The Author
Post Views: 100