देशातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी आणि जागतिक दस्ताऐवज तयार करणारा ‘ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडेमिक अकाऊंटट रजिस्ट्री’ असा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली इथं दिली. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला कायमस्वरूपी १२ अंकी आयडी देऊन त्यांची शैक्षणिक कामगिरी एकाच ठिकाणी एकत्रित आणली जाणार आहे.
आतापर्यंत ५३ डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधा १६ देशांमध्ये विकसित झाल्या असून त्यापैकी १९ सुविधा या भारतामध्ये आहेत. तसंच २५ कोटी आयडी आतापर्यंत तयार झाले असून हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राष्ट्रीय क्रेडिट पात्रता फ्रेमवर्क सोबत तयार करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)
About The Author
Post Views: 93