दिल्लीतील पुराना किल्ला भागात करण्यात आलेल्या उत्खननामधून मातीच्या वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, पा अवशेषांशी संबंधित माहिती पाहिली असता, ती महाभारत काळातील असल्याचे सांगण्यात आले.

भारतात धार्मिक आणि अध्यात्मिक ग्रंथ आणि त्या अवतीभोवती फिरणारे अनेक संदर्भ सातत्याने पाहायला मिळतात. अशा या ग्रंथ आणि यादीत येणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे महाभारत. हस्तिनापूर, इंद्रास्थ, कौरव पांडव या आणि अशा अनेक संज्ञा या महाभारताच्या निमित्ताने आपल्या लिहिण्या-वाचण्यात आल्या. आता पाच महाभारताशी संबंधित काही अवशेष जगासमोर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय पुरातत्व विभागातर्फे येत्या काळात दिल्लीच्या पुराना किल्ला परिसरात उत्खननाच्या सातव्या फेरीची सुरुवात केली जाणार आहे. अनेक दाव्यांनुसार याच भागात इंद्रप्रस्थचा भाग होता, असे म्हटले जाते. उत्खननातून दिल्लीशी संबंधित अनेक पूरातन आणि ऐतिहासिक संदर्भ प्रकाशात येणार आहेत.
प्रत्यक्षात दिल्लीतील या पुराना किल्लाची बांधणी १६ व्या शतकात हुमायूंकडून करण्यात आली होती. याच भागात उत्खनन करीत येत्या काळात पुरातत्त्व खात्याकडून पुराना किल्ला भागात खरच पांडवांचे अस्तित्व होते का, येथे इंद्रस्थ होते का, यासंदर्भातीत खुलासा केला जाणार आहे. (वृत्तसंस्था)