शिना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीजवरील माहितीपटाला स्थगिती देण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) मागणी मंगळवारी विशेष न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयामुळे माहितीपट येत्या 23 फेब्रुवारी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’ या मालिकेविरोधात सीबीआयने विशेष न्यायालयात धाव घेतल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश एसपी नाईक- निंबाळकर यांनी मंगळवारी सीबीआयची याचिका फेटाळून लावली आणि प्रसारण थांबविण्यासाठी तपास यंत्रणेला योग्य मंचाकडे दाद मागण्याचा सल्ला दिला. तसेच प्रसारण रोखण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद निदर्शनास आणून देण्यास सीबीआय अपयशी ठरल्याचेही न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले.
About The Author
Post Views: 82