प्रत्येक माणसाने कृतज्ञतेचा कर्तव्यधर्म पाळणे हा नियतीचा संकेत आहे.समाजात स्नेह,सहकार्य आणि विश्वासाने आपला अमुल्य वेळ देणारे अनेक समाजसेवक सक्रिय असतात.त्याचप्रमाणे सामाजिक योगदान देणारे तत्वनिष्ठ संवेदनशील सेवाव्रती सुध्दा असतात. समाजाचे प्रतिनिधित्व करणार राजकीय नेते सुध्दा स्वत:च्या छब्या समाजामध्ये उजळविण्यासाठी प्रसारमाध्यमांव्दारे सक्रिय असतात. मुलभूत नागरी सुविधा आणि शिस्तीचे अनुशासन ठेवणारे प्रशासन असते.त्याचप्रमाणे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेऊन निरोगी समाजव्यवस्था कायम ठेवणे हे पोलिस खात्याचे कर्तव्य असते.या साऱ्यांमध्ये समन्यय ठेऊन आपल्या लेखणीव्दारे अनाचाराचे उच्चाटण आणि सामाजिक न्यायायाठी झगडणारे पत्रकारही आपली सेवा बजावतात असतात.ते सेवाव्रती आणि राजकीय नेत्यांच्या विधायक वाटचाली़ना प्रसिध्दी देऊन त्यांना अधिकाधिक लोकाभिमुख ठेवण्याचा आपला कर्तव्यधर्म पाळत असतात. प्रशासनाला पत्रकार नेहमीच सहकार्य करतात.परंतू याच प्रशासनातील काही भ्रष्ट प्रवृत्ती आपल्या अपराधी भावंडांना संरक्षित करण्यात मग्न असतात. अनेक नेते राजकारणाच्या गोळाबेरजेत आपल्या काही भ्रष्ट नेत्यांना पवित्र करून आपल्यात घेतात.त्यांच्या अपराधांना क्लिनचाट देतात अनेक विषमता,विसंगती आणि अन्यायाने ग्रस्त असलेले समाजातील मतदार मात्र अशा या नेत्यांना देवत्व,थोरत्व देऊन त्यांच्यासाठी जीवाचं रान करतात.परंतू त्यांचेवरील अन्यायाच्या प्रतिकारासाठी आणि बिघडलेल्यांना वठणीवर आणण्यासाठी झगडणाऱ्या पत्रकारांकडे मात्र समाजाचे लक्ष नसते. (Journalists now have to be aggressive against fake crimes and attacks)

शासन,प्रशासन आणि राजकारणात एकमेकांना भाऊ भाऊ म्हणून सांभाळणाऱ्या या काही घटकांच्या भाऊगर्दीत समाजातला पत्रकार हा घटक मात्र आज प्रचंड उपेक्षित आहे.त्याची दु:खं त्याच्या व्यथा, मानापमान, सरकारकडून कठोर भावनांनी होणारे अन्याय हे फक्त त्याचे त्यालाच माहिती असतात.समाजाचा वृत्तपत्रसृष्टी आणि ईतर प्रसार माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला अशी कारणे सांगीतली जातात.परंतू काही टक्केवारीच्या प्रमाणवरून सर्वच अप्रामाणिक असतात असं तर म्हणताच येणार नाही. काहीही असलं तरी हल्ला होणे कुणावरही होणे ही कायदे हातात घेण्याची दादागीरी समर्थनिय तर नाहीच. मग “जाऊ द्या तो तसाच आहे” ही वृत्ती म्हणजे समाजिक कर्तव्याशी बेईमानी ठरते,किंवा तो त्यापासून पळ काढण्याचा मतलबी आत्मकेन्द्रीपणा ठरतो. परवा अकोला जिल्ह्यात आलेगाव येथील पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.
यापूर्वी सुध्दा अनेक हल्ले अकोला आणि महाराष्ट्रात ठीकठीकाणी झालेले आहेत.त्यातील असंख्य प्रकरणामध्ये पोलिसांच्या भुमिका ह्या संशयास्पद राहिलेल्या आहेत हे धडधडीत प्रखर सत्त्य सरकारच्या अजूनही लक्षातच आलेले नाही,असे म्हणता येईल का? सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून राजकारण्यांना प्रसिध्दी देणाऱ्या पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्याची उपरती मात्र समाजातील या सक्रिय घटकांमधून कोणालाच होत नाही.त्याच्या सामाजिक साधनेचे कुठेच मुल्यमापण नाही.कार्याप्रती तिळमात्र कृतज्ञता नाही.शासन आणि प्रशासनातून तर ती नाहीच नाही.अनेकांना सेवा देणाऱ्या पत्रकारांप्रती आपला काहीतरी कर्तव्यधर्म आहे याची जाणीव ठेवण्याची संवेदनशीलता समाजामध्ये राहिली नाही, म्हणूनच सर्वबाजूंनी पत्रकार हा अन्यायग्रस्त आणि उपेक्षित घटक आहे.त्याला सन्मानित करण्याची प्रदर्शनं हे बहूतेक ठीकाणी फक्त प्रसिध्दीच्या मतलबाचे नामी फंडे असतात.प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अनैतिक पितळं उघडी पाडतात म्हणून ते तर पत्रकारांना मित्र समजतच नाहीत. उलट एखाद्या खोट्या प्रकरणात त्याला कसं अडकवता येईल याची षड्यंत्रे तयार करण्यात ते मग्न असतात.म्हणून राज्यात अनेक पत्रकारांवर हल्ले होत आहेत.यातील कोणत्याच प्रकरणात मोजक्या पत्रकारांशिवाय समाजातून किंवा कोणत्याही सामाजिक नेत्याकडून शासन ,प्रशासनाला जाब विचारला गेलेला नाही.कोणी हल्ल्यातून बचावले तर कोणी जीवानिशी गेले.तरीही त्याच्यासाठी कोणी मेनबत्त्या जाळल्याचे ऐकिवात नाही.त्यातील अनेक हल्ले हे पूर्वनियोजित कट होते,आजही आहेत…!.परंतू जेव्हा केव्हा सामाजिक प्रश्नांसाठी सतत लढणाऱ्या या पत्रकारांवर मग्रूर,भ्रष्ट,लबाड आणि व्यभिचारी प्रवृत्ती हल्ले करतात,त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवतात,त्यावेळी अनेक सामाजिक तथा राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी हे नेहमीच बिळात असतात. तर समाज आपल्या घरात असतो.त्यावेळी त्यांच्यावर उपकार करणाऱ्या पत्रकारा़ंचं कुणाला काहीही देणं घेणं नसतं…”तुच लढला आणि आता तुच स्वत: मर” अशी अमानवीय वृत्ती म्हणजे असंवेदनशील समाज आणि मृतावस्थेतील लोकशाहीचा दुर्दैवी वर्तमान आहे.तो यापूर्वी कमी प्रमाणातला ईतिहास होता.परंतू तोच भविष्यातील लोशाहीची धोकादायक घंटा वाजवत आता पुढे येणार आहे.

राजकारण्यांची अप्राणिकता आणि कृतघ्नता ही सर्वश्रुत आहे.परंतू लोकशाहीतील प्रामाणिक प्रतिनिधी म्हणून समाजावरील अन्यायाविरूध्द शासन आणि प्रशासनाविरूध्द बंड करणाऱ्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ले होतात त्यावेळी समाजातील सर्व शांत असतात.तेव्हा त्याच य समाजातील माणूस म्हणविणाऱ्या या माणसांना वेदना झालेचे कधी दिसले नाही.एखाद्या पत्रकारांवरील हल्ला प्रकरणात महाराष्ट्राच्या एखाद्या तरी जिल्ल्ह्यातील समाज रस्त्यावर उतरल्याची घटना कधी समोर दिसली नाही…वाचण्यात आली नाही. एवढंच कशाला लहान मोठा,कोण्या दैनिकाचा, कोणत्या चॕनलचा, पोर्टलचा किंवा अमुक संघटनेचा सभासद म्हणून तो आमचा नाही. या पत्रकारांच्याच अमानवीय भेदभावांच्या धोकादायक गदारोळात त्यांची पत्रकार ही जातच विसरली जात आहे.पत्रकारा़वरील संकटं का वाढली? या प्रश्नाचं एकच उत्तर आहे. त्याला ह्या फटी कारणीभूत आहेत.त्या भुकंपाच्या विवराप्रमाणे अधिक विस्तारीत होत आहेत.त्याचेच फायदे घेऊन एका गटाला हाताशी घेऊन दुसऱ्या गटाला नामोहरम करण्याचे डाव शासन,राजकारणी आणि प्रशासनाकडून खेळले जात आहेत.
लहान – मोठा, आणि ईतर सर्व प्रकारचे भेदभाव विसरून पत्रकारांनी संघटीत होऊन रस्त्यवर उतरल्याशिवाय सरकारला जाग येऊ शकत नाही. त्याप्रमाणे प्रशासनातील भ्रष्ट,मग्रूर अनैतिक प्रवृत्ती वठणीवर आणता येणार नाहीत.कारण बिघडलेल्या सराईत प्रवृत्ती एकाने बातमी लिहून उघडं पाडलं तर दुसऱ्या पत्रकाराला हाताशी पकडतात.दुसरीकडे अपराधी गुन्हेगारांशी सुध्दा सुत जमवतात.प्रसंगी महिलांनाही हाताशी ठेऊन पत्रकारांवर खंडणीचे आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज दाबण्याचे प्रयत्न केले जातात.सोबतीला भ्रष्टाचाराची माया असतेच.तरीही ऐकलं नाही तर मग साम दाम दंडभेदांचा उपयोग करून गु़डांना हाताशी पकडून हल्ले घडविण्यात आल्याचीही राज्यातील अनेक ठीकाणाहून आलेली माहिती आहे.म्हणून पत्रकारांनी आता संपूर्ण
तयारीनिशी सावध झालं पाहिजे. प्रतिकाराची मजबूत संघटन शक्ती शासन,प्रशासन आणि राजकीय नेत्यांना आता दाखवून दिली पाहिजे…अन्यथा राष्ट्राचा हा आधारस्तंभ अधिक उपेक्षित होऊन लोकशाही संकटात आल्याशिवाय राहणार नाही.म्हणून पत्रकार बांधवांनो जे स्वत:ला मोठे समजत असतील त्यांना त्यांच्या कोषात जगू द्या.आपण मात्र सारे उठा…!जागे व्हा…! संघटीत व्हा आणि शक्तीशाली दबावगट घेऊन अविरत संघर्ष करीत रहा…! आताच्या वर्तमानासाठी आणि उद्याच्या भविष्यासाठी…! (Journalists now have to be aggressive against fake crimes and attacks)
संजय एम.देशमुख (निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार
मोबा.क्र.९८८१३०४५४६