अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली गावातील युद्धभूमीला अकोल्याचे समाजसेवक डॉ. रघुवीर देशपांडे यांनी दिनांक 6/2/25 रोजी भेट दिली. 1803 साली ब्रिटिश आर्मी व मराठा सेना यांचे भीषण युद्ध सिरसोलीच्या जंगलात झाले. या युद्धात दोन्ही बाजूचे 50,000 सैन्य सहभागी होते. युद्धात 500 ब्रिटिश अधिकारी मराठा सेनेने कापून काढले.भीषण युद्धाचे शेवटी ब्रिटिश आर्मीचा विजय झाला. ब्रिटिश आर्मीचे अधिकारी व त्यांचे शिष्टमंडळ दरवर्षी युद्धभूमीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय व हर हर महादेव हि घोषणा देऊन, मराठा सैनिकांनी या युद्धात अतुल्य शौर्य व पराक्रम दाखविल्यामुळे त्यांच्या शौर्याच्या कथा आजहि लोक सांगतात. मराठा सैनिकांचे “शौर्य व पराक्रम” नवीन पिढीला माहिती होण्यासाठी या युद्धभूमीवर अनेक वर्षापासून अज्ञात मराठा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्य सुरु आहे. 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत हजारोच्या संख्येत या भागातील नागरिक अनाम-अज्ञात सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात.
मराठा सैनिकांचे “शौर्य व पराक्रमाची” माहिती सर्वांना होण्यासाठी, शौर्यभूमी संवर्धन विकास बहुउद्देशीय संस्था अनेक वर्षापासून देशप्रेम जागृतीचे महान कार्य करीत आहे. त्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना विकास करण्यासाठी निवेदन दिले आहे. पवित्र अश्या शौर्यभूमीला डॉ. रघुवीर देशपांडे यांनी भेट देऊन पुष्पहार अर्पण केला व देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे अनाम सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या सोबत कॅप्टन सुनील डोबाळे, डॉ. नाजूकराव मानकर,संघर्ष सावरकर व मा. निलेश आखरे सोबत होते. 1803 साली झालेल्या भीषण युद्धाची माहिती जाणून घेण्यासाठी सिरसोली गावातील हभप. विनायकदादा खोटरे महाराज (वय 80) यांचे घरी जाऊन बैठक घेऊन चर्चा करुन युद्धाची माहिती जाणून घेतली. या युद्धात संत नरसिंग महाराज यांचे मातोश्री राजसाबाई यांनी महिलांना जमवून अतुलनीय कामगिरी केली आहे. या युद्धभूमीचा विकास करण्यासाठी दोन वेळा सन्मा. श्रीकर परदेशी जिल्हाधिकारी यांनी भेट दिली आहे. हभप. विनायक दादा व विकास समितीचे सर्व विचार समजून घेतल्यावर सोशल वर्कर डॉ. रघुवीर देशपांडे यांनी सिरसोली युद्धभूमी, शौर्यभूमीचा विकास करण्यासाठी सन्मा. मुख्यमंत्री यांना निवेदन मेल पाठविल्याचे सांगितले. लवकरच पंतप्रधान यांना देखील निवेदन मेल पाठविण्याचे आश्वासन दिले. या भेटीतच आ. प्रकाश भारसागळे यांचे ऑफिसला भेट देऊन त्यांना देखील विकास करण्यासाठी निवेदन दिले. गावातील बैठकीत हभप. विनायकदादा खोटरे डॉ. नाजूकराव मानकर साहेब. कॅप्टन सुनील डोबाळे साहेब, संघर्ष सावरकर सर, निलेश आखरे, मोकास दार मधुसूदन खोटरे ऋषिकेश खोटरे, विक्रम पाटील, शमिक खोटरे व बाळासाहेब देवतळे व गावाकरी मंडळी उपस्थित होती.
