केंद्र सरकारने श्वान पाळण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 23 परदेशी ब्रिड्सचे श्वान घरात पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पिटबूल, रॉटविलर, वूल्फ डॉगसारख्या 23 प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. परदेशी श्वानांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या घटना रोखण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. याची गंभीर दखल घेत भारत सरकारने श्वान पाळण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने परदेशी ब्रिड्सचे 23 श्वान घरात पाळण्यास बंदी घातली आहे. यात पिटबूल, रॉटविलर, टेरियर, वूल्फ डॉगसारख्या परदेशी श्वानांचा समावेश आहे. अनेक भारतीय घरांमध्ये या प्रजातींचे श्वान आढळून येतात. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर हे श्वान ठेवता येणार नाहीत. यात पिटबूल टेरियर, तोसा इनू, अमेरिकन स्टेफोर्डशायर टेरियर, फिला ब्रासीलिरियो, डोगो अर्जेटिनो, अमेरिकन बुलडॉग, बोएसबोएल, कनगाल, सेंट्रल एशियन शेफर्ड, काकेशियन शेफर्ड, साउथ रशियन शेफर्ड, टोनजॅक, सरप्लानिनॅक, जापानी तोसा ऐंड अकिता, मास्टिफ्स, रॉटलवियर, टेरियर, रोडेशियन रिजबॅक, वोल्फ डॉग्स यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने श्वानांसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 23 परदेशी जातींचे श्वान घरात पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. परेदशी श्वानांनी केलेल्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
