वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला : भाविकांना माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन घेण्याकरिता जाता यावे, यासाठी नवरात्रोत्सवात अकोला आगार क्र. २ मध्यवर्ती बसस्थानकमधून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत अकोला ते माहूर ही विशेष जादा बस सोडण्यात येणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज सकाळी बस सुटणार असल्यामुळे अकोलेकर भाविकांची सोय होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी अकोल्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जातात. दरम्यान, माहूर येथे जाण्यासाठी थेट बस नसल्याने नवरात्रोत्सवात पहिल्या दिवसापासून बस सोडण्यात येणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सोमवार, २६ सप्टेंबरपासून दररोज पहाटे ५.३० वाजता अकोला-माहूर ही विशेष बस सुटणार आहे. ही बस ११ वा. माहूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात माहूर-अकोला ही बस दुपारी २ वाजता माहूर येथून निघून अकोला येथे सायंकाळी ६.३० वाजता पोहोचणार आहे.